प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४ थे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा
इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें
कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अत्राधिकारस्त्रैवर्णिकानां तावद्विजत्वादप्रतिबद्धएव।
‘शूद्रस्याप्याहतुः शंखलिखितौ’’ कृच्छ्राणि द्विजातीनामेव।
अवरजस्य कामं धर्मेप्सोरप्रतिषिद्धः साधारणोहि धर्मो नियमेश्र्चेति।
कृच्छ्राणि काम्यानि धर्मेप्सोः प्रायश्चित्तार्थिनः।
‘‘यान्वल्क्यः’’ शूद्रोऽधिकारहीनोऽपि कालेनानेन शुद्धयतीति अधिकारहीनो जपहोमाधिकारशून्यः कालः प्रायश्चित्ताधिकरणं।
तस्य विशेषमाहांगिराः’’ तस्माच्छूद्रं समासाद्य सदा धर्मपथे स्थितं।
प्रायश्चित्तं प्रदातव्यं जपहोमविवर्जितामिति।
‘‘स एव’’ शूद्रःकालेन शुध्येत गोब्राह्मणहिते रतः।
दानैर्वाप्युपवा सैर्वा द्विजशुश्रूषया तथेति
प्रायश्चित्ताचे अधिकारी. शूद्रा विषयीं विशेष.
या (प्रायश्चित्ता) विषयीं अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय व शूद्र या तिघांस द्विजत्व असल्यानें त्यांसच आहे. ‘‘शंख व लिखित हे शूद्रालाही अधिकार सांगतात’’ -ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांस काम्यकृच्छ्रें (चांद्रायण वगैरे) सांगितली आहेत. प्रायश्चित्ताची इच्छा करणारा शूद्र यास साधारण धर्म व नियम यांस कांहीच हरकत नाही. ‘‘याज्ञवल्क्य’’ जप व होम हे करण्यास ज्यास अधिकार नाही असाही शूद्र द्वादश वर्ष इत्यादि काळानें करण्यांत येणार्या व्रतानें शुद्ध होतो. ‘‘अंगिरम् त्याचा विशेष सांगतो’’ --- निरंतर आपल्या धर्मानें वागणारा असा शूद्र प्रायश्चित्ताकरितां आला असतां त्यास जप व होम यांनी रहित असें प्रायश्चित्त द्यावें. ‘‘तोच’’---गाई व ब्राह्मण यांच्या हिताविषयीं तत्पर असलेला शूद्र प्रायश्चित्ताचा सांगितलेला जो काळ त्या काळांत दानें, उपास किंवा ब्राह्मणांची सेवा यांच्या योगानें शुद्ध होईल.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP