‘‘यत्तु बृहद्यमः’’ चांडाली पुल्कसीं म्लेंछीं स्नुषां च भगिनीं सखीं। मातापित्रोः स्वसारं च निक्षिप्तां शरणांगतां।
मातुलानीं प्रव्रजितां सगोत्रां नृपयोषितं। शिष्यभार्यां गुरोभार्यां गत्वा चांद्रायणं चरेदिति ‘‘यत्तु सुमंतुः’’ मातृष्वसृस्नुषाभगिनीभागिनेयीचांडालीगमनेषु तप्तकृच्छ्रत्रयं सांतपनं चेति ‘‘यच्चांगिराः’’ पतित्यांत्यस्त्रियो गत्वा भुक्त्वा च प्रतिगृह्य च। मासोपवासं कुर्वीत चांद्रायणमथापिवेति ‘‘यच्च संवर्तः’’ चांडालीं पुल्कसीं म्लेंछीं श्र्वपाकीं पतितां तथा।
एता गत्वा द्विजो मोहाच्चरेच्चांद्रायणव्रतं।
‘‘यच्च हारीतः’’ गुरुतल्पगो मृन्मयीं स्त्रीप्रतिकृतिमग्निवर्णां कृत्वा तामालिंग्य मृत्युना पूतो भवति एवमेव पितृव्यस्त्री गमने स्वसृमातृपितृवसृगमने कन्यासगोत्रास्वस्त्रीयाभगिनीगमने चांद्रायणं चेति तत्र चांद्रायणं रेतःसेकादर्वाङ् निवृत्तौ ज्ञेयं।
‘‘यदपि संवर्तः’’ भगिनीं मातुराप्तां च स्वसारं चान्यमातृजां। एता गत्वा द्विजो मोहात्तप्तकृच्छ्रं समाचरेत्।
कुमारीगमने चैव व्रतमेतद्विनिर्दिशेत्। तथा। गुरोर्दुहितरं गत्वा स्वसारं पितुरेव च। तस्या दुहितरं चैव चरेच्चांद्रायणव्रतं।
मातुलस्य सुतां गत्वा मातुलानीं सगर्भिणीं। एता गत्वा स्त्रियो मोहात्पराकेण विशुध्यतीति तव्द्यतीति तव्द्यवहितपतितभगिन्यादि गमनविषयं। ‘‘यत्तु विष्णुः’’ चांडालीगमने तत्साम्यमाप्नुयात् अज्ञानाच्चांद्रायणं। ‘‘यच्च गौतमः’’ चांडालीगमने कृच्छ्राद्बो अमत्या द्वादशरात्र इति तत्र साम्यकृच्छ्राद्बयो र्विषय उक्तः चांद्रायणस्यापि अज्ञानतः सकृदारोहणमात्रे तु द्वादशरात्रः
‘‘बौधायनः’’ मातृप्वसापितृष्वसा भागिनेयीस्नुषा मातुलानीत्यगम्या अगम्यागमने कृच्छ्रातिकृच्छ्रौ चांद्रायणमिति ‘‘संवर्तः’’ सखिभार्यां समारुह्य श्र्वश्रूं चैव हि मानवः। अहोरात्रोषितो भूत्वा तप्तकृच्छ्रद्वयं चरेत्।
‘‘चतुर्विंशतिमते’’ मातुश्र्च स्वस्रियां गत्वा भार्यां गत्वा तु कामतः। पितृव्यतनयां चैव सपादं कृच्छ्रमाचरेत्। दौहित्रीं पुनतनयां चरेच्चांद्रायणं व्रतं। तत्सुतां तत्स्नुषां गत्वा पराकं तु समाचरेत्। संबंधिनः स्त्रियं गत्वा पादकृच्छ्रं समाचरेत्।
विधवागमने कृच्छ्रमहोरात्रसमन्वितं। आचार्यस्य पराकं तु बौधायनवचोयथा। सखिभार्यां समारुह्य जातिस्वजनयोषितं।
स कृत्वा प्राकृतं कृच्छ्रं पादं कुर्यात्ततः पुनः। कुमारीगमने विप्रश्र्चरेचांद्रायणव्रतं। पतितां तु द्विजोगत्वा तदेव व्रतमाचरेदिति।
‘‘बृहन्मनुः’’ मातुर्भातृगमने पितृमातृगमने तथा। एतास्त्वकामतोगत्वा द्विजश्र्चांद्रायणं चरेत्।
‘‘संवर्तः’’ असतीं मातुलानीं च स्वसारं चान्यमातृजां। एता द्विजः स्त्रियोगत्वा तप्तकृच्छ्रं समाचरेत् इत्याद्यनेकस्मृतिवचनानि संबंधसन्निकर्षविप्रकर्षापेक्षया योजनीयानि।
चांडाळी, पुल्कसी वगैरेंशी गमन केलें तर प्रायश्चित्त. तें रेत पडण्याच्या पूर्वीं निवृत्ति झाली तर जाणावें व्यवहित अशा पतित बहिणी वगैरेंशीं गमन केले तर प्रायश्चित्त.
‘‘जें तर बृहद्यम’’ ‘‘चांडाळी, पुल्कसी, म्लेंछी, सून, बहीण, यांची आई व बाप यांची मैत्रीण व यांच्या बहिणी (मावशी व आते), निक्षिप्तां, शरण आलेली, मामी, विरक्त झालेली, आपल्या गोत्रांतील (कुळांतील) स्त्री, राजाची स्त्री (राणी), शिष्याची स्त्री व गुरूची स्त्री यांच्याशी गमन केलें तर चांद्रायण करावें’’ असें म्हणतो. ‘‘तसेंच सुमंतु’’ मावशी, सून, बहीण, भाची व चांडाळीण यांच्याशीं गमन केलें तर तीन तप्त कृच्छ्रेंव एक सांतपन करावें’’ असें म्हणतो. ‘‘तसेंच अंगिरस्’’ पतित व अंत्यज यांच्या बायकांशी गमन केलें किंवा त्यांचें अन्न खाल्लें किंवा त्यांच्यापासून प्रतिग्रह घेतला तर एक महिनापर्यंत उपास करावे अथवा चांद्रायण करावें’’ असें म्हणतो. तसेंच ‘‘जें तर संवर्त’’ चांडाळीण, पुल्कसी, म्लेंछी, श्र्वपाकी व पतिता यांच्याशी द्विजानें अज्ञानानें गमन केलें तर चांद्रायण व्रत करावें.’’ असें म्हणतो. तसेंच ‘‘जें हारीत’’ बापाच्या स्त्रीशीं गमन करणारानें मातीचा स्त्रीचा पुतळा करून त्याला अग्नीप्रमाणें लाल करून त्याला आलिंगन करून त्यापासून त्याचा मृत्यु झाला तर तो पवित्र होईल. त्याचप्रमाणें चुलत्याची स्त्री, बहीण, मावशी, आते, कन्या, आपल्या गोत्रांतील स्त्री, बहिणीची मुलगी, व बहीण यांच्याशीं गमन केलें तर चांद्रायण करावें’’ असें म्हणतो; तेथें चांद्रायण हें शुक्र पडण्याच्यापूर्वी निवृत्ति झाली असतां त्याविषयी जाणावे. ‘‘जेंही संवर्त’’ बहीण, आईची आप्त व सावत्र बहीण यांच्याशी जो द्विज अज्ञानानें गमन करील त्यानें तप्तकृच्छ्र करावें. कुमारीशीं गमन केलें असतांही हेंच व्रत सांगितलें आहे. ‘‘तसेंच’’ गुरूची मुलगी, आते व आतेची मुलगी यांच्यांशीं गमन केलें तर चांद्रायणव्रत करावें. मामाची मुलगी, व गर्भार अशी मामी या स्त्रियांशी अज्ञानानें गमन केलें असतां पराकानें शुद्धि होईल’’ असें म्हणतो तें व्यवहित अशा पतित झालेल्या बहीणी वगैरे विषयीं जाणावें. ‘‘जें तर विष्णु’’---चांडालीशी गमन केलें असतां त्याच्या साम्यतेला पावेल. अज्ञानानें गमन केलें तर चांद्रायण प्रायश्चित्त. असे म्हणतो. आणि जें ‘‘गौतम’’ चांडाळीशीं गमन केलें असतां कृच्छ्राद्ब प्रायश्चित्त व अज्ञानानें बारा दिवस’’ असें म्हणतो. तेथे साम्य आणि कृच्छ्राद्ब यांचा संबंध सांगितला आहे. चांद्रायणाचाही अज्ञानाकडे संबंध सांगितला आहे. अज्ञानानें एक वेळां गमन केलें तर बारा दिवस.
मावशी, आते, भाची, सून व मामी यांशी गमन केलें तर प्रायश्चित्त. आचार्याची स्त्री, संबंधि स्त्री, आईची आई, बापाची आई, व्यभिचारी मावशी वगैरेंशी गमन केलें तर.
‘‘बौधायन’’---मावशी, आते, भाची, सून व मामी या गमन करण्यास अयोग्य आहेत. अशांशीं गमन केलें तर कृच्छ्र व अतिकृच्छ्र व चांद्रायण प्रायश्चित्त होय. ‘‘संवर्त’’---जो मनुष्य मित्राची स्त्री व सासू यांच्यांशीं गमन करील त्यानें अहोरात्र उपास करून दोन तप्तकृच्छ्रें करावी. ‘‘चतुर्विंशतिमतांत’’ आईच्या बहिणीची मुलगी, आईच्या बहिणीच्या मुलाची स्त्री व चुलत्याची मुलगी यांच्याशी बुद्धिपूर्वक गमन केलें तर सवा कृच्छ्र प्रायश्चित्त करावें. मुलीच्या मुलीशीं गमन केलें तर चांद्रायणव्रत करावें. त्याची मुलगी व त्याची सून यांच्याशीं गमन केलें तर पराक करावें. संबंधि मनुष्याच्या स्त्रीशीं गमन केलें तर पादकृच्छ्र करावें. विधवेशी गमन केले तर एक दिवसानें युक्त असें कृच्छ्र करावें. आचार्याच्या स्त्रीशीं गमन केलें तर पराक करावें असें बौधायनाचें वचन आहे. मित्राची स्त्री व जातींतील स्वजनाची (आप्ताची) स्त्री यांच्याशीं गमन केलें तर कृच्छ्रपाद करावा. ब्राह्मणानें कुमारीशी गमन केलें तर चांद्रायणव्रत करावें. द्विजानें पतित स्त्रीशीं गमन केलें तर तेंच व्रत करावें. ‘‘बृहन्मनु’’---जर द्विजानें आईची आई, व बापाची आई यांच्याशीं अज्ञानानें गमन केलें तर चांद्रायण करावें. ‘‘संवर्त’’ व्यभिचारी अशी मामी व सावत्र बहीण यांच्याशी द्विज जर गमन करील तर तप्तकृच्छ्र करावें.’’ इत्यादि अनेक स्मृतीचीं वचनें संबंध, सन्निकर्ष व विप्रकर्ष यांची अपेक्षा असेल त्याप्रमाणें योजावी.
----समाप्त---