मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १०३ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०३ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘चतुर्विंशतिमते’’ लशुनं गृंजनं चैव तृणराजफलं तथा। ऊलीं चैव द्विजोभुक्‍त्‍वा चरेच्चांद्रायणव्रतमिति तृणराजस्‍तालः।
ऊलीपलांडुः। ‘‘पराशरः’’ पीयूषं श्र्वेतलशुनं वृंताकं फलगृंजनं। पलांडुं वृखनिर्यासं देवस्‍वं कवकानि च।
उष्‍ट्रीक्षीरमविक्षीरमज्ञानाद्भुंजते द्विजः। स त्रिरात्रोपवासेन पंचगव्येन शुध्यति। पीयूषं अचिरप्रसूताया गोर्दुग्‍धं।
‘‘सुमंतुः’’ लशुनपलांडुगृंजनभक्षणे। सावित्र्यष्‍टसहस्रेण मूर्न्घि संपातान्नयेदिति एतन्मुखप्रवेशमात्रपरं।
‘‘मिताक्षरायां स्‍मृतिः’’ तालिकाशणछत्राककुसुंभालांबुविड्‌भवान्‌। कुंभीककेशवृंतांककोविदारांश्र्च वर्जयेत्‌।
तथाकालप्ररूढानि पुष्‍पाणि च फलानि च। विकारवच्च यत्‍किंचित्‍प्रयत्‍नेन विवर्जयेदिति।
‘‘तथा’’ वटप्लक्षाश्र्वत्‍थदधित्‍थनीपकदंबमातुलिंगफलानि वर्जयेत्‌। ‘‘यमः’’ तंदुलीयककुंभीकव्रश्र्चनप्रभवांस्‍तथा।
एतेषां भक्षणं कृत्‍वा प्राजापत्‍यव्रतं चरेदिति। ‘‘कामतोऽभ्‍यासे तु बृहद्यमः’’ नालिकां नालिकेरीं च श्र्लेष्‍मातकफलानि च।
खट्वार्ताककुंभीकव्रश्र्चनप्रभवांस्‍तथा। भुतृणं शिग्रुकं चैव कुसंभकवकानि च। एतेषां भक्षणं कृत्‍वा चरेच्चांद्रायणं द्विजः। द्विजपदाच्छ्राद्रादेरनिषेधः। ‘‘आपस्‍तंबः’’ भक्षयेद्यदि नीलां तु प्रमादाद्ब्राह्मणः क्‍वचित्‌। चांद्रायणेन शुद्धिः स्‍यादापस्‍तंबोऽव्रवीन्मुनिरिति।
‘‘षट्‌त्रिंशन्मते’’ शणपुष्‍पं शाल्‍मलं च करनिर्मथितं दधि। बहिर्वेदिपुरोडाशं जग्‍ध्‍वा नाद्यादहर्निशं।
‘‘कौर्मे’’ अलांबु शिग्रुकं चैव जगेध्वाप्येतद्व्रतं चरेत्‌। औदुंबरं च कामेन तप्तकृच्छ्रेण शुध्यतीति

लसूण, ताडाचें फळ, वांगें, डिंक, देवस्‍व, उंटीण व मेंढीं यांचें दुध, काळी मुसळी, सण कुसुंभ, तुंबडे, दुधीभोपळा इत्‍यादि खाल्‍ले तर प्रायश्चित्त.
 
‘‘चतुर्विंशतिमतांत’’ जर द्विजानें लसूण, गृंजन, ताडाचें फळ व कांदा खाल्‍ला तर चांद्रायण करावें. ‘‘पराशर’’---नवीन व्यालेल्‍या गाईचें दुध, पांढरी लसूण, वांगें, गृंजन फळ, कांदा, झाडाचा चीक (डिंक), देवस्‍व, छत्राक, उंटीणीचें दुध व मेंढीचें दुध यांचें जो ब्राह्मण अज्ञानानें भक्षण करील, तो तीन दिवस उपास व पंचगव्य यांच्या योगानें शुद्ध होईल. ‘‘सुमंतु’’---लसूण, कांदा, व गृंजन यांचें भक्षण केलें तर एक हजार आठ वेळां गायत्रीमंत्रानें डोकीवर संपात (अभिषेक) करावे. हें (वचन) तोंडांत (पदार्थ) घातले असतांच त्‍याविषयी जाणावें. ‘‘मिताक्षरेंत स्‍मृति’’ काळी मुसळी, सण, छत्राक, कुसुंभ, दुधीभोपळा, व विष्‍ठेंत होणारें (तांदुळजा वगैरे) पदार्थ, कुंभीक, केस, वांगें व तांबडा कांचन यांस वर्ज्य करावे. ‘‘तसेंच’’ अकाळी होणारीं फुलें, फळें व साधारणपणें ज्‍यापासून कांहीं विकार होईल तें ही प्रयत्‍नानें वर्ज्य करावे. ‘‘तसेंच’’ वड, पिपरी, पिंपळ, कंवठ, आसुपाल्‍याचा वृक्ष, कदंब महाळुंग यांची फळें वर्ज्य करावी. ‘‘यम’’---तांदुळजा, कुंभीक व व्रश्र्चनापासून झालेले पदार्थ यांचें भक्षण केलें तर प्राजापत्‍य करावें. ‘‘बुद्धिपूर्वक अभ्‍यास असतां बृहद्यम’’---नालिका, नालिकेरी, श्र्लेष्‍मातेकाचीं फळें, स्‍वट्टा, वांगें, कुंभीक व व्रश्र्चनापासून उत्‍पन्न झालेले, भूतृण, कुसुंभ व छत्राक याचें द्विजानें भक्षण केलें तर चांद्रायण करावें. द्विज या पदावरून शूद्रास वरील पदार्थांच्या भक्षणाविषयीं निषेध नाहीं. ‘‘आपस्‍तंब’’ जर कदाचित्‌ ब्राह्मण अज्ञानानें नीळी खाईल, तर त्‍याची चांद्रायणानें शुद्धि होईल असें आपस्‍तंबमुनीनें सांगितलें. ‘‘षट्‌त्रिंशन्मतांत’’ सणाचें फुल, सावरीचें पुष्‍पादि, हातानें केलेलें दहि, व वेदीच्या बाहेरील पुरोडाश यांचें भक्षण केलें असतां एक दिवस उपास करावा. ‘‘कूर्मपुराणांत’’ दुध्या भोपळा, व शेवगा हे खाल्‍ले असतांही हेंच व्रत करावें. बुद्धिपूर्वक उंबराचें फळ खाल्‍लें असतां तप्तकृच्छ्रांनें शुद्ध होईल.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP