प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३० वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अथ कृच्छ्रादिस्वरूपम.
‘‘याज्ञवल्क्यः’’ एक भक्तेन नक्तेन तथैवायचितेन च।
उपवासेन चैकेन लघुकृच्छ्र उदाहृतः। यथाकथंचित्त्रिगुणः प्राजापत्यः स उच्यते।
एष एवातिकृच्छ्रः स्यात्पाणिपूरान्नभोजनइति लघुकृच्छ्रस्यैव शिशुकृच्छ्र इति नामांतरं।
यथाकथंचित् अनुलोमः प्रतिलोमो दंडकलितवदावृतः स्वस्थानविवृध्दोवा।
एतांश्र्चतुरोऽपि पक्षान्स्मृत्यंरसिद्धान्यथाकथंचित्पदेनैव संजग्राह ‘‘योगी’’।
‘‘ग्राससंख्यामाहापस्तंबः’’ सायं द्वाविंशतिर्ग्रासाः प्रातः षड्विंशतिः स्मृताः। चतुर्विंशतिरायाच्याः परं निरशनं स्मृतं।
कुक्कुटांडप्रमाणस्तु यथावास्यं विशेत्सुखं। ‘‘पारायर्शे तु’’ सायं तु द्वादश ग्रासाः प्रातः पंचदशैव तु इति पूर्वार्धं।
‘‘चतुर्विंशतिमते तु’’ प्रातस्तु द्वादश ग्रासाः सायं पंचदशैव तु।
अयाचिते तु द्वावष्टौ परे वै मरुताशन इति आसां च संख्यानां शक्त्या विकल्पः।
अतिकृच्छ्रे उपवासभिन्नवदिनभोजनेषु पाणिपूरान्नविधिः। पाणीपूरमेकग्रासमितं।
एकैकं ग्रासमश्र्नीयादहानि त्रीणि पूर्ववत्। त्र्यहं चोपवसेदंत्यमतिकृच्छ्रं चरन् द्विज इति ‘‘मनूक्तेः’’
कृच्छ्रादिकांचे स्वरूप.
लघुकृच्छ्र, प्राजापत्य व अतिकृच्छ्र यांचे स्वरूप घासांचे प्रमाण व संख्या.
‘‘याज्ञवल्क्य’’ दिवसां एकच वेळ भोजन, रात्रीं (दिवसां न जेवतां) एकदा भोजन, तसेंच कोणाजवळ न मागतां भोजन करणें व उपास हा पादकृच्छ्र सांगितला. याच पादकृच्छ्राची अनुलोमदंडकलितवदावृत्ति, प्रतिलोमदंडकलितवदावृत्ति, अनुलोमस्वस्थानवृद्धि व प्रतिलोमस्वस्थानवृद्धि या चार प्रकारांपैकी एका प्रकारानें तिप्पट केली असतां त्याला ‘‘प्राजापत्य’’ म्हटलें आहे. दुसर्या स्मृतींवरून सिद्ध होणार्या या चारही प्रकारांचा ‘‘यथाकथंचित्’’ या पदानेंच ‘‘योगी’’ (याज्ञवल्क्य) यानें संग्रह केला आहे. प्राजापत्य जसा सांगितमला त्याचप्रमाणें पाणिपूर एवढें अन्न खाणें याला ‘‘अतिकृच्छ्र’’ म्हटलें आहे. ‘‘आपस्तंब’’ घासांची संख्या सांगतो---रात्रीं भोजनांत बावीस घास घ्यावे. दिवसा अतिकृच्छ्रांत उपासावाचूनच्या नऊ दिवसांच्या जेवणांत ‘‘पाणिपूर’’ एवढें अन्न खावें असा विधि आहे. पाणिपूर म्हणजे एका घासाएवढें. कारण, ‘‘अतिकृच्छ्राचें आचरण करणार्या द्विजानें पूर्वीप्रमाणें तीन दिवस एकेक घास खावा, व शेवटी दहाव्या दिवसापासून तीन दिवस उपास करावा.’’ असें ‘‘मनुचें’’ म्हणणें आहे. लघुकृच्छ्राचेंच ‘‘शिशुकृच्छ्र’’ असें दुसरें नांव आहे. ‘‘आपस्तंब’’ घासांची संख्या सांगतो---रात्रीं भोजनांत बावीस घास घ्यावे. दिवसां जेवणांत सवीस घास व कोणाजवळ न मागतां जेवणें (आयत्रित) त्यांत चोवीस घास घ्यावे. उपास करणें झाल्यास बिलकूल कांही खाऊं नये. घास घेणे तो कोंबड्याच्या अंड्या एवढा असावा अथवा सुखानें (कष्ट न पडतां) जेवढा तोंडात जाईल तेवढा घास घ्यावा. ‘‘पराशरस्मृतींत’’ रात्रीं भोजनांत बारा घास व दिवसां भोजनांत पंधरा घास घ्यावे असें पूर्वार्ध आहे. ‘‘चतुर्तिंशतिमतांत’’ दिवसां जेवणांत बारा घास, रात्री पंधरा घास व कोशाणी न मागतां भोजन करणें त्यांत सोळा घास घ्यावे. उपासाच्या दिवशी केवळ वायु भक्षण करून रहावें (कांही खाऊं नये व पाणी देखील पिऊं नये). या घासांच्या संख्यांचा शक्तीप्रमाणें विकल्प समजावा.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP