प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६२ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘सकृव्द्यभिचरितविप्रादिवधे प्रचेताः’’ अनृतुमतीं ब्राह्मणीं हत्वा कृच्छ्राद्बं षण्मासान्वेति क्षत्रियां हत्वा षण्मासान्मासत्रयं वेति वेश्यां हत्वा मासत्रयं सार्धमासं वेति शूद्रां हत्वा सार्धमासं विंशत्यहानिवेति।
‘‘योगोश्र्वरोऽपि’’ अप्रदुष्टां स्त्रियं हत्वा शूद्रहत्याव्रतं चरेत् शूद्रहत्त्याव्रतं योगीश्र्वरोक्तं षाण्मासिकं दशधेनुकं वा।
अत्र षण्मासिकमज्ञानात् ब्राम्हणीवधे ज्ञानात् क्षत्रियावधे च। ज्ञानद्वैश्यावधे दशधेनुदानमिति विज्ञानेश्र्वरः’’।
‘‘क्वचित्तु स्त्रीवधे प्रयोजकस्य प्रायश्चित्ताभावमभ्युदयं चाहापरार्के व्यासः’’ अकामतः स्त्रियं हत्वा ब्राम्हणोवैश्यवच्चरेत्।
कामतो द्विगुणं प्रोक्तं प्रदुष्टायां न किंचन। पुण्यान्लोकानवाप्नोति शूद्रगां यस्तथा नयेत्।
पतिघ्नीमथ बालघ्नीं ताहि संकरकारिणीः।
एकवेळ व्यभिचार केलेल्या ब्राह्मणी वगैरेंचा बुद्धिपूर्वक व अबुद्धिपूर्वक वध केला तर प्रायश्चित्त.
‘‘ एक वेळा व्यभिचार केलेल्या ब्राम्हणी वगैरेंच्या वधाविषयीं प्रचेतस’’--- जी रजस्वाला (विटाळशी) नसेल अशा ब्राम्हणीचा वध केला असतां एक वर्ष पर्यंत किंवा सहा महिने पर्यंत कृच्छ्र (प्राजापत्य) करावे. क्षत्रियेस मारलें असतां सहा महिने किंवा तीन महिने पर्यंत, वैश्येस मारलें असतां तीन महिने किंवा दीड महिना पर्यंत, शूद्रीस मारलें असतां दीड महिना किंवा वीस दिवस पर्यंत कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. ‘‘याज्ञवल्क्य ही’’ ---किंचित् व्यभिचारी झालेल्या ब्राम्हणी वगैरेंचा वध केला असतां शूद्राच्या हत्त्येचें षाण्मासिक व्रत करावे, किंवा बारा गाईचें दान करावे. ‘‘हे षाण्मासिक व्रत अज्ञानानें ब्राह्मणीचा वध केला तर त्याविषयी आणि ज्ञानानें क्षत्रिया इत्यादिकांचा वध केला तर त्याविषयीं जाणावे. ‘‘ज्ञानानें वैश्येचा वध केला असतां दहा गाईंचें दान द्यावे’’ असे विज्ञानेश्र्वर म्हणतो. ‘‘क्वचित ठिकाणी अपरार्कांत व्यास स्त्रीच्या वधांत प्रयोजकास प्रायश्चित्ताचा अभाव व अभ्युदय (पुण्य) सांगतो’’---ब्राह्मणानें अज्ञानानें स्त्रीचा वध केला तर त्यानें वैश्येच्या वधाप्रमाणें प्रायश्चित्त करावे. जर बुद्धिपूर्वक वध केला तर दुप्पट प्रायश्चित्त सांगितलें आहे. व्यभिचारी स्त्रीचा वध केला असतां कांही प्रायश्चित्त नाही. जो शूद्राशीं गमन करणार्या ब्राह्मणी वगैरेंचा वध करील, तो पुण्यकारक अशा लोकांस जाईल. तसेंच नवर्यास मारणारी व बाळहत्त्या करणारी यांच्या वधाविषयी जाणावें. कारण, या संकर करणार्या (धर्म बुडविणार्या) आहेत.
Last Updated : January 17, 2018
TOP