मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १०० वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०० वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘सुरासंस्‍पृष्‍टट्रव्यस्‍याज्ञानतोभक्षणे आह मनुः’’ अज्ञानात्‍प्राश्य विण्मूत्रं सुरासंस्‍पृष्‍टमेव वा।
पुनःसंस्‍कारमर्हंति त्रयोवर्णा द्विजातयइति पुनसंस्‍कारश्र्च पुनरुपनयनामिति निबंधकृतः तस्‍य विधिरुक्तः संस्‍कारमयूखे।
‘‘यत्तु सुमंतुः’’ ब्राह्मणस्‍य सुरापस्‍य षण्मासाननुध्दृतसमुद्रोदकस्‍नानं सवित्र्यष्‍टसहस्रं जुहुयात्‍प्रत्‍यहं त्रिरात्रमुपवासस्‍तप्तकृच्छ्रेण पूतोभवतीति तत्‌ त्रैवार्षिकविषयं। ‘‘कामतः सकृत्‍पाने याज्ञवल्‍क्‍यः’’ सुरांबुघृतगोमूत्रपयसामग्‍निसन्निभं।
सुरापोऽन्‍यतमं पीत्‍वा मरणाच्छुद्धिमृच्छतीति। ‘‘यत्तु वसिष्‍ठः’’ अभ्‍यासे तु सुरायास्‍तु अग्‍निवर्णां सुरां पिबेदिति तदकामपरं।
‘‘गौडीमाध्व्योर्मत्‍याभ्‍यासेऽमत्‍या वात्‍यंताभ्‍यासे तु माधवीये व्यासः’’ मत्‍या मद्यममत्‍या वा पुनः पीत्‍वा द्विजोत्तमः।
ततोऽग्‍निवर्णां तां पीत्‍वा मृतः शुध्येत्‍स किल्‍विषात्‌

सुरेचा संबंध झालेल्‍या पदार्थाचें भक्षण झालें व ज्ञानानें एक वेळां सुरेचें पान केलें तर प्रायश्चित्त.

‘‘सुरेचा संबंध झालेल्‍या पदार्थाचें अज्ञानानें भक्षण झालें तर त्‍याविषयीं मनु सांगतो’’---ब्राम्‍हण, क्षत्रिय, व वैश्य हे तीन वर्ण जर अज्ञानानें विष्‍टा व मूत्र पितील किंवा सुरेचा संबंध असलेला पदार्थ खातील तर तें पुनः संस्‍कार स योग्‍य होतील, पुनः संस्‍कार म्‍हणजे पुनरुपनयन असें असें निबंधकार म्‍हणतात. त्‍याचा विधि संस्‍कारमयूखांत सांगितला आहे. ‘‘जें तर सुमंतु’’ सुरापान करणार्‍या ब्राह्मणानें सहा महिने पर्यंत शेंदून काढल्‍या शिवाय समुद्राच्या उदकानें स्‍नान करावें, दररोज गायत्रीमंत्रानें एक हजार आठ होम करावा. तीन दिवस उपास करून तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त करावें म्‍हणजे तो पवित्र होईल’’ असें म्‍हणतो तें तीन वर्षांच्या (त्र्यद्ब) प्रायश्चित्ताविषयीं जाणावें. ‘‘बुद्धिपूर्वक एकदां पान केलें तर त्‍याविषयी याज्ञवल्‍क्‍य’’---जर सुरापान करणारा सुरा, पाणी, तूप, गोमूत्र व दूध यांपैकी एखादा (पदार्थ) अग्‍निप्रमाणें लाल करून पिऊन मेला तर तो शुद्ध होईल. ‘‘जें तर वसिष्‍ठ’’ ‘‘सुरेचा (सुरा पिण्याचा) अभ्‍यास असतां तिला अग्‍नीप्रमाणें लाल करून प्यावें’’ असें म्‍हणतो तें अज्ञाना विषयीं जाणावें. ‘‘गौडी व माध्वी यांचा बुद्धिपूर्वक अभ्‍यास असतां किंवा अज्ञानानें अत्‍यंत अभ्‍यास असतां त्‍याविषयीं माधवी यांत व्यास’’---जो द्विजश्रेष्‍ठ बुद्धिपूर्वक किंवा अज्ञानानें मद्याचें पान करील, तो त्‍याला अग्‍नीप्रमाणें लाल करून पिऊन मरेल, तर तो त्‍या पातकापासून शुद्ध होईल.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP