प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३८ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अथगुणदुष्टाशने ‘‘तत्र मनुः’’ शुक्तानि च कषायांश्र्च पीत्वा मेध्यानपि द्विजः। तावद्भवत्यप्रयतो यावत्तन्न व्रजेदधः॥
शुक्तं कालपरिवासमात्रेण द्वव्यांतरसंसर्गकालपरिवासाभ्यां वा यत् अम्लीभवति।
अत्राकामतः शेषेषूपवसेदहरिति मनूक्त उपवासः ‘‘विष्णुरपि’’ यवगोधूमजं पयोविकारं स्नेहाक्तं चुक्रुषाभवं वर्जयित्वा पर्युषितं प्राश्योपवसेत् चुक्रुषाभवं सूपशास्त्रोक्तो व्यंजनविशेषः। ‘‘कामतस्तु शंखः’’ लोहितान् वृक्षनिर्यासान् व्रश्र्चनप्रभवांस्तथा।
केवलानि च शुक्तानि तथा पर्युषितं च यत्।
ॠजीषपक्वं भुक्त्वा च त्रिरात्रं तु व्रती भवेदिति एतच्चामलकादिफलयुक्तकाजिकादिव्यतिरेकेण ‘‘कुंडिका सफला येषु गृहेषु स्थापिता भवेत्। तस्यास्तु कांजिका ग्राह्या नेतरस्याः कदाचनेति ‘‘मिताक्षरायां स्मरणात्’’ ‘‘मनुः’’ दधि भक्ष्यं तु भुक्तेषु सर्वं च दधिसंभवं। यानि चैवाभिषूयंते पुष्पमूलफलैः शुभैरिति ‘‘उद्धतस्नेहादिषु तु गौतमः’’ उध्दृतस्नेहविलयनांपिण्याकमथितप्रभृतीनि च।
चात्तवीर्याणि नाश्र्नीयादित्युक्त्वा प्राक् पंचनखेभ्यश्छर्दनं घृतप्राशनं चेति।
‘‘पर्युषितापवादमाह याज्ञवल्क्यः’’ अन्न पर्युषितं भोज्यं स्नेहाक्तं चिरसंभृतं। अस्नेहा अपि गोधूमयवगोरसविक्रियाः।
‘‘अहुतान्नभोजने तु लिखित आह’’ यस्य चाग्नौ न क्रियते यस्य चाग्रं न दीयते। न तद्भोज्यं द्विजातीनां भुक्त्वा तूपवसेदहः
गुणाच्या योगानें दुष्ट झालेले शक्ते, काढे, जव, गहुं वगैरेपासून उत्पन्न झालेले शिळे पदार्थ वगैरे पदार्थ खाल्ले असतां प्रायश्चित्त.
गुणाच्या योगानें दुष्ट झालेल्याच्या (अन्नादिकांच्या) भक्षणाविषयीं---त्याविषयीं ‘‘मनु’’---जो ब्राह्मण शुक्तें व पवित्र असें कषाय प्याल्यानंतर जोपर्यंत तें खालीं जाणार नाहींत तों पर्यंत तो अशुद्ध असतो. काळाच्या संबंधानें किंवा दुसर्या द्रव्यांचा संबंध व कालपरिवास यांच्या योगानें आंबुस होणारें जें तें शुक्त होय. येथे अज्ञानानें ‘‘बाकी राहिलेल्यांच्या ठिकाणीं एक उपास करावा’’ याप्रमाणें मनुनें सांगितलेला उपवास करावा. ‘‘विष्णुही’’---जव व गहुं या पासून होणारें, दुधाचा विकार, तेलांत तळलेसें, चुक्रुषाभव हे पदार्थ सोडून जर शिळें खाल्लें तर एक दिवस उपास करावा. चुक्रुषभव या नांवाची सूप शास्त्रांत सांगितलेली एक विशेष प्रकारची चटणी. ‘‘बुद्धिपूर्वकाविषयीं तर शंख’’---तांबड्या रंगाचे झाडाचे चीक (डिंक), तसेंच व्रश्र्चनापासून उत्पन्न झालेले, केवळ शुक्तें शिळें व कढई वगैरेंत शिजलेलें हीं खाल्लीं असतां तीन दिवस पर्यंत व्रत करावे. हें आवळे इत्यादि फळांनीं युक्त अशा कांजिकादि पदार्थाशिवाय दुसर्या विषयीं जाणावे. कारण, ‘‘ज्या घरांत फळांनीं युक्त अशी ही कुंडी ठेवली असेल, तिची कांजी घ्यावी. दुसरीची केव्हांही घेऊं नये असें मिताक्षरेंत सांगितलें आहे. ‘‘मनु’’---सर्व भक्ष्यपदार्थांत दहि हे भक्षण करण्यास योग्य आहे. तसेंच दह्यापासून होणारें सर्व भक्ष्य आहे. तसेंच शुभ अशीं फुलें, मुळें व फळें यांच्या योगानें जीं करण्यांत येतात तींही भक्ष्य होत. ‘‘ज्यांतून तेल वगैरे काढून आहे इत्यादिकांविषयी तर गौतम’’---ज्यांतून तेल काढलें आहे तें, तूप वगैरेंचा मळ, पिण्याक (पेंड), मथित वगैरे व ज्यांच्यापासून सत्व काढून घेतलें आहे तीहीं खाऊं नयेत’’ असें पंचनखांच्या पूर्वी सांगून उलटी व घृतप्राशन करावें. ‘‘याज्ञवल्क्य शिळ्याचा अपवाद सांगतो’’---पुष्कळ वेळ ठेवलेलें तेलानें युक्त असें शिळें अन्न खाण्यास हरकत नाहीं. तेलानें रहित असेंही गहूं, जव, व गोरस यांचे विकार खाण्यास हरकत नाही. ‘‘अग्नीत होम न केलेल्या अन्नाविषयीं लिखित सांगतो’’---जें अग्नींत देण्यांत येत नाही, ज्यांचें शेषही देण्यांत येत नाहीं असे अन्न द्विजांस खाण्यांस अयोग्य आहे. जर खातील तर त्यांनीं एक दिवस उपवास करावा.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP