‘‘अथ भगिन्यादिगमने मनुः’’ रेतः सेकः कुमारीषु स्वयोनिष्वंत्यजासु च।
सख्युः पुत्रस्य च स्त्रीषु गुरुतल्पसमं विदुरिति स्वयोनिर्भगिनी कुमारी।
उत्तमजातीयाकन्या ‘‘सकामास्वनुलोमासु न दोषस्त्वन्यथा दमः।
दूषणे तु करछेद उत्तमायां वधस्तेथेति तत्रैव दंडविशेषोक्तेः’’ ‘‘याज्ञवल्क्यः’’ सखिभार्याकुमारीषु स्वयोनिष्वंत्यजासु च।
सगोत्रासु सुतस्त्रीषु गुरुतल्पसमं स्मृतमिति। ‘‘अंत्यवसायिन आह मध्यमांगिराः’’ चंडालः श्र्वपचः क्षत्ता सूतोवैदेहकस्तथा।
मागधायोगवौ चैव सप्तैतेंत्यावसायिन इति। ‘‘चांडालादीनाह याज्ञवल्क्यः’’ ब्राह्मण्यां क्षत्रियात्सूतो वैश्याद्वैदेहकस्तथा।
शूद्राज्जातस्तु चंडालः सर्वधर्मबहिष्कृतः। क्षत्रिया मागधं वैशत् शूद्रात्क्षत्तारमेव च। शूद्रादायोगवं वैश्या जनयामास वै सुतमिति।
‘‘विष्णुः’’ पितृव्यमातामह मातुलपत्न्याभिगमनं गुरुदारगमनसमं पितृष्वसुर्गमनं श्रोत्रियॠत्विगुपाध्यायमित्रपत्न्यभिगमनं चेति अत्र साम्यातिदेशादर्धं प्रायश्चित्तमित्युक्तं परिभाषायां। ‘‘याज्ञवल्क्यः’’ पितुः स्वसारं मातुश्र्च मातुलानीं स्नुषामपि।
मातुः सपत्नीं भगिनीमाचार्यतनयां तथा।
आचार्यपत्नीं स्वसुतां गच्छंस्तु गुरुतल्पग इति मातुः सपत्नी हीनवर्णा समोत्तमवर्णागमनस्य गुरुतल्पत्वोक्तेः।
‘‘नारदः’’ माता मातृष्वसा श्र्वश्रूर्मातुलानी पितृष्वसा।
पितृव्यसखिशिष्यस्त्री भगिनी तत्सखी स्नुषा। दुहिताचार्यभार्या च सगोत्रा शरणागता। राज्ञी प्रव्रजिता साध्वी धात्री वर्णोत्तमा च या।
आसामन्यतमां गच्छन्गुरुतल्पग उच्यत इति राज्ञी अभिषिक्तक्षत्रियपत्नी क्षत्रियांतरपत्न्यां लघुप्रायश्चित्तस्य वक्ष्यमाणत्वात्।
मातृग्रहणं दृष्टांतार्थं अत्र च ताद्रूप्यातिदेशेतिदिश्यमानं प्रायश्चित्तं पादोनं भवतीति व्युदपादि परिभाषायामेव।
तच्चाकमत एकरात्रादूर्ध्वं अत्यंताभ्यासविषयं। ‘‘अत्रैव कामतोऽत्यंताभ्यासे तु बृहद्यमः’’ रेतः सिक्त्वा कुमारीषु स्वयोनिष्वंत्यजासु च।
सपिंडापत्यदारेषु प्राणत्यागोविधीयतइति
कुमारी, बहीण, अंत्यजांची स्त्री, मित्राची स्त्री वगैरेंशी गमन केलें तर, तसेंच आई, मावशी, मामी वगैरेंशी गमन केलें तर प्रायश्चित्त. अंत्यज.
‘‘भगिनी वगैरेंच्या गमनाविषयी मनु’’--- कुमारी, बहीण, अंत्यजा, मित्राची स्त्री व पुत्राची स्त्री (सून) यांशीं गमन केलें तर तें गुरुतल्पाप्रमाणें सांगतात. कुमारी म्हणजे उत्तम जातींतील कन्या. कारण ‘‘सकाम अशा अनुलोमांच्या कन्यांशीं गमन केलें तर दोष नाही. या शिवाय विपरीत गमन केलें तर दंड आहे. तिला दूषित केलें तर हाताचा छेद करावा. आपल्यापेक्षां उत्तम वर्णाच्या कन्येशीं गमन केलें तर वध करावा.’’ याप्रमाणें त्यांतच (मनुस्मृतींतच) विशेष दंड सांगितला आहे. ‘‘याज्ञवल्क्य’’---मित्राची स्त्री, कुमारी, बहीण, अंत्यज स्त्री, आपल्या गोत्रांतील स्त्री व सून यांच्याशीं गमन केलें तर तें गुरुतल्पाप्रमाणें सांगितलें आहे. ‘‘मध्यमांगिरस् अंत्यज सांगतो.’’ चांडाळ, श्र्वपाक, क्षत्ता, सूत, वैदेहक, मगध व अयोगव हे सात अंत्यज होत. ‘‘याज्ञवल्क्य चांडाळ वगैरे सांगतो’’---ब्राह्मणीस क्षत्रियापासून जो होतो तो सूत होय, वैश्यापासून होणारा तो वैदेहक, शूद्रापासून होणारा चांडाळ होय, तो सर्व धर्मांत बहिष्कृत समजावा. क्षत्रियाच्या स्त्रीस वैश्य पुरुषापासून होणारा मागध व शूद्रापासून होणारा क्षता जाणावा. वैश्याच्या स्त्रीस शूद्रापासून जो पुत्र होतो तो अयोगव होय. ‘‘विष्णु’’---चुलता, आईचा बाप व मामा यांच्या स्त्रिया तसेंच बापाची बहीण (आते), श्रोत्रिय (वैदिक, ॠत्विक्, उपाध्याय व मित्र यांच्या स्त्रिया यांशीं गमन करणें तें गुरूच्या (बापाच्या) स्त्रीशीं गमन केल्यासारखें होतें. या वचनांत साम्याति देश आहे म्हणून अर्धे प्रायश्चित्त असें परिभाषेंत सांगितलें. ‘‘याज्ञवल्क्य’’---बापाची बहीण (आते), आईची बहीण (मावशी), मामी, सावत्र आई, बहीण, आचार्याची मुलगी, आचार्याची स्त्री व आपली मुलगी यांच्याशीं गमन करणारा गुरुतल्पग होतो. सावत्र आई आईच्या वर्णापेक्षां कमी वर्णाची जाणावी. कारण, सारखी आणि उत्तम वर्णाची अशाशी गमन करणें त्याला गुरुतल्पत्व म्हटलें आहे. ‘‘नारद’’---आई, आईची बहीण, सासू, मामी, बापाची बहीण (आते), चुलता, मित्र व शिष्य यांच्या स्त्रिया, बहीण, तिची मैत्रीण, सून, मुलगी, आचार्याची स्त्री, आपल्या गोत्रांतील स्त्री, शरण आलेली स्त्री, राणी, गृहस्थाश्रम सोडून विरक्त झालेली स्त्री पतिव्रता, दाईण व श्रेष्ठवर्णाची स्त्री यांतून एखाद्या स्त्रीशीं गमन करणार्यास गुरुतल्पग म्हणण्यांत येते. राणी (राज्ञी) ह्मणजे ज्याला राज्याभिषेक झाला आहे अशा क्षत्रियाची स्त्री जाणावी. कारण, दुसर्या क्षत्रियाच्या स्त्रीविषयीं थोडें प्रायश्चित्त सांगण्यांत येणार आहे. मातेचें ग्रहण केलें हें दृष्टांतासाठी आहे. येथें ताद्रूप्यातिदेशाविषयीं दाखविण्यांत येणारें प्रायश्चित्त चतुर्थांशानें कमी (तीन चतुर्थांश) होतं असें परिभाषेंतच दाखविलें आहे. तें अबुद्धिपूर्वक एका दिवसापेक्षां अधिक अशा अत्यंत अभ्यासाविषयी जाणावे. ‘‘याचविषयी बुद्धिपूर्वक अत्यंत अभ्यास असतां बृहद्यम’’---कुमारी, बहीण, अंत्यजसस्त्री व आपल्या सपिंडांत उत्पन्न झालेल्याची स्त्री यांच्यांशीं गमन केलें तर प्राणाचा नाश करण्यांत यावा.