मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १०९ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०९ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ शरीरमलभक्षणप्रायश्चित्तं.

‘‘तत्र मलानाह मनुः’’ वसाशुक्रमसृङ्‌मज्‍जामूत्रविट्‌कर्णविट्‌नखाः। श्र्लेष्‍माश्रुदूषिकास्‍वेदो द्वादशैते मला नृणां।
‘‘प्रायश्चित्त माह योगीश्र्वरः’’ अज्ञानात्तु सुरां पीत्‍वा रेतोविण्मूत्रमेव च।
पुनः संस्‍कारमर्हति त्रयोवर्णा द्विजातयः पुनः संस्‍कारः पुनरुपनयनं।
इदं च प्रातिस्‍विकैः शारीरमलभक्षणप्रायश्चित्तैः समुच्चीयत इति शूलपाणिः। स्‍वतंत्रमेव प्रायश्चित्तमित्‍यन्ये।
‘‘अज्ञानतः सकृद्भक्षणे तु संवर्तः’’ विण्मूत्रभक्षणे विप्रः प्राजापत्‍यं समाचरेत्‌।
‘‘ज्ञानतः सकृद्भक्षणे तु अंगिराः’’ प्राजापत्‍यं चरे द्वैश्योऽतिकृच्छ्रं क्षत्रियश्र्चरेत्‌।
कृच्छ्रातिकृच्छ्रौ कुर्वीत विप्रो विण्मूत्रभक्षण इति ‘‘यत्तु वसिष्‍ठः’’ मत्‍याऽमत्‍या मद्यपाने सुरायाश्र्चाज्ञाने कृच्छ्रातिकृच्छ्रौ घृतप्राशनं पुनःसंस्‍कारो मूत्रशकृच्छुक्राभ्‍यवहारेषु चैवमिति तदपि विप्रस्‍य ज्ञानतः सकृद्भक्षणे।
‘‘अस्‍मिन्नेव विषये गौतमः’’ अमत्‍या मद्यपाने पयोघृतमुदकं वायुः प्रतित्र्यहं तप्तानि सतप्तकृच्छ्रः ततः संस्‍कारो मूत्रपुरीषरेतसां प्राशने चैवमिति। ‘‘यत्तु बृहस्‍पतिः’’ रेतोमूत्रपुरीषाणां शुध्यै चांद्रायणं चरेत्‌ इति तदमतिपूर्वाभ्‍यासविषयं।
‘‘केशादिभक्षणे षट्‌त्रिंशन्मते’’ केशनखरुधिराशने मतिपूर्वं त्रिरात्रमज्ञानादुपवासः।
‘‘यत्तु स्‍मृत्‍यंतरं’’ केशकीटनाखं प्राश्य मत्‍स्‍यकंटकमेव च। हेमतप्तघृतं पीत्‍वा तत्‍क्षणादेव शुध्यति तन्मुखमात्रप्रवेशविषयं।
‘‘प्रचेताः’’ अन्ने भोजनकाले तु मक्षिकाकेशदूषिते। अनंतरं स्‍पृशेदापस्‍तच्‍चान्नं भस्‍माना स्‍पृशेत्‌।

शरीराच्या मळांच्या भक्षणाचें प्रायश्चित्त.

ज्ञानानें व अज्ञानानें चरबी, रेत, रक्त, मज्‍जा वगैरे शरीराचे बारा मळ भक्षण केलें असतां प्रायश्चित्त.

‘‘मनु मळ सागतो’’---चरबी, रेत, रक्त, मज्‍जा, मुत, विष्‍ठा, कानांतील मळ, नख, कफ (खाकरा), डोळ्यांतील आसवें, डोळ्यांतील मळ (पू) व घाम हे बारा मनुष्‍यांचे मळ होत. ‘‘याज्ञवल्‍क्‍य प्रायश्चित्त सांगतो’’---ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तीन वर्णांनी अज्ञानानें सुरा, रेत, विष्‍ठा व मूत्र यांचें भक्षण केलें असतां ते पुनरुपनयनास योग्‍य होतात. हें (प्रायश्चित्त) आपआपल्‍या शरीराच्या मळांच्या भक्षणांच्या प्रायश्चित्तांच्या समुदायांत गणण्यांत येते असें ‘शूलपाणी’ म्‍हणतो. हें स्‍वतंत्रच प्रायश्चित्त असें दुसरें म्‍हणतात. ‘‘अज्ञानानें एक वेळां भक्षण केलें असतां संवर्त’’---विप्रानें विष्‍ठा व मूत्र यांचें भक्षण केलें तर प्राजापत्‍य प्रायश्चित्त करावें. ‘‘ज्ञानानें एक वेळां भक्षण केलें तर त्‍या विषयीं अंगिरस्‌’’---वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण यांनी विष्‍ठा व मूत्र यांचें भक्षण केलें तर क्रमानें प्राजापत्‍य, अतिकृच्छ्र व कृच्छ्रातिकृच्छ्र प्रायश्चित्त करावे. ‘‘जें तर वसिष्‍ठ’’ ‘‘जाणून किंवा न जाणतां मद्यपान केलें, तसेंच अज्ञानानें सुरेचें पान केलें तर कृच्छ्र व अतिकृच्छ्र करून तूप प्यावें आणि पुन्हां मौंजीबंधन (पुनरुपनयन) करावें. मुत, विष्‍ठा व रेत यांच्या भक्षणाविषयीं असेंच जाणावें’’ असें म्‍हणतो तेंही ब्राह्मणास बुद्धिपूर्वक एक वेळां भक्षण केलें असतां त्‍याविषयी जाणावें. ‘‘याच विषयावर गौतम’’---जर अज्ञानानें मद्यपान केलें तर दुध, तूप, पाणी व वायु या चार पदार्थांपैकी प्रत्‍येक पदार्थ तीन तीन दिवसपर्यंत तापवून प्यावा, हा तप्तकृच्छ्र होय, नंतर पुनरुपनयन करावें. मुत, विष्‍ठा शुक्र यांचें भक्षण घडलें तर त्‍या विषयीही असेंच जाणावे. ‘‘जें तर बृहस्‍पति’’ शुक्र, मुत व पुरीष यांच्या शुद्धी करितां चांद्रायण करावें’’ असें म्‍हणतो तें अबुद्धिपूर्वक अभ्‍यासाविषयी जाणावे. ‘‘केसादिकांच्या भक्षणाविषयी षट्‌त्रिंशन्मतांत’’ जर बुद्धिपूर्वक केस, नखें व रक्त यांचें भक्षण केलें तर तीन दिवस उपास व अज्ञानानें यांचें भक्षण केलें तर एक दिवस उपास करावा. ‘‘जी तर दुसरी स्‍मृति’’ ‘‘केस, किडे, नख व माशाचा काटा यांचें भक्षण केलें तर सोनें घालून तुप प्यावें म्‍हणजे त्‍याच क्षणी शुद्धि होईल’’ अशी आहे तो केवळ तोंडांत प्रवेश केला असतां त्‍याविषयी आहे. ‘‘प्रचेतस्‌’’---भोजनाच्या वेळीं माशी व केस यांच्या योगानें अन्न दूषित झाले असतां लागलीच उदकाचा स्‍पर्श करून त्‍या अन्नास भस्‍माचा स्‍पर्श करावा.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP