प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘बृहस्पतिः’’ कामाकामकृतं त्वेव पातकं द्विविधं स्मृतं।
पुरुषा पेक्षया चैव निष्कृतिर्द्विविधा स्मृतेति।
यत्तु ‘‘याज्ञवल्क्यवाक्ये’’ प्रायश्चित्तैरपैत्येनौ यदज्ञानकृतं भवेत्।
कामतो व्यवहार्यस्तु वचनादिह जायते इत्यज्ञानपदं तदप्यकामपरं।
अत एव तत्प्रतियोगिरूपं कामतः पदं संगच्छते।
एवं वाक्यांतरीयाणि बुद्धिज्ञानभिसंघिपदानि कामपराणि।
अबुध्द्यज्ञानाभिसंधिपदानि चाकामपराणि।
तेन बलात्कारिते पापे सत्यपि ज्ञानेन द्विगुणं प्रायश्चित्तं तत्प्रयोजककामाभावात्।
अत्राकाम कृतपापस्य व्यवहारनिरोधिका नरकजनिका चेति शक्तिद्वयमपि नश्यति प्रायश्चित्तेन।
कामकृतस्य तु व्यवहारनिरोधिकैव नश्यति। न तु नरकानुकूलेति विज्ञानेश्र्वरादयो निबंधकृतः
ज्ञानानें व अज्ञानानें केलेल्या पापांच्या प्रायश्चित्ताची व्यवस्था.
ज्ञानानें व अज्ञानानें करण्यांत येणारे प्रायश्चित्ताचें दोन प्रकार.
‘‘बृहस्पति’’ -ज्ञानानें केलेलें असे पातकाचे दोन प्रकार आहेत. पुरुषाच्या अपेक्षेनें त्याची निष्कृति दोन प्रकारची सांगितली आहे. जे तर ‘‘याज्ञवल्क्याच्या’’ वचनांत ‘‘जे अज्ञानानें केलेलें पातक असतें तें प्रायश्चित्तांनी नाहीसें होते. ज्ञानानें केलेलें नाहींसे होत न ाही. परंतु त्या ठिकाणी प्रायश्चित्त विधायक वचनाच्या बलावरून लोकांत तो व्यवहार करण्यास योग्य होतो. ’’ अज्ञान असं पद आहे तें अकामपर आहे, म्हणून च त्याच्याशी विरूद्ध असलेले ‘‘कामतः’’ (इच्छेनें) या पदाची संगति लागते. या प्रमाणें बुद्धि, ज्ञान यांच्याशी संबंध ठेवणारी दुसरीं वाक्यें कामापर (इच्छापर) समजावी आणि अबुद्धि व अज्ञान यांच्याशी संबंध ठेवणारी अकाम (अनिच्छा) पर समजावी. त्यावरून बलात्कारानें घडलेल्या पातका विषयी ज्ञान असूनही दुप्पट प्रायश्चित्त नाही. कारण, त्या पापास कारणभूत इच्छेचा अभाव आहे. येथे अज्ञानानें केलेल्या पापाच्या ‘‘व्यवहार निरोधिका’’ (व्यवहारास प्रतिबंध करणारी) आणि ‘‘नरकजनिका’’ (नरकाची प्राप्ति करणारी) अशा दोन्ही शक्ति प्रायश्चित्ताच्या योगानें नाहींशा होतात. बुद्धिपूर्वक केलेल्या पातकाची ‘‘व्यवहारनिरोधिका’’ शक्तिच प्रायश्चित्ताच्या योगानें नाहींशी होते. ‘‘नरकानुकूला’’ नाहीशी होत नाही असें ‘‘विज्ञानेश्र्वरादिक’’ निबंधकार म्हणतात.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP