प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११९ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथ हस्तदत्तादिभक्षणे प्रायश्चित्तमाह यमः’’ माक्षिकं फाणितं शाकं गोरसं लवणं घृतं।
हस्तदत्तानि भुक्त्वा तु भोक्ता सांतपनं चरेत् एतत्कामतः सांतपनं दिनत्रयसाध्यं।
‘‘अकामतस्त्वाह पराशरः’’ माक्षिकं फाणितं शाकं गोरसं लवणं घृतं।
हस्तदत्तानि भुक्त्वा तु दिनमेकभोजनमिति फाणितं इक्षुरसविकारविशेषः
हातानें वाढलेले मध, काकवी वगैरे पदार्थ खाल्ले तर प्रायश्चित्त.
‘‘हातानें वाढलेल्या मधादिकांचें भक्षण केलें असतां यम प्रायश्चित्त सांगतो’’---मध, काकवी, भाजी, दुध, दहि, मीठ व तुप ही हातानें वाढलेली खाल्ली तर भोजन करणारानें तीन दिवसांनीं साध्य होणारें सांतपन करावे. हें (प्रायश्चित्त) बुद्धिपूर्वका विषयीं जाणावे. ‘‘अज्ञानानें खाल्ले तर त्याविषयी पराशर सांगतो’’ मध, काकवी, भाजी, दुध, दही, मीठ व तुप हे पदार्थ हातानें वाढलेले खाल्ले तर एक दिवस उपास करावा.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP