प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘उच्छिष्टापवादमाहपस्तंबः’’ पितुर्जेष्ठस्य च भ्रातुरुच्छिष्टं भोज्यं।
‘‘आपदि शूद्रगृहभोजने तु पराशरः’’ आपत्काले तु विप्रेण भुक्तं शुद्रगृहे यदि।
मनस्तापेन शुद्धयेत्तु द्रुपदानां शतं जपेत्। ‘‘दीपोच्छिष्टभक्षणे षट्त्रिंशन्मते’’ दीपोच्छिष्टं तु यत्तैलं रात्रौ रथ्याहृतं च यत्।
अभ्यंगाच्चैव यच्छिष्टं भुक्त्वा नक्तेन शुध्यति तैलग्रहणात् घृते न दोषः
बाप व वडील भाऊ यांचें उष्टें खावे. संकटकाळीं शूद्राचें घरीं खाल्लें तर, दिव्याचें शेषतेल खाल्लें तर प्रायश्चित्त.
‘‘आपस्तंब उष्ट्याचा अपवाद सांगतो’’-- बापाचें व वडील भावाचें उष्टें खावें. ‘‘संकटकाळी शूद्राच्या घरीं भोजनाविषयीं पराशर’’---जर संकट प्रसंगीं ब्राह्मणानें शूद्राचें घरीं खाल्लें तर तो अनुतापानें शुद्ध होईल व त्यानें द्रुपदेचा शंभरवेळा जप करावा. ‘‘दिव्याच्या उष्ट्याचे भक्षणाविषयीं षट्त्रिंशन्मतांत’’ दिव्याचें जळून बाकी राहिलेलें तेल, रात्रीं रस्त्यांतून आणलेलें तेल, अभ्यंगापैकी बाकी राहिलेलें तेल ही भक्षण केलें असतां नक्तानें शुद्धि होईल. तेल असें म्हटलें त्यावरून तुपाविषयीं दोष नाही.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP