प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६९ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘इतरत्र त्वापस्तंबः’’ कांतारेष्वथ दुर्गेषु गृहदाहे खलेषु च।
यदि तत्र विपत्तिः स्यात्पाद एको विधीयत इति।
‘‘पराशरः’’ दहनात्तु विपद्येत अनड्वान् योक्त्रयंत्रितः। उक्तं पराशरेणैव ह्येकपादं यथा विधीति।
‘‘बलछलादिनान्येन कारिते रोधादौत्वापस्तंबः’’ पादमेकं चरेद्रोधे द्वौ पादौ बंधने चरेत्।
योजने पादहीनं स्याच्चरेत्सर्वं निपातने इति। ‘‘पराशरः’’ गवां बंधनयोक्त्रैस्तु भवेन्मृत्युरकामतः।
अकामकृतपापस्य प्राजापत्यं विनिर्दिशेत्। प्रायश्चित्ते ततश्र्चीर्णे कुर्याद्ब्राह्मणभोजनं।
अनुडुत्सहितां गां च दद्याद्विप्राय दक्षिणामिति
मोठीं अरण्यें वगैरे ठिकाणी गाय मेली असतां तसेंच रोध बंधनादिकांचे ठिकाणीं प्रायश्चित्त
‘‘इतर ठिकाणी तर आपस्तंब’’---मोठी आरण्यें, पर्वत इत्यादि कठीण स्थळें, घरास आग लागणें व खळीं यांच्या ठिकाणीं जर गाय मेली तर एक चतुर्थांश प्रायश्चित्त करावें. ‘‘पराशर’’---मानेवर जूं दिलेला बैल जर भाजून मेला तर पराशरानें विधी प्रमाणें एक चतुर्थांश प्रायश्चित्त सांगितलें आहे. ‘‘जर शक्ति, हेका इत्यादिकाच्या योगानें दुसर्याकडून रोधादि करविलें असतां आपस्तंब’’---रोधाच्या ठिकाणीं चतुर्थांश प्रायश्चित्त, बंधनाच्या ठिकाणीं दोन चतुर्थांश (१/२), योक्त्राच्या ठिकाणीं तीन चतुर्थांश व निपातनाच्या ठिकाणीं सर्व प्रायश्चित्त करावे. ‘‘पराशर’’---जर अज्ञानानें बंधन व योक्त्र यांच्या योगानें गाईंचा मृत्यु होईल तर अज्ञानानें केलेल्या त्या पापास प्राजापत्य प्रायश्चित्त सांगावे. प्रायश्चित्त केल्यानंतर ब्राह्मणभोजन करावें, आणि ब्राह्मणास बैला सकट एक गाय दक्षिणा द्यावी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP