‘‘अथ सुवर्णस्तेयसमेषु मनुः’’ निक्षेपस्यापहरणं नराश्र्वरजतस्य च। भूमिवज्रमणीनां च रुक्मस्तेयसमं स्मृतं।
‘‘स्मृत्यंतरे’’ पुरुषाणां कुलीनानां नारीणां च विशेषतः। मुख्यानां चैव रत्नानां हरणे वधमर्हति ‘‘याज्ञवल्क्यः’’ अश्र्वरत्नमनुष्यस्त्रीभूधेनुहरणं तथा। निक्षेपस्य च सर्वस्य सुवर्णस्तेयसंमितं। मनुश्यग्रहणेनैव सिद्धे स्त्रीपदं षंढव्यावृत्यर्थं।
‘‘विष्णुः’’ ब्राह्मणभूहरणं सुवर्णस्तेयसममिति अत्र षडद्बमित्युक्तं परिभाषायां।
अल्पमूल्यरत्नादौ तु ‘‘चतुर्विंशतिमते’’ रत्नानां हरणे विप्रश्र्चरेच्चांद्रायणत्रयमिति ‘‘मनुरपि’’ मणिमुक्ताप्रवालानां ताम्रस्य रजतस्य च।
अयः कास्योपलानांच द्वादशाहं कणान्नता ‘‘स एव’’ मनुष्याणां तु हरणे स्त्रीणां क्षेत्रगृहस्य च।
वापीकूपतडागानां शुध्दौ चांद्रायणं स्मृतमिति मनुष्योदासः स्त्रीदासी। ‘‘स्मृत्यंतरे’’ रुप्यं हृत्वा द्विजो मोहाच्चरेश्र्चांद्रायणं व्रतं।
गद्याणदशकादूर्ध्वमाशताद्विगुणं चरेत्। आसहस्राच्च त्रिगुणमूर्ध्वं हेमविधिः स्मृत इति गद्याणो गुर्जरदेशे प्रसिद्धः। रत्नताम्रयःकांस्यमनुष्यापहारेष्वपि प्रायश्चित्तेयत्तार्थमियमेव मूल्येयत्ताज्ञेया
ठेव, मनुष्य, घोडा, रुपें, भूमि वगैरेंची चोरी करणें ती सोन्याच्या चोरीप्रमाणें मानिली आहे. यांची चोरी केली असतां प्रायश्चित्त.
‘‘सोन्याच्या चोरीसारख्या दुसर्या पदार्थाविषयीं मनु’’---ठेव ठेवलेली बुडविणें, मनुष्य, घोडा, रुपें, भूमि, हिरा व मणि यांची चोरी करणें हें सोन्याच्या चोरीप्रमाणें मानिलें आहे. ‘‘दुसर्या स्मृतींत’’ पुरुष, कुलीन स्त्रिया व विशेषें करून श्रेष्ठ अशी रत्नेंयांचा जो चोरी करील तो वधास पात्र होईल. ‘‘याज्ञवल्क्य’’---घोडा, रत्न, पुरुष, स्त्री, भूमि व गाय यांची चोरी करणें तसेंच सगळ्या ठेवीचा अपहार करणें हें सोन्याच्या चोरीप्रमाणें होतें (सदर वाक्यांत) मनुष्याचे ग्रहणावरूनच कार्य झालें असून पुन्हा स्त्रीपद घेतलें तें नपुंसकाच्या निवारणासाठी आहे. ‘‘विष्णु’’---ब्राह्मणाच्या भूमीचें हरण करणें तें सोन्याच्या चोरीसारखें आहे. याविषयीं षडद्ब प्रायश्चित्त असें परिभाषेंत सांगितलें आहे. ‘‘कमी किंमतीच्या रत्नादिकाविषयीं तर चतुर्विंशतिमतांत’’ ब्राह्मणानें रत्नांच्या चोरीविषयी तीन चांद्रायणें करावी. ‘‘मनुही’’---मणि, मोती, पोवळें, तांबें, रुपें, लोखंड, कांसें व दगड यांची चोरी केली असतां बारा दिवसपर्यंत उपास करावा. ‘‘तोच’’---पुरुष नोकर, स्त्री नोकर, शेत, घर, विहीर, कुवा व तळें यांचा अपहार केला असतां चांद्रायण प्रायश्चित्त सांगितलें आहे. ‘‘दुसर्या स्मृतींत’’ जर द्विजानें अज्ञानानें रुपें चोरलें तर त्यानें चांद्रायण करावें. दहा गद्याणांपासून शंभर गद्याणांपर्यंत दुप्पट (दोन चांद्रायणें), हजारापर्यंत तिप्पट (तीन चांद्रायणें) आणि त्याच्यापुढें सोन्याच्या चोरीचें प्रायश्चित्त सांगितलें. गद्याणा हा गुजराथ देशांत प्रसिद्ध आहे. रत्न, तांबे, लोखंड, कांसें व मनुष्य यांच्या अपहाराविषयींही प्रायश्चित्ताच्या इयत्तेसाठी हींच किंमतीची इयत्ता जाणावी.