प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १११ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘वृद्धविष्णुः’’ ब्राम्हणः शूद्रोच्छिष्टाशने सप्तरात्रं पंचगव्यं पिबेत्।
वैश्योच्छिष्टाशने पंचरात्रं राजन्योच्छिष्टशने त्रिरात्रं ब्राम्हणोच्छिष्टाशने त्वेकाहमिति।
‘‘अकामतोविप्रस्य विप्राद्युच्छिभक्षणे शंखः’’ ब्राम्हणोच्छिष्टाशने महाव्याहृतिभिरभिमंत्र्यापः पिबेत्।
क्षत्रियोच्छिष्टाशने ब्राह्मीरसविपक्केव त्र्यहं क्षीरेण वर्तयेत्। वैश्योच्छिष्टभोजने त्रिरात्रोपोषितो ब्राह्मीं सुवर्चलां पिबेत्।
शूद्रोच्छिष्टभोजने षड्रात्रं तप्तभोजनमिति ‘‘अकामतोऽभ्यासे तु यमः’’ भुक्त्वा सह ब्राह्मणेन प्राजापत्येन शुध्यति।
भूभुजा सह भ्ज्ञुक्त्वान्नं तप्तकृच्छ्रेण शुध्यति। वैश्येन सह भुक्त्वान्नमतिकृच्छ्रेण शुध्यति।
शूद्रेण सह भुक्त्वान्नं चांद्रायणमथाचरेत् इति इदं कामाभ्यासविषयमिति विज्ञानेश्र्वरः कामतोऽभ्यासे त्वेतदेव द्विगुणं कल्प्यं विज्ञानेश्र्वरमते त्वकामतोऽभ्यासेर्धं
ब्राह्मणानें ज्ञानानें व अज्ञानानें शूद्र वगैरेंचें उष्टें खाल्लें तर प्रायश्चित्त.
ब्राह्मणानें शूद्राचें उष्टें खाल्लें तर सात दिवसपर्यंत पंचगव्य प्यावें. वैश्याचें उष्टें खाल्लें तर पांच दिवसपर्यंत, क्षत्रियाचें उष्टें खाल्लें तर तीन दिवसपर्यंत व ब्राह्मणाचें उष्टें खाल्लें तर एक दिवस पंचगव्य प्यावें. ‘‘अज्ञानानें ब्राह्मणास ब्राह्मणादिकांच्या उष्ट्याचें भक्षण घडलें तर त्याविषयी शंख’’---ब्राह्मणानें ब्राह्मणाचें उष्टें खाल्लें तर महाव्याहृतींनीं अभिमंत्रित केलेलें उदक प्यावें. क्षत्रियाचें उष्टें खाल्लें तर तीन दिवसपर्यंत ब्राह्मीच्या रसांत शिजलेलें दुध प्यावें. वैश्याचें उष्टें खाल्लें तर तीन दिवसपर्यंत उपोषित राहून अत्यंत तेज देणारी अशी ब्राह्मी प्यावी (तिचा रस प्यावा). शूद्राचें उष्टें खाल्लें तर सहा दिवसपर्यंत कढत कढत अशा अन्नाचें भोजन करावें. ‘‘अज्ञानानें अभ्यास असतां यम’’---ब्राह्मणाबराबर (एके ठिकाणीं) भोजन केलें तर प्राजापत्यानें शुद्धि होईल. क्षत्रियाबराबर अन्न खाल्ले तर तप्तकृच्छ्रानें शुद्धि होईल. वैश्याबरोबर अन्न खाल्लें तर अतिकृच्छ्रानें शुद्धि होईल. शूद्राबरोबर अन्न खाल्लें तर चांद्रायण प्रायश्चित्त करावें हें (प्रायश्चित्त) बुद्धिपूर्वक अभ्याविषयीं आहे असें विज्ञानेश्र्वर म्हणतो. बुद्धिपूर्वक अभ्यास असतां हेंच दुप्पट करावे. विज्ञानेश्र्वराच्या मतें तर बुद्धिपूर्वक अभ्यास असतां अर्धें (प्रायश्चित्त).
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP