मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १०४ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०४ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘शंखः’’ माहिषं गव्यमाजं च भक्ष्य क्षीरेषु निर्दिशेत्‌। भुक्‍त्‍वा परस्‍य च क्षीरं मासं कुर्याद्र्वतं बुधः।
अनिर्दशाहं गोक्षीरं माहिषं वाजमेव च। गोश्र्चक्षीरं विवत्‍सायाः संधिन्याश्र्च तथा पयः।
स्‍यंदिन्यमेध्यभक्ष्याया भुक्‍त्‍वा पक्षं व्रतं चरेत्‌। क्षीराणि यान्यभक्ष्याणि तद्विकाराशने बुधः।
सप्तरात्रव्रतं कुर्याद्यतेस्‍तत्‍परिकीर्तितमिति। ‘‘अनभ्‍यासे तु संवर्तः’’ अवत्‍सैकशफास्त्रीणां क्षीरं प्राश्य द्विजोत्तमः।
अनिर्दशाया गोश्र्चैव त्रिरात्रं यावकं पिबेदिति। अकामतोऽनभ्‍यासे तु शेषेषूपवसेदहरिति मनूक्त उपवासः।
‘‘उष्‍ट्र्यादिक्षीरे तु शातातपः’’ उष्‍ट्रीक्षीरपाने मानुषीक्षीरपाने पुनरुपनयनं तप्तकृच्छ्रं च।
आममांसपूयसंधिन्यनिर्दशाया गोः क्षीरपाने वृथामांसभक्षणे च प्राजापत्‍यं।
‘‘कपिलाक्षीरपाने विशेषमाहापस्‍तंबः’’ क्षत्रियश्र्चैव वृत्तस्‍थो वैश्यः शूद्रोऽथवा पुनः।
यःपिबेत्‍कापिलं क्षीरं न ततोऽन्योस्‍त्‍यपुण्यकृत्‌। ‘‘भविष्‍यपुराणे’’ कापिलं यः पिबेच्छ्रूद्रो नरके स विपच्यते।
हुतशेषं पिबेद्विप्रो विप्रः स्‍यादन्यथा पशुः। अन्यथा हुतशेषापाने।
तत्र शूद्रस्‍य कपिलाक्षीरपाने च्यवनेन ब्रह्महेति ताद्रूप्यातिदेशः कृतस्‍तेन तस्‍य तत्र नवाद्बं इतरयो श्र्चांद्रायणमनादिष्‍टत्‍वात्‌।
‘‘ब्रह्मपुराणे’’ घृतात्‍फेनं घृतान्मंडं पीयूषमथ चार्द्रगोः। दधिक्षीरमथाज्‍यं च दुष्‍टया श्र्चैव गोःपयः।
अनिर्दशायाश्र्च तथा संधिन्याश्र्च तथैव च। सगुंड मरिचाक्तं च तथा पर्युषितं दधि। जीर्णतक्रमपेयं तु नष्‍टस्‍वादं च फेनवत्‌।
प्रमादाद्भक्षितैरेभिर्वने पक्षव्रतं चरेदिति। आर्द्रगोः सद्यः प्रसूतायाः। दुष्‍टाया व्याध्यादिना

म्‍हैस, गाय व बकरी यांचें दुधाशिवाय उंटीण वगैरेचें दुध, तसेंच म्‍हैस वगैरेंचें दहा दिवसांतील दुध पिण्यांत आलें तर प्रायश्चित्त.

भलत्‍याच वेळी दुध देणार्‍या गाईचें दुध, जिच्या थानांतून दुध गळतें तिचें दुध व विष्‍ठादि वाईट पदार्थ खाणार्‍या गाईचें दुध पिण्यांत आलें तर पंधरा दिवसपर्यंत व्रत (प्रायश्चित्त) करावे. जर ज्ञात्‍यानें जी मागें खाण्यास अयोग्‍य दुधें सांगितलीं त्‍यांच्यापासून बनलेले दहि वगैरे पदार्थ खाल्‍ले तर सात दिवसपर्यंत व्रत करावे. हे संन्याशास सांगितलें आहे. ‘‘अभ्‍यास नसतां त्‍याविषयीं संवर्त’’---जर द्विज जिला वासरूं नाहीं अशी गाय, एखखुर असणारी उंटीण, घोडी वगैरे व स्त्री यांचें दुध व जिला विऊन दहा दिवस झाले नाहींत अशा गाईचें दुध पिईल तर तीन दिवस पर्यंत यावक (अर्धशिजे जव) खावे. अज्ञानानें अभ्‍यास नसतां त्‍याविषयी तर ‘‘बाकी राहिलेल्‍या दुधाविषयीं एक दिवस उपास करावा’’. याप्रमाणें मनुनें सांगितलेला उपास करावा. ‘‘उंटीण वगैरेंच्या दुधाविषयी तर शातातप’’---उंटीणीच्या दुधाचें पान केलें व स्त्रीच्या दुधाचें पान केलें तर पुनरुपनयन व तप्तकृच्छ्र करावे. कच्चें मांस, पू, भलत्‍याचवेळी दुध देणार्‍या गाईचें दुध, जिला प्रसूत होऊन दहा दिवस झाले नाहींत अशा गाईचें दुध, व कारणावाचून मांस यांचें भक्षण केले तर प्राजापत्‍य प्रायश्चित्त करावें. ‘‘कपिला गाईच्या दुधाच्या पानाविषयीं आपस्‍तंब विशेष सांगतो’’ वृत्तांत रहाणारा क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांतून जो कोणी कपिलेचें दुध पिईल, त्‍याहून दुसरा कोणी पापी नाहीं. ‘‘भविष्‍यपुराणांत’’ जो शूद्र कपिलेचें दुध पिईल, तो नरकांत पडेल. जो ब्राह्मण होमाचें शेष राहिलेलें असें कपिलेचें दुध पिईल, तो ब्राह्मण होय. असें जो करणार नाही तो पशु होय. त्‍यांत शूद्राला कपिलेच्या दुधाच्या पानाविषयीं च्यवनानें ब्रह्महत्त्या करणारा असा ताद्रूप्यातिदेश केलेला आहे. त्‍यावरून त्‍यास नऊ वर्षे व दुसर्‍या दोघांस (क्षत्रिय व वैश्य यांस) सांगितलें नाहीं त्‍यावरून चांद्रायण प्रायश्चित्त होय. ‘‘ब्रह्मपुराणांत’’ तुपापासून निघालेला फेस, तुपापासून निघालेला मंड, तत्‍काळी व्यालेल्‍या गाईचें दुध, रोगादिकाच्या योगानें खराब झालेल्‍या गाईचें दहि, दुध व तूप हीं, जिला दहा दिवस विऊन झाले नाहींत अशा गाईचें दुध, भलत्‍याचवेळी दुध देणारी व गर्भिणी अशा गाईचें दुध, गुळानें मिश्र केलेलें व मिर्‍यांच्या चूर्णानें युक्त तसेंच शिळें असें दहि, पिण्यास अयोग्‍य असून ज्‍याला स्‍वाद नाहीं व फेंसाळ असें ताक ही अज्ञानानें खाल्‍लीं तर रानांत पंधरा दिवस पर्यंत व्रत (प्रायश्चित्त) करावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP