प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४९ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘पतिताग्निषु विशेषमाह कात्यायनः’’ महापातकसंयुक्तोदैवा त्स्यादग्निमान्यदि। पुत्रादिः पालयेदग्नीन युक्त आदोषसंक्षयात्।
प्रायश्चित्तं न कुर्याद्यः कुर्वन्वा म्रियते यदि। गृह्यं निर्वापयेच्छ्रौतमप्स्वस्येत्सपरिच्छदमिति।
पालनविधानात् पुत्रोऽग्निहोममपि कुर्यात्। ‘‘उशनाः’’ आहिताग्निस्तुयोविप्रोमहापातकवान् भवेत्।
प्रायश्चितैर्न शुध्येत तदग्रीनां तु का गतिः। वैतानं प्रक्षिपेत्तोये शालाग्निं शमयेद्ब्रुधः
अग्निहोत्री पतित झाला असतां त्याच्या अग्नीची व्यवस्था.
‘‘पतित झालेल्याच्या अग्निविषयी कात्यायन विशेष सांगतो---जर एखादा अग्निहोत्री दैवानें महापातकी होईल तर, त्याच्या पुत्रादिकानें त्याचा दोष जाई तोपर्यंत अग्नीचें रक्षण करावे. जर तो प्रायश्चित्त करणार नाही, किंवा प्रायश्चित्त करीत असतां मरेल तर, त्याचा गृहाग्नि विझवून टाकावा. श्रौताग्नि त्याच्या पात्रांसकट पाण्यांत बुडवावा. (पुत्रादिकानें अग्नीचें) पालन करावें असे विधान आहे म्हणून पुत्रानें अग्निहोत्रा संबंधी होमही करावा. ‘‘उशनस्’’---जो अग्नीहोत्री ब्राह्मण महापातकी होईल, तो जर प्रायश्चित्तांनी शुद्ध होणार नाही, तर त्याच्या अग्नीची ज्ञात्यानें काय व्यवस्था करावी? त्याचा श्रौताग्नि पाण्यांत टाकावा व गृहाग्नि विझवावा.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP