प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘एतत्स्पृष्टभक्षणे तु ब्रह्मपुराणे’’ चंडालपतितामेध्यैः कुनखैः कुष्टिना तथा। उदक्यासूतिकास्पृष्टं भुक्त्वा मासं वने वसेदिति।
‘‘क्लीबाभिशस्त पतितैः सूतिकोदक्यानास्तिकैः। दृष्टं तु तस्य निष्कृतिरुच्यते। तद्भक्त्वोपवसेद्रात्रिं तत्स्पृष्टे तु चतुर्गुणं।
उच्छिष्टे षड्गुणं प्रोक्तमभ्यासेऽष्टगुणं भवेदिति
चांडाळा इत्यादिकांनीं स्पर्श केलेलें अन्न खाल्लें तर प्रायश्चित्त. नपुंसक वगैरेंनीं पाहिलेलें खाल्लें तर प्रायश्चित्त.
‘‘चांडाळ वगैरेंनी स्पर्श केलेल्या अन्नाच्या भक्षणाविषयी तर ब्रह्मपुराणांत’’ चांडाळ, पतित, मलीन, कुनख, कुष्टि, विटाळशीं व बाळंतीण यांनी स्पर्श केलेलें अन्न जो खाईल, त्यानें एक मास पर्यंत रानांत रहावें. ‘‘नपुंसक वगैरेंनी पाहिलेल्याविषयीं शातातप’’---नपुंसक, अभिशस्त, पतित, बाळंतीण, विटाळशी व नास्तिक यांनीं पाहिलेलें अन्न खाऊं नये. ‘त्याची निष्कृति सांगण्यांत येते-त्यांनी पाहिलेलें अन्न खाल्लें तर एक दिवस उपास करावा. त्यांनीं स्पर्श केलेलें खाल्लें तर चौपट (चार दिवस उपास), ह्यांनीं उष्टें केलेलें अन्न खाल्लें तर सहापट (सहा दिवस उपास) व अभ्यास असतां आठ पट (आठ दिवस उपास) प्रायश्चित्त करावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP