अथ पर्षत्
"लघुपराशरः’’ चत्वारोवा त्रयोवापि वेदवंतोऽग्रिहोत्रिणः। ब्राह्मणानां समर्था ये पर्षत्सा हि विधीयते।
अनाहिताग्रयोऽन्ये ये वेदवेदांगपरागाः। पंच त्रयोवा धर्मज्ञाः परिषत्संप्रकीर्तित।
वेदव्रतेषु स्नातानामेकोऽपि परिषद्भवेत। ‘‘यमः’’ एकोद्वौ वा त्रयोवापि ये ब्रूयुर्धर्मपाठकाः।
स धर्म इति विज्ञेयो नेतरेषां सहस्रशः। ‘‘मनुः’’ त्रैविद्योहेतुकस्तर्की नैरुक्तोधर्मपाठकः।
त्रयश्र्चाश्रमिणः पूर्वे पर्षदेषा दशावरा। हैतुको मीमांसकः। ‘‘अंगिराः’’ एकविंशतिसंख्यातैर्मीमांसान्यायपारगैः।
वेदांगकुशलैरेव पर्षत्त्वं तु प्रकल्पयेत्। ‘‘धर्मविवृतौ’’ पातकेषु शतं पर्षत् सहस्त्रं महदादिषु।
उपपापेषु पंचाशत् स्वल्पे स्वल्पा तथा भवेत्। ‘‘पराशरः’’ अज्ञात्वा धर्मशास्त्राणि प्रायश्चित्तं ददाति यः।
प्रायश्चित्ती भवेत्पूतः किल्बिषं परिषद्वेजत्। ‘‘पर्षदुपस्थानमाहांगिराः’’ सचैलं वाग्यतः स्नात्वा क्लिन्नवासाः समाहितः।
क्षत्रियोवापि वैश्योवा पर्षदं ह्युपतिष्ठति। अधिकारिमात्रोपलक्षणमिदं। उपस्थाय ततः शीघ्रमार्तिमान् धरणीं गतः।
गात्रैश्र्व शिरसा चैव न च किंचिदु दाहरेत्। ‘‘पराशरः’’ पापं विख्यापयेत्पापी दत्वा धेनुं तथा वृषं। इदमुपपातकविषयं।
महापापादिष्वधिकंकल्प्यमिति ‘‘मिताक्षरायां’’। अलपपापेष्वपि ‘‘तत्रैव’’ तस्माद्विजः प्राप्तपापः सकृदाप्लुत्य वारिणि।
विख्यात पापं वक्तृभ्यः किंचिद्दत्वा व्रतं चरेत्। किंचिद्दत्वा पापं विख्याप्य व्रतं चरेदित्यन्वयः। विष्णुः’’
पादव्रते वस्त्रदानं कृच्छ्रार्ध तैलकांचनं। पादहीने गामेकां कृच्छ्रे गोमिथुनं स्मृतं।
अत्र सर्वे धर्मविवेक्तार इत्यादि प्रार्थना पर्षत्प्रदक्षिणा च वक्ष्यते। ‘‘पद्धतौ देवलः’’ पापकृत्स्वकृतं पापं कृत्स्नमाख्याय संसदि।
तत्र स्नानेन याचेत् निकृतिं तस्य कर्मणः ‘‘अंगिराः’’ कृत्वा पापं न भुंजीत त्रिरात्रमहरेव च। कुर्याद्बाम्हणशुश्रूषामाप्रदानाद्वतस्य तु।
एतच्च पर्षदुपस्थानं प्रकाशप्रायश्चित्त एव न रहस्ये। ‘‘विख्यातदोषः कुर्वीत पर्षदोनुमतं व्रतं।
अनभिख्यातदोषस्तु रहस्यं व्रतमाचरेदिति ‘‘याज्ञवल्क्योक्तेः’’। प्रकाशेऽपि पर्षदसंभवे स्वयमेव कुर्यात्।
‘‘मनुः’’ मतिपूर्वमनुद्देशं प्राणांतिकमिति स्थितं मतिपूर्वमयं मरणार्थं पृच्छतीतिज्ञात्वा।
‘‘अंगिराः’’ ततस्ते प्रणिपातेन दृष्ट्वा तं समुपस्थितं। वृद्धाः पृच्छंति किंकार्यमुपविशाग्रतः स्थितं।
किं ते कार्य वदास्माभिः किंवा मृगयसे द्विज। तत्वतो ब्रूहि तत्सर्वं सत्यं हि गतिरात्मनः।
यदि चेद्रक्षसे सत्यं नियतं प्राप्यसे शुभं। यद्यागतोस्यसत्येन न त्वं शुध्यासि कर्हिचित्। एवं तैः समनुज्ञातः सर्व ब्रूयादशेषतः।
‘‘विश्र्वामित्रः’’ जातिशक्तिगुणापेक्षं सकृद्बुद्धिकृतं तथा। अनुबंधादि विज्ञाय प्रायश्चित्तं प्रकल्पयेत्।
उपदेशश्र्च पर्षदनंतर्गतेन पर्षदनुमत्या केनचित् कर्तव्यः। ‘‘तथा चांगिराः’’ आहूय श्रावयेदेकः पर्षदा यो नियोजितः।
उपदेशश्र्च त्रिःकार्य इति ‘‘मदनः’’ ‘‘पितामह चरणाश्र्च’’। ‘‘स एव’’ ब्राह्मणो ब्राह्मणानां तु क्षत्रियाणां पुरोहितः।
वैश्यानां याजकश्र्चैव प्रायश्चित्तं समादिशेत्। अगुरुः क्षत्रियाणां यो वैश्यानां वाप्ययाजकः। प्रायश्चित्तं समादिश्य तप्तकृच्छ्रं व्रतंचरेत्।
‘‘स एव’’ तथा शूद्रं समासाद्य सदा धर्मपुरस्सरं। प्रायश्चित्तं प्रदातव्यं जपहोमविवर्जितं।
जपहोमौ वागप्रधानरूपावशेषात् ‘‘पर्षदंतर्गतस्योपदेशकत्वे प्रायश्चित्तमाह हारीतः’’ प्रायश्चित्तं तु निर्दिश्य कथं पापात्प्रमुच्यते।
यत्पवित्रं विजानीयाज्जपेद्वा वेदमातरं। ‘‘अंगिराः’’ वचः पूर्वमुदाहार्य यथोक्तं धर्मकर्तृभिः।
पश्र्चात्कार्यानुसारेण शक्त्या कुर्युरनुग्रहं वचः प्रायश्चित्तविधायकं। अनुग्रहः प्रायश्चित्तन्यूनता।
‘‘पराशरः’’ दुर्बलेऽनुग्रहः कार्यस्तथैव शिशुवृद्धयोः। अतोऽन्यथा भवेद्दोषस्तस्मान्नानृगृही भवेत्।
‘‘देवलः’’ प्रायश्चित्तं यथोद्दिमशत्त्या तद्वशात्पुनः। इष्यतेऽनुग्रह श्रापि पूजानुग्रहकारणात्। एकोनार्हति तत्कर्तुमनूचातो प्यनुग्रहं।
धर्मज्ञा वहवो विप्राः कर्तुमर्हंत्यनुग्रहं। स्नेहाद्वां यदिवा लोभाद्भयादज्ञानतोऽपिवा। कुर्वंत्यनुग्रहं ये तु तत्पापं तेषु गच्छति।
पूजानुग्राह्यस्य पूज्सत्वं अनुग्रहो दया। अनुग्रहरूपन्यूनतावधिमाह ‘‘हारीतः’’ तस्मात्कृच्छ्रमथाप्यर्धं पादं वापि विधानतः।
ज्ञात्वा बलाबलं कार्यं प्रायश्चित्तं प्रकल्पयेत्। केचिदशक्तौ कृच्छ्रं प्राजापत्यं।
अधिकायां पादं अधिकतरायामर्धमनुग्रहं कृत्वा प्रकल्पयेदित्यनुग्रहं कृत्वा प्रकल्पयेदित्यनुग्रहं कृत्वेत्यध्याहारेण योज्यः
पर्षत् (सभा).
पर्षदेचे लक्षण, पर्षदेची प्रार्थना, पापा प्रमाणें पर्षदेची योजना.
‘‘लघुपाराशर’’ -वेद शिकलेले असून ब्राह्मणांत श्रेष्ठ अशा चार किंवा तीन अग्निहोत्र्यांची पर्षत् (सभा) करावी. अग्निहोत्री नसून वेद व वेदांची अंगे जाणणारे आणि धर्मशास्त्र जाणणारे असे पांच किंवा तीन यांची पर्षत् सांगितली. सर्व वेदव्रतांचे ज्यांनी आचरण केले आहे (ज्यांचे समावर्तन झाले आहे) त्यांच्यातून एकटाही पर्षत् होतो. ‘‘यम’’ -एक, दोन किंवा तीन असे धर्मशास्त्र जाणणारे जे काही सांगतील तो धर्म होय असे जाणावे. त्याशिवाय दुसर्या हजारोंनी जरी सांगितलें तरी तो धर्म नव्हे. ‘‘मनु’’ -वेद शिकलेला, मीमांसा जाणणारा, न्यायशास्त्र जाणणारा, निरूक्त जाणणारा, व धर्मशास्त्र जाणणारा व तीन पूर्वाश्रमी (ब्रह्मचारी, गृहस्थ व वानप्रस्थ) ही दहां पेक्षा कमी अशी पर्षत् जाणावी. ‘‘अंगिरस्’’ -वेदांची अंगे जाणणारे, मीमांसा व न्याय यांत पारंगत असलेले अशा एकविसांची पर्षत् नेमावी. ‘‘धर्मविकृतींत’’ पातकाविषयी शंभरांची पर्षत् असावी. महापातकांत हजारांची व उपपातकांत पन्नासांची पर्षत् असावी. यांपेक्षां स्वल्प पातकांत लहान पर्षत् असावी. ‘‘पराशर’’ - जो धर्मशास्त्रें जाणत नाहीं तो जर प्रायश्चित्त सांगेल तर प्रायश्चित्ती शुद्ध होईल. परंतु त्याचें पाप पर्षत्कडे (प्रायश्चित्त सांगणाराकडे) जाईल. ‘‘अंगीरस् परिषदेची प्रार्थना सांगतो’’ - प्रायश्चित्तास योग्य असा क्षत्रिय किंवा वैश्य यानें कोणाशीं न बोलतां नेसलेल्या वस्त्रासह स्नान करून तशाच वस्त्रानें परिषदेची स्वस्थ मनानें प्रार्थना करावी. नंतर त्यानें लागलीच कांही सुद्धा न बोलतां जमिनीवर साष्टांग नमस्कार घालावा. ‘‘पराशर’’-पाप्यानें गाय व बैल देऊन परिषदेस आपले पाप सांगावें, हें उपपातकांविषयी आहे. महापातकादिकांविषयीं यापेक्षां अधिक योजावें असें ‘‘मिताक्षरेंत’’ आहे. अल्प पापाविषयीही ‘‘त्यांतच’’ म्हणून पाप करणार्या द्विजानें पाण्यांत एकवार स्नान करून वक्त्यांस (प्रायश्चित्त सांगणारांस) कांही थोडें (धन वगैरे) देऊन त्यांस आपलें पातक सांगून नंतर व्रताचें आचरण करावे. ‘‘विष्णु’’ चतुर्थांश व्रत असतां वक्त्यांस वस्त्राचें दान करावें असें सांगितलें. कृच्छ्रार्धांत तेल व सोनें, तीन चतुर्थांश कृच्छ्रांत एक गाय आणि कृच्छ्रांत दोन गाई द्याव्या. येथे ‘‘सर्वे धर्म विवेक्तारः’’ इत्यादि प्रार्थना व पर्षदेस करावयाची प्रदक्षिणा ही पुढें सांगण्यांत येतील. ‘‘पद्धतींत देवल’’ -पाप करणारानें स्नान करून सभेस आपण केलेलें सर्व पाप सांगून त्या पापाचें निरसन होण्याकरितां सभेची प्रार्थना करावी. ‘‘अंगिरस्’’-पाप करणारानें पाप केल्यानंतर प्रायश्चित्त सांगण्याच्या पूर्वी तीन दिवस उपास करावा व ब्राह्मणांची शुश्रूषा करावी. ही सभेची प्रार्थना स्पष्ट प्रायश्चित्ता विषयींच समजावी. रहस्या (एकांता) विषयीं समजूं न ये. कारण ‘‘ज्यानें प्रसिद्ध पातक केलें असेल त्यानें सभेनें सांगितलेलें प्रायश्चित्त करावे. ज्यानें प्रसिद्ध पातक केलें नसेल त्यानें एकांतांत सांगितलेलें प्रायश्चित्त करावे.’’ असें ‘‘याज्ञवाल्क्याचें’’ म्हणणें आहे. प्रसिद्ध पातकांत सभेचा संभव नसला तर स्वतःही प्रायश्चित्त करावे. ‘‘मनु’’ -हा मरणाकरितां विचारतो असें जाणून प्राणांतिक प्रायश्चित्त सांगावे.
पाप्यानें सभे पुढें जाऊन आपलें पातक सांगावे. नंतर सभेनें दोषाची स्थिति पाहून प्रायश्चित्ताची योजना करावी इ.
‘‘अंगिरस्’’ - नंतर साष्टांग नमस्कार घातलेल्या त्या पातकाला वृद्धांनी विचारावे की आमच्या पुढें बैस, आमच्याशी तुझे काय काम आहे? किंवा तु कोणाला शोधतोस? आपली जी स्थिति असेल त्याप्रमाणें अक्षरशः खरें सांग . जर तू खरें सांगशील तर तुझें चांगले होईल. जर तूं लबाडीने आला असशील तर तूं कधीहीं शुद्ध होणार नाहीस. याप्रमाणें त्यांस सांगावयास आज्ञा केली असतां त्यानें सर्व सांगावे. ‘‘विश्र्वामित्र’’ - जात, शक्ति व गुण यांजकडे लक्ष देऊन, एकवेळां केलेले, बुद्धिपूर्वक केलेलें तसेंच दोषांची उत्पत्ति इत्यादि जाणून त्याप्रमाणें प्रायश्चित्ताची योजना करावी. उपदेश करणें तो सभेत नसणार्या कोणत्याही मनुष्यानें सभेच्या संमतीनें करावा. ‘‘ अंगिरस् तसेंच सागतो की’’ - सभेनें ज्याची योजना केली असेल अशा एका मनुष्यानें त्याला बोलावून त्यास (प्रायश्चित्त) सांगावे. ‘‘उपदेश (प्रायश्चित्त सांगणें) तीनदां करावा असें’’ ‘‘’मदन’ व ‘‘पितामह’’ सांगतात. ‘‘तोच’’ ब्राह्मणास ब्राह्मणानें, क्षत्रियांस पुरोहितानें, वैश्यांस याजकानें (पुरोहितानें) प्रायश्चित्त सांगावे. जो क्षत्रियांचा गुरु (पुरोहित) नसेल त्यानें व वैश्याचा याजक नसेल त्यानें जर प्रायश्चित्त सांगितलें तर त्यानें तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त करावे. ‘‘तोच’’ -तसेंच धर्मानें चालणारा असा शूद्र आला असतां त्यास जप व होम यांनी रहित असे प्रायश्चित्त द्यावे. ‘‘सभेंत असलेल्यानें प्रायश्चित्त सांगितलें तर त्यास ‘‘हारीत प्रायश्चित्त सांगतो’’-प्रायश्चित्त सांगितल्यानंतर तो पापापासून मुक्त कसा होईल? म्हणून त्यानें गायत्रीमंत्राचा जप करावा म्हणजे तो शुद्ध होईल. ‘‘अंगिरस्’’-धर्मशास्त्र जाणणारांनीं पूर्वी जसें योग्य प्रायश्चित्त असेल तसें सांगावे. नंतर त्याची शक्ति पाहून कार्यास अनुसरून त्याचेवर अनुग्रह करावा. (प्रायश्चित्त कमी करावे.) ‘‘पराशर’’-दुबळ्यावर तसेंच मूल व म्हातारा यांवर कृपा करावी. यां शिवाय दुसर्यांवर अनुग्रह केला असतां दोष घडेल म्हणून अनुग्रह करूं नये. ‘‘देवल’’-जसें सांगितलें असेल तसें प्रायश्चित्त करावयास शक्ति नसल्यास तसेंच ज्यावर दया करावयाची त्याची पूज्यता व दया या कारणांनी (त्यावर) अनुग्रह करणेंही इष्ट आहे. गुरू पासून शिक्षादि अंगांसहित वेद शिकलेला असा एकटा अनुग्रह करण्यास समर्थ होत नाहीं, परंतु धर्मशास्त्र जाणणारे पुष्कळ ब्राह्मण अनुग्रह करण्यास योग्य आहेत. जर कोणी स्नेहानें, लोभानें, भयानें किंवा अज्ञानानें अनुग्रह करतील तर त्यांस तें पातक लागते. ‘‘हारीत अनुग्रहाच्या न्यूनतेची मर्यादा सांगतो’’-म्हणून कार्य व बलाबल जाणून विधीप्रमाणें कृच्छ्र, अर्धें किंवा चतुर्थांश प्रायश्चित्त योजावे. कित्येक अशक्तास कृच्छ्र प्राजापत्य सांगतात. अधिक (अशक्त) असतां चतुर्थांश, फारच अधिक (अशक्त) असतां अर्धा अनुग्रह करून प्रायश्चित्त योजावें.