मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ४२ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ४२ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ तीर्थप्रत्‍यान्मायः

‘‘ब्रह्महत्‍याव्रतमुपक्रम्‍य भविष्‍यत्‍पुराणे’’ विंध्यादुत्तरतो यस्‍य निवासः परिकीर्तितः। पराशरमतं तस्‍य सेतुबंधस्‍य दर्शनं।
विंध्योत्तरवर्तिनमुक्‍त्‍वा तत्रैव’ चातुर्विद्योपपन्नस्‍तु विधिवद्बम्‍ह घातकः। समुद्रसेतुगमनं प्रायश्र्चित्तं विनिर्दिशेत्‌।
‘‘स्‍मृतिसंग्रहे स्‍मृत्‍यर्थसारे च’’ भागीरथ्‍यां स्‍नानं षष्‍ठियोजनागतस्‍य षडद्बसमं। अत्र यात्रा योजनवृद्धावर्धकृच्छ्रावृद्धिः।
एक योजनागतस्‍य मध्ये पर्वतादिभिर्व्यवधाने कृच्छ्रत्रयं।
तृतीयांशाधिक क्रोशादागतस्‍य भागीरथ्‍यां विध्युक्तस्‍नानमेककृच्द्रः अशक्तस्‍य त्‍वर्धयोजनागतस्‍य।
शक्तस्‍यापि मार्गस्‍य दुर्गमत्‍वे भागीरथीस्‍नानमर्धयोजनागतस्‍यैकः कृच्छ्र इत्‍यादि कल्‍पयंति।
प्रयागस्‍नानं षष्‍िठयोजनागतस्‍य द्वादशाद्बसमं गंगाद्वारे गंगासागरसंगमे चैवं। यमुनास्‍नानं विंशतियोजनागतस्‍य द्वादशाद्बसमं।
मथुरायां द्विगुणं। सरस्‍वत्‍यां चतुरद्बकृच्छ्रसमं चत्‍वारिंशद्योजनागतस्‍य। प्रभासे द्वारवत्‍यां च द्विगुणं। अनयोर्नद्योर्योजनवृद्धौ पादकृच्छ्रवृद्धिः। दृषद्वतीशतद्रूविपाशावितस्‍ते रावतीमरुद्वधादिषु स्‍नानं त्रिंशत्‍कृच्छ्रसमं पंचदशयोजनागतस्‍य। चंद्रभागावेत्रवतीशरयूगोमतीदेविकाकौशिकीगंडक्‍यादिदेवनदीषु स्‍नानं षोडशकृच्द्रसमं द्वादशयोजनागतस्‍य। एतासु महानदीषु परस्‍परसंगमे त्रिनदीफलं। अन्यासु महानदीषु षट्‌कृच्छ्रसमं। महानदेषु महानद्यर्धं शोणमहानदे गंधार्धफलं। नदेषु नद्यर्धं वैरेचननदे महानद्यर्धं।

नर्मदायां चतुर्विंशतियोजनागतस्‍य चतुर्विंशतिकृच्छ्रसमं। कुब्‍जिकासंगमे द्विगुणं। शुक्‍लतीर्थे चतुगु्रणं।
ताप्यां दशकृच्छ्रसमं दशयोजनागतस्‍य। पयोष्‍ण्यां अष्‍टयोजनागस्‍याष्‍टकृच्छ्रसमं। तत्र तत्र संगमे द्विगुणं।
गोदावर्यां षष्‍टियोजनागतस्‍य त्र्यद्बसमं। त्रिंशद्योजनागतस्‍यैकाद्वं। सुतीर्थेषु प्रतिलोमानुलोमस्‍नानं षष्‍ठिकृच्छ्रसमं।
वंजरासंगमे प्रयागे तद्विगुणं। सप्तगोदावरीभीमेश्र्वरे त्रिगुणं। कुशतर्पणे वंजरायां द्वादशयोजनागतस्‍य द्वादशकृच्छ्रसमं।
गोदावर्यां विश्र्लेषे समुद्रांत षड्‌गुणं। प्रणीतायां चतुःकृच्छ्रसमं चतुर्योजने। पूर्णायां तदर्धं योजने।
कृष्‍णवेणायां पंचदशयोजने पंचदशकृच्छ्रसमं। तुंगभद्रायां विंशति योजनागतस्‍य विंशतिकृच्छ्रसमं।
मलापहारिण्यामष्‍टकृच्छ्रसमष्‍टयोजनागतस्‍य। निवृत्त्यां षट्‌कृच्छ्रसमं षड्‌योजनागतस्‍य।
गोदावर्यां यात्रा योजनवृद्धौ योजने पादकृच्छ्रः सिंहस्‍थे गुरौ सर्वत्र जान्हवीसमं। कृन्यास्‍थे गुरौ कृष्‍णवेणायां सर्वत्र जान्हव्यर्धं।
तुगभद्रायां तुलास्‍थे गुरौ जान्हव्यर्धं ग्राह्यं। तुगभद्रायां तुलास्‍थे रवौ च।
कृष्‍णवेणायां मलापहारिणीसंगमे प्रयागे त्रिंगशद्योजनागतस्‍य त्रिंशत्‍कृच्छ्रसमं। भीमरथ्‍याः संगमे प्रयागे द्विगुणं। तुंगभ्रदासंगमे त्रिगुणं। निवृत्तिसंगमे चतुर्गुणं। ब्रह्मेश्र्वरे पंचगुणं। पातालगंगायां मल्‍लिकार्जुने षड्‌गुणं। ततः पूर्वे षष्‍ठिकृच्छ्रसमं लिंगालये द्विगुणं।
समुद्रसंगमे चैवं। कावेर्यां महानद्यां पंचदशकृच्छ्रसमं दशयोजनागतस्‍य। ताम्रपर्णीकृतमालापयस्‍विनीषु द्वादशयोजने द्वादशकृच्छ्रसमं। सह्यपादोद्भूताश्र्च नद्यः स्‍वदैर्घ्यानुसारेण एकद्वित्रिकृच्छ्रफलप्रदाः। विंध्यशैलोद्भवा द्विगुणाः। हिमोद्भूतास्त्रिगुणाः।
स्‍मृतौ पुराणे च यथाकथंचिदनुक्तौ कुल्‍याः त्रिरात्रिफलदाः। अल्‍पनद्यः कृच्छ्रशः। नद्यो द्विकृच्छ्रशः महानद्यस्त्रिकृच्छ्रशः।

सर्वत्र यात्रानुक्तौ कृच्छ्रसंख्या योजनसंख्यया स्‍यात्‌। एक योजनगादिषड्योजनगांताः स्रवंत्‍यः कुल्‍याः।
ततो द्वादश योजनगा अल्‍पनद्यः। चतुर्विंशतियोजनगांता नद्यः। चतुर्विंशतियोजनाधिकगा महानद्यः। समुद्रगाश्र्च महानद्यः। चतुर्विंशतियोजनाधिकगा महानद्यः। यत्र महानदी समाख्यास्‍ति ताश्र्च महानद्यः। उपवाससहितं नदीस्‍नानं कृच्छ्रसमं योजनादर्वागपि।
शुनीगर्दभीचांडालीशुद्री कष्‍टगादिनद्यः पापनद्यश्र्चवर्ज्याः। सर्वत्र समुद्रस्‍नानं दर्शे कार्यं। देवतासमीपे सरःसरिन्नदीसंगमेषु सर्वदा कार्य।
समुद्रस्‍नानं पंचदशयोजनागतस्‍य प्रख्यातदेवतासमीपे द्विगुणं। तत्र स्‍नात्‍वा तद्देवतादर्शने त्रिगुणं।
सेतोर्गमनं त्रिंशत्‍कृच्छ्रसमं त्रिंशद्योजनागतस्‍य स्‍नात्‍वा रामेश्र्वरदर्शने षष्‍ठिकृच्छ्रसमं।
विंध्यदेशीयानां सेतुरामेश्र्वरे जान्हव्यां च त्रिगुणं फलं। जान्हवीकेदारयोश्र्च तथैव।
दक्षिणदेशीयानां जान्हव्यां षट्‌गुणं गंगादेशीयानां जान्हव्यां षट्‌गुणं गंगादेशीयानां सेतुरामेश्र्वरे षट्‌गुणं।
स्‍कंददर्शने त्रिंशद्योजनागतस्‍य यत्र गंगासंज्ञस्‍तितत्रैवं।
श्रीरंगपद्मनाभपुरुषोत्तमचक्रकोटमहालक्ष्मीदर्शने लोणारस्‍थाने त्रिंशद्योजनागतस्‍य त्रिंशत्‍कृच्छ्रसमं। केदारे त्रिगुणं।
सर्ववैष्‍णवमाहेश्र्वरसौरशाक्तदिपीठदर्शने पंचदशकृच्छ्रसमं प्रख्याते द्विगुणं। अहोबलेऽपि तथा।
श्रीशैलप्रदक्षिणं षष्‍ठिकृच्छ्रसमं। श्रीशैले एकैकशृंगदर्शनं द्वादशकृच्छ्रसमं। अन्येषु प्रख्यात तीर्थदेवदर्शनेषु षट्‌कृच्छ्रफलं।
सिद्धक्षेत्रेऽन्यक्षेत्रे च स्‍वयंभूदर्शनं त्रिंशुत्‍कृच्छ्रसमं त्रिंशद्योजनागतस्‍य। सर्वत्रकृच्छ्रसंख्यया योजनसंख्याज्ञेया।

इति तीर्थप्रत्‍याम्नायाः

तीर्थांचें प्रत्‍यन्माय.

‘‘ब्रह्महत्‍याव्रताचा आरंभ करून भविष्‍यपुराणांत’’ विंध्यपर्वताच्या उत्तरेकडे ज्‍याचें रहाणें आहे, त्‍यानें सुतुबंधाचें दर्शन घ्‍यावे असें ‘‘पराशराचें’’ मत आहे. (याप्रमाणें) विंध्यपर्वताच्या उत्तरेकडे रहाणार्‍यास (प्रायश्र्चित्त) सांगून ‘‘त्‍यांतच’’----चार वेद पढलेल्‍याच्या हातानें जर ब्रह्महत्‍या होईल तर त्‍याला विधीत सांगितल्‍याप्रमाणे समुद्रसेतूस (सेतुबंधास) जाणें हे प्रायश्र्चित्त सांगितलें. ‘‘स्‍मृतिसंग्रहांत व स्‍मृत्‍यर्थसारांत’’ साठ योजनांवरून आलेल्‍यानें भागीरथीत स्‍नान केलें असतां ते षडद्बासारखें होते. येथें यात्रेंत एक योजनाची वृद्धि झाली असतां अर्ध्याकृच्छ्राची वृद्धि होते. एक योजनावरून येणार्‍यास वाटेंत पर्वत वगैरे आडवे असतां तीन कृच्छ्र एक तृतीयांशानें अधिक अशा एका कोसावरून आलेल्‍यानें भागीरथींत विधियुक्त स्‍नान केलें असतां एक कृच्छ्र होतो. अर्ध्या योजनावरून आलेल्‍या अशक्तास एक कृच्छ्र होतो. सशक्त असून जर रस्‍ता बिकट असेल तर अर्ध्या योजनावरून येऊन त्‍यानें भागीरथींत स्‍नान केलें असतां एक कृच्छ्र होतो इत्‍यादि कल्‍पना करतात. साठ योजनांवरून आलेल्‍यास प्रयागस्‍नान बारा वर्षासारखें होते. याप्रमाणें गंगाद्वार व गंगेचा आणि समुद्राचा जेथे संगम होतो तें ठिकाणी या दोन ठिकाणी जाणावे. वीस योजनांवरून आलेल्‍यास यमुनेचे स्‍नान बारा वर्षांसारखें होते. मथुरेंत दुप्पट (२४ वर्षाप्रमाणें). चाळीस योजनांवरून येऊन सरस्‍वतींत स्‍नान करणें तें चार वर्षांसारखें होते. प्रभासांत व द्वारकेंत दुप्पट (आठ वर्षासारखें). या दोन नद्यांत (यमुना व सरस्‍वती यांत) योजनाची वृद्धि झाली असतां पादकृच्छ्राची वृद्धि होते. दृषद्वती, शतद्रू, विपाशा, विस्‍तता, इरावती, मरूद्वृधा इत्‍यादि नद्यांत पंधरा योजनांवरून येऊन स्‍नान करणें तें तीस कृच्छ्रांसारखे होते. चंद्रभागा, वेत्रवती, शरयू, गोमती, देविका, कौशिकी, गंडकी इत्‍यादि देवनद्यांत बारा योजनांवरून येऊन स्‍नान करणें तें सोळा कृच्छ्रांसारखें होते. ह्या महानद्यांत जेथें परस्‍परांचा संगम होतो त्‍या ठिकाणी स्‍नान करण्यानें तीन नद्यांचें फळ मिळते. दुसर्‍या महानद्यांत स्‍नान करणें तें सहा कृच्छ्रांप्रमाणें होते. महानदांत (स्‍नान करणें तें) महानदीच्या अर्ध्या एवढे होते. शोणमहादनांत गंगेचे अर्धेफळ जाणावे. नदांत नदीपेक्षां अर्धे फळ. वैरोचन नदांत महानदीचे अर्धे फळ होते.

नर्मदा वगैरे तीर्थाचे प्रतिनिधी.

चोवीस योजनांवरून येऊन नर्मदेत स्‍नान केल्‍यानें चोवीस कृच्छ्रांसारखे होते. कुब्‍जिकेच्या संगमांत दुप्पट (४८ कृच्छ्र). शुक्‍लतीर्थांत चौपट. दहा योजनांवरून आलेल्‍यास तापीत (स्‍नान केल्‍यानें) दहा कृच्छ्रां प्रमाणें होते. पयोष्‍णीत आठ योजनांवरून आलेल्‍यास आठ कृच्छ्रांसारखे. त्‍या त्‍या संगमांत दुप्पट. साठ योजनांवरून येऊन गोदावरीत स्‍नान केल्‍यानें तीन वर्षे होतात. तीस योजनांवरून आलेल्‍यास एक वर्ष. उत्तम तीर्थांत प्रतिलोम व अनुलोम अशा रीतीनें स्‍नान करणें तें साठ कृच्छ्रांसारखें होते. वंजरेचा जेथे संगम होतो त्‍या ठिकाणी प्रयागांत त्‍याच्या दुप्पट. सप्त गोदावरीच्या भीमेश्र्वराच्या ठिकाणी तिप्पट. बारा योजनांवरून वंजरेंत दर्भांनीं तर्पण केले असतां बारा कृच्छ्रां सारखें होते. गोदावरीत विश्‍लेषांत समुद्रापर्यंत सहा पट (७२ कृच्छ्र) चार योजनांवरून प्रणीतेंत चार कृच्छ्रां सारखे. योजनावरून पूर्णानदीत त्‍याचें अर्ध (दोन कृच्छ्र). पंधरा योजनांवरून कृष्‍णवेणींत पंधरा कृच्छ्रांसारखे. वीस योजनांवरून आलेल्‍यास तुगभद्रेत वीस कृच्छ्रां सारखे. आठ योजनांवरून आलेल्‍यास मलापहारिणीत आठ कृच्छ्रांसारखे. सहा योजनांवरून आलेल्‍यास निवृत्तींत सहा कृच्छ्रां सारखे.  गोदावरीच्या ठिकाणी यात्रेंत योजनाची वृद्धि केली असतां एका योजनांत पादकृच्छ्र होतो. गुरु सिंहराशीत असतां चहुंकडे (गोदावरीच्या सर्व भागांत) गंगेप्रमाणें जाणावे. गुरु कन्याराशीत असतां कृष्‍णवेणीत सर्व ठिकाणी गंगेचें अर्ध. गुरु तुलाराशीत असतां तुगभद्रेंत गंगेचें अर्धे (फळ) जाणावे. सूर्य तुळा व कर्कराशीत असतां तुंगभद्रेत गंगेचे अर्धे (फळ) घ्‍यावें तीस योजनांवरून येऊन कृष्‍णवेणींत मलापहारिणीच्या संगमांत प्रयागांत स्‍नान करणें तें तीस कृच्छ्रां सारखें होते. भीमरथीच्या संगमांत प्रयागांत दुप्पट. तुंगभद्रेच्या संगमांत तिप्पट. निवृत्तीच्या संगमांत चौपट. ब्रह्मेश्र्वरीच्या पापचट. पातळगंगेत मल्‍लिकार्जुननाच्या ठिकाणी सहापट. त्‍याच्या पूर्वेस साठ कृच्छ्रांप्रमाणे. लिंगाच्या ठिकाणी दुप्पट. समुद्राच्या संगमांतही असेंच जाणावे. पंधरा योजनांवरून आलेल्‍यास कावेरी महानदीत पंधरा कृच्छ्रांप्रमाणे. ताम्रपर्णी कृतमाला व पयस्‍विनी यांत पंधरा योजनांवर बारा कृच्छ्रांप्रमाणे. सह्याद्रीच्या पायथ्‍या पासून उत्‍पन्न झालेल्‍या व वेदाद्रीच्या पायथ्‍यापासून उत्‍पन्न झालेल्‍या नद्या आपल्‍या लांबी प्रमाणें एक, दोन, तीन कृच्छ्रकांची फळें देणार्‍या जाणाव्या. विंध्यपर्वता पासून उत्‍पन्न झालेल्‍या दुप्पट फळ देतात. हिमालया पासून उत्‍पन्न होणार्‍या तिप्पट फळ देतात. स्‍मृतीत व पुराणांत ज्‍यांच्याबद्दल थोडें देखील सांगितलें नाही अशा कुल्‍या तीन रात्रींचे फळ देतात. लहान नद्या एक कृच्छ्राचें फळ देतात. नद्या दो कृच्छ्रांचें व महानद्या तीन कृच्छ्रांचे फळ देतात.

जेथें यात्रा सांगितली नसेल, त्‍या ठिकाणी कृच्छ्राची संख्या, कुल्‍या, नद्या व महानद्या यांचें स्‍वरूप, समुद्रस्‍नानाचें फळ इत्‍यादि.

ज्‍या ठिकाणी यात्रा सांगितली न सेल त्‍या सर्व ठिकाणी कृच्छ्राची संख्या योजनाच्या संख्येवरून जाणावी. एका योजना पासून सहा योजनां पर्यंत वहाणार्‍या नद्या कुल्‍या होत. बारा योजनां पर्यंत वहाणार्‍या अल्‍प नद्या, चोवीस योजनां पर्यंत वाहणार्‍या नद्या, चोवीस योजनां पेक्षां अधिक वहाणार्‍या महानद्या व समुद्रास मिळणार्‍या महानद्या होत. जेथें महानदी अशी प्रसिद्धि असेल त्‍याही महानद्या होत. योजनाच्या आंतही उपासानें युक्त असें नदीचें स्‍नान कृच्छ्राप्रमाणें होते. कुत्री, गाढवें, चांडाळ व शूद्र यांचा ज्‍यांशी फार संबंध होतो त्‍या व ज्‍यांत उतरण्यास फार कष्‍ट पडतात इत्‍यादी ज्‍या नद्या असतील त्‍या व पाप नद्या या वर्ज्य कराव्या. सर्व ठिकाणीं समुद्राचें स्‍नान अमावास्‍येस करावे. देवतेच्या जवळ आणि सरोवर सरित्‌ व नदी यांच्या संगमांत नेहमी स्‍नान करावे. पंधरा योजनांवरून येऊन प्रख्यात देवाच्या जवळ समुद्रांत स्‍नान करणे तें दुप्पट फळ देते. तेथें स्‍नान करून देवाचें दर्शन घेतलें असतां तिप्पट फळ मिळते. तीस योजनांवरून सेतुबंधास गेलें असतां तें तीस कृचछ्रांप्रमाणें होते. तेथे (समुद्रांत) स्‍नान करून रामेश्र्वराचे दर्शन घेतलें असतां साठ कृच्छ्रांप्रमाणें होते. विंध्यदेशांत रहाणारांस सेतुरामेश्र्वरांत व भागीरथींत तिप्पट फळ मिळते. गंगा व केदार यांच्या ठिकाणीं तसेंच दक्षिण देशांत रहाणारांस भागीरथींत सहापट व गंगेकडील प्रदेशांत रहाणारांस सेतुरामेश्र्वरांत सहापट फळ मिळते. तीस योजनांवरून येऊन कार्तिकस्‍वामीचे दर्शन घेतलें असतां तें तीस कृच्छ्रां प्रमाणें होते. जेथें गंगा अशी संज्ञा आहे तेथे असेंच जाणावे. तीस योजनांवरून येऊन श्रीरंग, पद्मनाभ (अनंतशयन), पुरुषोत्तम, चक्रकोट व महालक्ष्मी यांचे दर्शन घेतले असतां तसेंच लोणार स्‍थानांत गेलें असतां तीस कृच्छ्रां प्रमाणें होते. केदारांत तिप्पट विष्‍णु, शंकर, सूर्य व देवी यांच्या सर्व स्‍थानांचे दर्शन पंधरा कृच्छ्रां प्रमाणें होते. प्रख्यात स्‍थानाचें ठिकाणी दुप्पट. अहोबलांत ही तसेच. श्रीशैलाची प्रदक्षिणा साठ कृच्छ्रां प्रमाणें होते. श्रीशैलावरील एकेका शिखाचें दर्शन बारा कृच्छ्रांसारखें होते. दुसर्‍या क्षेत्रांत स्‍वयंभू (देवते) चें दर्शन तीस कृच्छ्रां सारखें होते. सर्व ठिकाणी कृच्छ्रांच्या संख्येनें योजनांची संख्या जाणावी.

या प्रमाणें तीर्थांचें प्रत्‍यान्माय सांगितले.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP