मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १५२ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५२ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘स्‍तेयापवादमाह शंखः’’ अस्‍तेयमग्‍नये काष्‍टमस्‍तेयं च तृणं गवे। कन्याहरणमस्‍तेयं यो हरत्‍यनलंकृतामिति कन्याहरणं राक्षसविवाहपरं ‘‘मनुरपि’’ द्विजोध्वगः क्षीणवृत्तिर्द्वाविक्षू द्वेच मूलके। आददानः परक्षेत्रान्न दंडं दातुमर्हति।
‘‘तथा’’ चणकव्रीहिगोधूमयवानां मुद्गमाषयोः। अनिषिद्धैर्गृहीतव्यो मुष्‍टिरेकः पथिस्‍थितैः। तथैव सप्तमे भक्ते भक्तानि ष्‍ज्ञडनश्र्नता।
अश्र्वस्‍तनविधानेन हर्तव्यं हीनकर्मण इति।

इति भट्टनीलकंठकृते प्रायश्चित्तमयूखे स्‍तेयप्रायश्चित्तानि.

अग्‍नीकरितां लाकूड, गाई करितां घास, मार्गात ऊंस वगैरे चोरलें असतां दोष नाहीं.

‘‘शंख चोरीविषयी अपवाद सांगतो’’---अग्‍नीकरितां लाकुड चोरलें असतां हरकत नाहीं. गाईकरितां घास चोरला असतां हरकत नाहीं. जो अलंकारावाचून कन्या (मुलगी) चोरतो, त्‍याला दोष नाहीं. कन्या चोरणें हें राक्षस विवाहाविषयीं जाणावें. ‘‘मनुही’’---जर ब्राह्मणानें प्रवास करीत असतां मार्गांत त्‍यास खाण्याची अडचण पडली तर, त्‍यानें दुसर्‍याच्या शेतांतून दोन ऊंस व दोन मुळें घेतलीं असतां तो दंडास पात्र होत नाही. ---त्‍याप्रमाणें’’ निषिद्ध नसणारे (योग्‍य) असें मार्गांत असणारे जे त्‍यांनीं चणे, भात, गहू, जव, मुग व उडीद यांची एक मूठ संकटकाळीं घ्‍यावी. दिवसां व रात्रीं मिळून दोनदां भोजन करावें अशी शास्त्राची आज्ञा असून त्‍याप्रमाणें सहा वेळां अर्थात्‌ तीन दिवस भोजन मिळालें नाहीं (उपास पडले). नंतर चवथ्‍या दिवशीं पहिलें जेवण झाल्‍यानंतर एक दिवसास पुरेल इतकें अन्न हीनकर्म करणार्‍या पासूनही आणावें.

याप्रमाणें भट्ट नीलकंठ यानें केलेल्‍या प्रायश्चित्तमयूखांत चोरीची प्रायश्चित्तें सांगितली.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP