प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘यमः’’ कृच्छ्रातिकृच्छ्रं कुर्वीत चांद्रायणमथाचरेत्। दशसंख्याश्र्च गा दद्यादंगच्छेदोयदा भवेत्।
अंगच्छेद एतेषां समुच्चय इति ‘‘शूलापणिः’’। ‘‘योगीश्र्वरः’’ विप्रदंडोद्यमे कृच्छ्रस्त्वतिकृच्छ्रो निपातने।
कृच्छ्रातिकृच्छ्रोऽसृकपाते कृच्छ्रोभ्यंतरशोणिते। दंडः शस्त्रस्याप्युपलक्षकः। ‘‘बृहस्पतिः’’ काष्ठादिना ताडयित्वा त्वग्भेदे कृच्छ्रमाचरेत्। अस्थिभेदे तु कृच्छ्रं तु पराकं चांगकर्तने
शस्त्र वगैरेनें अवयवाचा तुकडा पडणें व ब्राह्मणास काठी उगारणें इत्यादिकांविषयी प्रायश्चित्त.
‘‘यम’’---जर शस्त्रादिकानें एखाद्या शरीराच्या भागाचा तुकडा पडला तर ‘‘कृच्छ्रातिकृच्छ्र व चांद्रायण करावें, आणि दहा गाई द्याव्या. ‘‘अवयवाचा तुकडा पडला असतां ही सगळीं प्रायश्चित्तें करावी’’ असें ‘‘शूलपाणि’’ म्हणतो. ‘‘याज्ञवल्क्य’’---ब्राह्मणास मारण्याकरितां काठी उगारिली असतां ‘‘कृच्छ्र’’, काठी मारिली असतां ‘‘अतिकृच्छ्र’’, रक्त निघालें असतां ‘‘कृच्छ्रातिकृच्छ्र’’, व रक्त आंतल्याआंत असतां (तो भाग रक्ताळला असतां) ‘‘कृच्छ्र’’ प्रायश्चित्त करावे. काठी हें शस्त्राचें उपलक्षण आहे. ‘‘बृहस्पति’’---काठी वगैरे मारल्यानें जर चामडें निघालें तर ‘‘कृच्छ्र’’ करावें. हाड मोडले तर ‘‘कृच्छ्र’’ व अंग कापलें तर ‘‘पराक’’ प्रायश्चित्त करावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP