अथ पापभेदाः
‘‘विष्णुः’’ अतिपातमहापातकानुपातकोपपातकेषु प्रवर्तते। जातिभ्रंशकरेषु संकरीकरणेष्वपात्रीकरणेषु मलावहेषु प्रकीर्णकेष्वपि।
‘‘तत्र महापापान्याह ‘‘मनुः’’ ब्रह्महत्त्या सुरापानं स्तेयं गुर्वंगनागमः। महांति पातकान्याहुः संप्रयोगं च तैः सह।
ब्रह्महत्त्या साक्षाद्बाह्मणमारणं।‘‘अकामकृते तस्मिन्प्रायश्चित्तमाह याज्ञवल्क्यः’’ शिरःकपाली ध्वजवान् भिक्षाशी कर्म वेदयन्।
ब्रह्महा द्वादशाद्बानि मितभुक् शुद्धिमात्प्रुयात् शिरःकपाली स्वहतशिरोऽस्थिधृक्। ध्वजः आरोपितशवशिरोदंडः।
‘‘यत्तु मध्यमांगिराः’’ गवां सहस्रं विधिवत्पात्रेभ्यः प्रतिपादयेत्। ब्रह्महा विप्रमुच्येत सर्वपापेभ्य एवचेति तन्माता पितृगुर्वादिवधविषयं।
‘‘मनुः’’ यजेत वाश्र्वमेधेन स्वर्जिता गोसवेन वा।अभिजिद्विश्र्वाजिभ्द्यां वा त्रिवृताग्निष्टुतापि वा।
जपन्वान्यतमं वेदं योजनानां शतं व्रजेत्। ब्रह्महत्त्यापनोदाय मितभुङ् नियतेंद्रियः। सर्वस्वं वा वेदविदे ब्राह्मणायोपपादयेत्।
धनं वा जीवनायालं गृहं सपरिच्छदं। हविभुग्वानुप्रसरेत्प्रतिस्रोतः सरस्वती।
जपेद्वा नियताहारस्त्रिकृत्वो वेदसंहितामिति सर्वस्वं वा धनं वा गृहं घेति प्रायश्चित्तत्रयमिति ‘‘विज्ञानेश्र्वरः’’ उत्तरार्धं पूर्वार्धस्यैवशेषः न स्वतंत्रप्रायश्चित्तद्वयविधानार्थमिति ‘‘मेधातिथिः’’ युक्तं चैतत् कियत्सर्वस्वमित्याकांक्षापूरणात् अन्यथापणादिसर्वस्वदानेपि शुद्धिः स्यात्।
‘‘काश्यपः’’ आत्मतुल्यं सुवर्णं वा दद्याद्वा विप्रतुष्टिकृदिति।
‘‘एतेषां च प्रायश्चित्तानां व्यवस्थोक्ता भविष्ये’’ जातिमात्रं यदा विप्रं हन्यादमतिपूर्वकं। वेदविच्चाग्निहोत्री च तदा तस्य भवेदिदं।
जपन्वान्यतमं वेदं योजनानां शतं व्रजे दिति। ‘‘तत्रैव’’ जातिमात्रं यदा हन्याद्ब्राह्मणं ब्राह्मणो गृही।
वेदभ्यासविहीनो वै धनवानग्निवर्जितः। प्रायश्चित्तं तदा कुर्यादिति पापविशुद्धये। धनं वा जीवनायालं गृहं वा सपरिच्छदमिति।
‘‘एतस्मिन्नेव विषये ‘‘पराशरआह’’ चातुर्विद्योपपन्नस्तु विधिवत् ब्रह्मघातके। समुद्रसेतुगमनं प्रायश्चित्तं विनिर्दिशेत्।
सेतुबंधपथे भिक्षां चातुर्वर्ण्यात् समाहरेत्। वर्जयित्वा विकमस्थान् छत्रोपानद्विवर्जितः। अहं दुष्कृतकर्मा च महापातककारकः।
गोकुलेषु च गोष्ठेषु ग्रामेषु नगरेषु च। तपोवनेषु तीर्थेषु नदीप्रस्रवेणेषु च। एतेषु ख्यापयेदेनः पुण्यं गत्वा च सागरं।
ब्रह्महा विप्रमुच्येत स्नात्वा तस्मिन्महोदधौ। ततः पूतोगृहं प्राप्य कृत्वा ब्राह्मणभोजनं। दत्वा वस्त्रं पवित्राणि पूतात्मा प्रविशेद्गृहं।
गवां वापि शतं दत्वा चातुर्विद्याय दक्षिणां। एवं शुद्धिमवाप्नोति चातुर्विद्यानुमोदित इति। ‘‘अत्र विशेष उक्तोभविष्ये’’ विंध्यादुत्तरतोयस्य निवासः परिकीर्तितः। पराशरमतं तस्य सेतुबंधस्य दर्शनमिति।
पापांचे भेद.
अतिपातक, महापातक वगैरे पातकांचे भेद. पंच महापातके ब्रम्हहत्त्येचे प्रायश्चित्त.
‘‘विष्णु’’---अतिपातकें, महापातकें, अनुपातकें व उपपातकें यांच्या विषयीं जो प्रवृत्त होईल, तसेंच जातिभ्रंशकर, संकरीकरण, अपात्रीकरण, मलावह व प्रकीर्ण यां विषयी जो प्रवृत्त होईल. मनु महापातकें सांगतो’’---प्रत्यक्ष ब्राह्मणास ठार मरणें, दारू पिणें, चोरी (सोन्याची) करणें, गुरूच्या (बापाच्या) स्त्रीशी गमन करणें व यांच्याशीं संसर्ग करणें ही (पांच) महापातकें होत. ‘‘बुद्धिपूर्वक ब्रह्महत्या केली नसल्यास तिचे विषयीं याज्ञवल्क्य प्रायश्चित्त सांगतो’’---ब्रह्महत्या करणारानें आपण मारलेल्या ब्राह्मणाची कवटी हातांत घ्यावी, आणि दुसरी (कवटी) काठीच्या टोंकास अडकवून आपलें कर्म लोकांस निवेदन करून भिक्षेवर जे अन्न मिळेल त्याच्या योगानें मिताहार करावा. याप्रमाणें बारा वर्षे पर्यंत केले असतां तो शुद्ध होईल.स ‘‘जेंतर मध्यमांगिरस्’’ ‘‘ब्रह्महत्या करणारानें सत्पात्र अशा ब्राह्मणांस हजार गायींचे विधीप्रमाणें दान द्यावे, म्हणजे तो सर्व पापांपासून मुक्त होईल’’ असें म्हणतो तें आई, बाप, गुरु इत्यादिकांच्या वधाविषयी आहे. ‘‘मनु’’---ब्रह्महत्येचा दोष जाणण्याकरितां ब्रह्महत्या करणारानें आपली इंद्रिये स्वाधीन ठेऊन मितभोजन करावे आणि अश्र्वमेध, स्वर्गजित्, गोसव, अभिजित्, विश्र्वजित, त्रिवृत् व अग्निष्टुत यांपैकी एखादा यज्ञ करावा. किंवा एखाद्या वेदाचा जप (पाठ) करावा, व शंभर योजनें पर्यंत गमन करावें (यात्रा करावी). किंवा वेद पढलेल्या ब्राह्मणास त्याच्या उपजीविकेस पुरेल इतके द्रव्य द्यावें व सामग्रीनें युक्त असें घर द्यावे. किंवा हविष्यान्न खाऊन सरस्वती नदीच्या प्रवाहाकडे तोंड करून स्नान करीत जावे. किंवा नियमित आहार करून वेदाच्या संहितेचें तीनदां पारायण करावे. सर्वस्व (सर्व इष्टेट) किंवा द्रव्य (उपजीविकेस पुरेल इतकें) किंवा घर (सर्व सामग्रीनें युक्त) अशीं तीन प्रायश्चित्तें (निराळी) होत असें ‘‘विज्ञारेश्र्वर’’ म्हणतो. ‘‘श्र्लोकाचें उत्तरार्ध (धनं वाजी.) हें पूर्वार्धाचें (सर्वस्वं वा) चा शेष आहे, निराळ्या दोन प्रायश्चित्ताच्या विधाना करितां नाही’’ असे ‘‘मेधातिथि’’ म्हणतो, हेंच योग्य दिसते, कारण, सर्वस्व (सर्व इष्टेट) किती द्यावें ही जी शंका उत्पन्न होते त्या शंकेचें समाधान होते. असें जर न मानिलें तर पैसा इत्यादि सर्वस्वाच्या दानानें ही शुद्धि होईल. ‘‘काश्यप’’---आपल्या वजनाएवढें सोनें ब्राह्मणास द्यावें किंवा त्याचा संतोष होईल तेवढें सोनें द्यावे. ‘‘ह्या प्रायश्चित्तांची व्यवस्था भविष्यांत सांगितली आहे ती अशी’’---वेद जाणणार्या अग्निहोत्र्याकडून जर अज्ञानानें केवळ जातीनें ब्राह्मण असेल अशाचा वध होईल तर, त्यानें एखाद्या वेदाचें पारायण करावें. व शंभर योजन पावेतों गमन करावें (यात्रा करावी). ‘‘त्यांतच’’---वेद न शिकलेला, अग्निहोत्र न घेतलेला, धनवान् असा गृहस्थाश्रमी ब्राह्मण जर केवळ जातीनें ब्राह्मण अशास मारील तर, त्यानें पापाची शुद्धि होण्याकरितां ब्राह्मणास त्याच्या उपजीविकेस पुरेल इतके द्रव्य द्यावें किंवा सर्वसामग्रीनें युक्त असे घर द्यावे. हें त्यानें प्रायश्चित्त करावे. ‘‘याचविषयी पराशर सांगतात’’---चार वेद पढलेल्या ब्राह्मणानें ब्रह्महत्या करणारास समुद्रसेतूस (सेतुबंध रामेश्र्वरास) विधीप्रमाणें गमन करणें हे प्रायश्चित्त सांगावें, तें असे---त्यानें सेतुबंधा (रामेश्र्वरा) कडे छत्री न घेतां व जोडा न घालतां जावे. वाटेंत वाईट कर्मे करणारांस वगळून चारी वर्णांपासून भिक्षा मागावी, व गायींच्या टोळ्या, गोठे, गांव, नगरें, तपोवनें तीर्थें व नदीचें प्रवाह यांच्या ठिकाणीं त्यानें आपलें पाप सांगावे. याप्रमाणें फिरत फिरत पुण्यकारक अशा समुद्राजवळ जाऊन त्यांत ब्रम्हहत्या करणारानें स्नान केलें असतां तो शुद्ध होईल. नंतर शुद्ध झालेला असा होत्साता त्यानें घरीं येऊन ब्राह्मण भोजन करावें व त्यांस (ब्राह्मणांस) वस्त्रें व पवित्रकें द्यावी. नंतर याप्रमाणें पवित्र झालेला त्यानें आपल्या घरांत प्रवेश करावा, अथवा त्यानें चार वेद जाणणार्या ब्राह्मणांस शंभर गायी दक्षिणा द्यावी. याप्रमाणें चार वेद जाणणार्याच्या आज्ञेवरून त्याची शुद्धि होईल. ‘‘या विषयीं भविष्यांत विशेष सांगितला आहे तो असा---विंध्यपर्वताच्या उत्तरेकडे ज्याचें रहाणें असेल, त्यानें सेतुबंध रामेश्र्वराचें दर्शन घ्यावें असें ‘‘पराशराचें’’ मत आहे.