प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १३५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘काकादिस्पृष्टमपवदति प्रायश्चित्तविवेके यमः’’ देवद्रोण्यां विवाहेषु यज्ञेषु प्राकृतेषु च। काकैः श्र्वभिश्र्च संस्पृष्टमन्नं तन्न विवर्जयेत्।
अन्नं तन्मात्रमुध्दृत्यशेषं संस्कारमर्हति। घृतानां प्रोक्षणाच्छुद्धिर्द्रवाणामभिपातनात्। संस्पर्शाच्च भवेच्छुद्धिरपामग्नेर्घृतस्य च।
छगेन मुखसंस्पृष्टं शुचि चैव हि तद्भ्वेत्।
देवयात्रा इत्यादिकांत कावळे व कुत्रे यांनीं स्पर्श केलेलें अन्न टाकूं नये. त्याची शुद्धि.
‘‘प्रायश्चित्तविवेकांत यम कावळा इत्यादिकांनीं स्पर्श केलेल्या अन्नाचा अपवाद सांगतो’’---देवयात्रा, विवाह व साधारण यज्ञ यांत कावळे व कुत्रे यांनीं स्पर्श केलेलें अन्न वर्ज्य करूं नये. जेवढ्या भागास स्पर्श झाला असेल तेवढेंच काढून टाकून बाकी राहिलेलें संस्कारास योग्य होते. तुपाची प्रोक्षणाच्या योगानें शुद्धि होते. द्रव (पातळ) पदार्थांची अभिपातनानें शुद्धि होते. पाणी व घृत यांस अग्नीचा स्पर्श झाल्यानें त्यांची शुद्धि होते. बकर्यानें तोंडानें त्यास (अन्नास) स्पर्श केला तर ते शुद्धच होईल.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP