प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ९६ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘यत्तु भविष्ये’’ अकामतः सुरां पीत्वा पैष्ठीं सत्कुलनंदन। कृच्छ्रातिकृच्छ्रौ कृत्वा वै पुनः संस्कारतः शुचिः।
कणान्वा भक्षयेदद्बं पिण्याकं वा सकृन्निशीति तत्सुरामात्रपाने रोगापनेयविषयं।
‘‘तथाच तत्रैव’’ तथास्मिन्नेव विषये वासिष्ठं परिकीर्तितं। यदि रोगैर्भवेद्दृष्टो नेतरस्य कदाचन।
कृच्छ्रश्र्चात्र सुरश्रेष्ठ तप्तश्र्चैव उदाहृतः। ‘‘यत्तु मनुः’’ अज्ञानाद्वारुणीं पीत्वा संस्कारेणैव शुध्यति।
मतिपूर्वमनिर्देश्यं प्राणांतिकमिति स्थितिरिति तत्र वारुणीपदं पैष्ठीपरं। उत्तरार्धे प्राणांतिकनिर्देशात्।
पूर्वार्धं तु रोगिपरमेव। अत्र संस्कार मात्रमेव प्रायश्चित्तमिति केचित् तन्न ‘‘अज्ञानाद्वारुणीं पीत्वा संस्कारेणैव शुध्यति।
तप्तकृच्छ्रान्वितेनेह केवलेन विशुध्यतीति भविष्योक्तेः’’ अज्ञानादौषधार्थ ‘‘मत एव बृहस्पतिः’’ गौडीं माध्वीं तथा पैष्ठीं पीत्वा विप्रः समाचरेत्। तप्तकृच्छ्रं पराकं च चांद्रायणमनुक्रमादिति
अज्ञानानें किंवा रोग बरा होण्याकरितां सुरापान केलें तर प्रायश्चित्त.
‘‘जें तर भविष्यांत’’ हे सत्कुलनंदना ! (चांगल्या कुळांतील मुला) जो अज्ञानानें पैष्ठी सुरा पिईल त्यानें कृच्छ्र व अतिकृच्छ्र करून पुन्हा संस्कार करावे म्हणजे तो शुद्ध होईल, किंवा त्यानें तांदुळाच्या कण्या अथवा तिळांची पेंड एक वर्षपर्यंत रात्रीं एक वेळां खावी’’ असें वचन आहे तें रोग दुर होण्याविषयीं केवळ सुरेच्या पानाविषयीं जाणावे. ‘‘तसेंच त्यांतच’’ तसेंच याचविषयी वसिष्ठानें प्रायश्चित्त सांगितलें आहे जर रोगानें मनुष्यास पीडा झाली असतां त्यानें सुरा घेतली तर त्याला हे सुर श्रेष्ठा ! तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त सांगितलें आहे. इतरास केव्हांही (हें प्रायश्चित्त) नाहीं. ‘‘जें तर मनु’’ १ जो अज्ञानानें वारुणी पिईल, तो संस्कारानें शुद्ध होईल. २ जो बुद्धिपूर्वक वारुणीचें पान करील त्याला प्राणांतिक (प्राण जाईपर्यंत) प्रायश्चित्त सांगितलें आहे अशी स्थिति आहे’’ असें म्हणतो. त्यांत वारुणीपद हें पैष्ठी सुरेविषयीं जाणावें. कारण, २ उत्तरार्धांत प्राणांतिक प्रायश्चित्त सांगितलें आहे. १ पूर्वार्ध तर रोग्याविषयींच आहे. येथे केवळ संस्कार करणें हेंच प्रायश्चित्त असें कित्येक म्हणतात, परंतु ते बराबर नाहीं, कारण, ‘‘जो अज्ञानानें वारुणीनें पान करील, त्याची एका तप्तकृच्छ्रानें युक्त अशा संस्काराच्या योगानें शुद्धि होईल’’ असें भविष्यांत म्हटलें आहे अज्ञानानें म्हणजे औषधासाठींच. ‘‘म्हणूनच बृहस्पति’’---जो ब्राह्मण गौडी, माध्वी, व पैष्ठी (सुरा) पिईल, त्यानें अनुक्रमानें तप्त कृच्छ्र, पराक व चांद्रायण प्रायश्चित्त करावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP