प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ११७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘भरद्वाजः’’ अपांक्तेयान्यमुद्दिश्यश्राद्धमेकादशेऽहनि। ब्राह्मणस्तत्र भुक्त्वान्नं शिशुचांद्रायणं चरेत्।
आमश्राद्धे तथा भुक्त्वा तप्तकृच्छ्रेण शुध्यति।
संकल्पिते तथा भुक्त्वा त्रिरात्रं क्षपणं भवेदिति तदापद्विषयं आमश्राद्धं इति नवश्राद्ध विषयं।
‘‘यत्तु तत्रैव विष्णुः’’ आमश्राद्धाशने त्रिरात्रमिति तदापद्विषयं।
‘‘यत्तु शंखः’’ आमश्राद्धाशने विद्वान् मासमेकं व्रतं चरेदिति तदभ्यासविषयं संकल्पितं इति षाण्मासिकादिविषयं।
‘‘मनुः’’ मासिकान्नं तु योऽश्र्नीयादसमावर्तिकोद्विजः। स त्रीण्यहान्युपवसेदेकाहमुदके वसेदिति। ‘‘यत्तु संवर्तः’’
मृतकान्नं नवश्राद्धं मासिकान्नं तथैव च। ब्रह्मचारी तु योऽश्र्नीयान्मधुमांसं कथंचन।
प्राजापत्यं तु कृत्वासौ मौंजीहोमेन शुध्यतीति तद्ब्रुद्धिपूर्वविषयं।
‘‘अनुक्तप्रायश्चित्ते तु सर्वत्र उशनाः’’ दशकृत्वः पिबेदापोगायत्र्या श्राद्धभुक्द्विजः।
ततः संध्यामुपासीत शुध्येत्तु तदनंतरमिति आमश्राद्धे तु सर्वत्रार्धं। ‘‘तथाच षट्त्रिंशन्मते’’ आमश्राद्धे भवेदर्धं प्राजापत्यादि सर्वदेति
एकोद्दिष्ट, नवश्राद्धें इत्यादिकांत ब्राह्मण भोजन करील, तसेंच बह्मचारी मासिकादिश्राद्धांचें अन्न खाईल तर प्रायश्चित्त. जेथें प्रायश्चित्त सांगितलें नाही तेथें प्रायश्चित्त.
‘‘भरद्वाज’’---पतिता वाचून दुसर्याच्या उद्देशानें अकराव्या दिवशीं जें श्राद्ध करण्यांत येईल, त्या श्राद्धीं जो ब्राह्मण अन्न भक्षण करील त्यानें शिशुचांद्रायण करावे. जर नवश्राद्धांत भक्षण करील तर तो तप्तकृच्छ्रानें शुद्ध होईल. षाण्मासिकादिकांत भोजन केलें तर तीन दिवस पर्यंत उपवास करावा असें म्हणतो तें संकटाविषयीं जाणावें. ‘‘जें तर त्यांतच विष्णु’’ ‘‘नव श्राद्धांत तीन दिवस उपास करावा’’ असें म्हणतो तें संकटाविषयीं जाणावें. ‘‘जें तर शंख’’ ‘‘विद्वानानें नवश्राद्धांत भोजन केलें तर एक महिना पर्यंत व्रत करावें असे म्हणतो तें अभ्यासाविषयीं जाणावें. ‘‘मनु’’---ज्याचें समावर्तन (सोडमुंज) झालें नाही अस जो द्विज मासिकश्राद्धाचें अन्न भक्षण करील, त्यानें तीन दिवसपर्यंत उपास करावा आणि एक दिवस उदकांत वास करावा. ‘‘ जें तर संवर्त’’ ‘‘जो ब्रह्मचारी प्रेताचें अन्न, नवश्राद्ध व मासिक श्राद्ध यांचें अन्न तसेंच मद्य व मांस यांपैकी एखादें कोणत्याही रीतीनें खाईल, त्यानें प्राजापत्य प्रायश्चित्त करून मौजी होम करावा म्हणजे तो शुद्ध होईल’’ असें म्हणतो तें बुद्धिपूर्वकाविषयीं जाणावें. ‘‘जेथें प्रायश्चित्त सांगितलें नसेल अशा सर्व ठिकाणीं उशनस्’’---श्राद्धांत जेवणार्या ब्राह्मणानें दहा वेळां गायत्रीमंत्रानें अभिमंत्रित केलेलें पाणी प्यावें. नंतर सायंसंध्या करावी म्हणजे तो शुद्ध होईल. आमश्राद्धांत सर्व ठिकाणीं अर्धें (प्रायश्चित्त), ‘‘तसेंच षट्त्रिंशन्मतांत’’ आमश्राद्धांत नेहमीं प्राजापत्यादि अर्धें (प्रायश्चित्त) करावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP