प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘यत्तु मिताक्षरायां स्मृत्यंतरे’’ कृच्छ्राण्येतानि कार्याणि
सदा वर्णत्रयेण तु। कुच्छ्रेष्वेतेषु शुद्रस्य नाधिकारो विधीयत
इति तत्काम्यकृच्छ्रपरं ‘‘ यत्तु मनुः’’ न शूद्रे पातकं
किंचिन्न च संस्कारमर्हति। नास्याधिकारो धर्मोस्ति न धर्मात्प्रतितषेधनमिति।
तदर्थमाह मेधातिथिः’’ द्विजाधिकारिकभक्ष्याभक्ष्यप्रकरणाल्लशुनादिभक्षणे पापं नास्ति
विहितविवाहाद्यातिरिक्तसंस्कारं च नार्हति। उपवासादावेतस्य न नित्योऽधिकारः।
तदकरणान्न प्रत्यवैति तस्मादेव धर्मादस्य प्रतिषेधनमपि नास्ति करणेऽभ्युदयोऽस्त्येवेति
शूद्राच्या प्रायश्चित्ता विषयी विशेष.
‘‘जें तर मिताक्षरेंत दुसर्या स्मृतींत’’ ‘ही कुच्छ्रें ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तिघांनी नेहमी करावी. या कृच्छ्रां विषयीं शूद्र अधिकारी होत नाही, असें सांगितलें आहे तें काम्यकृच्छ्रा विषयीं आहे. ‘‘ जें तर मनु’’ शूद्रास किंचित् देखील पातक नाहीं, तो संस्कारास (मुंज इत्यादिकास) ही योग्य नाही, धर्माविषयी त्यास अधिकार नाही व धर्मापासून त्याचें स्खलन होत नाही असें म्हणतो त्याचा अर्थ मेधातिथि सांगतो-द्विजास उद्देशून सांगितलेलें जें भक्ष्याभक्ष्य प्रकरण त्यावरून लसूण इत्यादिकांच्या भक्षणानें शूद्रास पातक नाहीं. उपास इत्यादिका विषयी त्यास अधिकार निरंतरचा नाही. उपास इत्यादि न केल्यानें त्यास दोष नाहीं, म्हणूनच धर्मापासून त्याचें स्खलन होतें असें ही नाहीं, केल्याने त्याचें कल्याणच आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP