प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अथ पूर्वोक्तभस्मादिस्नानप्रयोगः
‘‘लिंगे’’ ईशानेन शिरोदेशे मुखं तत्पुरुषेणतु। हृदोदेशमघोरेण गुह्यं वामेन सुव्रतः।
सद्येन पादौ सर्वांगं प्रणवेन तु शोधयेत्। अत्रेशानादिपदेनेशानः सर्वविद्यानमित्यदयो मंत्रा उच्यंते।
चतुर्थ्यतानि नमोंतानीशानादिपदान्येव मंत्रा इत्यन्ये। अग्निरिति भस्म। जलमिति भस्म। स्थलमिति भस्म। व्योमेति भस्म।
सर्व हवा इदं भस्मेति पंत्रमंत्रा ईशानादिमंत्रस्थान इत्यपरे।
‘‘विष्णुः’’ अग्रमग्रमिति स्मृत्वा मानस्तोकेन वा पुनः गोमयैर्लेपयेत्प्राज्ञः सौदकैर्भानुदर्शितैः। ‘‘योगी’’ त्रिधा कृत्वा मृदं तां तु गोमयं च विशेषतः। अधमोत्तमध्यानामंगानां क्षालनं च तैः। ‘‘कौर्मे’’ गोमस्य प्रमाणं तु योनांगं लेपयेत्ततइति.
पूर्वी सांगितलेल्या भस्म वगैरेंच्या स्नानाचा प्रयोग.
भस्मस्नानाचा विधि व शेणाच्या स्नानाचा विधि.
‘‘लिंगपुराणांत’’ प्रायश्चित्त करणारानें ‘‘ईशानेन’’ यानें डोकीस, तत्पुरुषेण यानें तोंडास, अघोरेण यानें हृदयास, वामेन यानें गृह्यास (इंद्रियास), सद्येन यानें दोन पायास व प्रणवानें सर्वांगास भस्म लावावें या वाक्यांतील ईशानादि पदानें ‘‘ईशानः सर्व विद्यानां’’ इत्यादि मंत्र म्हणावे. शेवटी चतुर्थी व नमः हीं पदें लाविलेली ईशानादि पदें हेच मंत्र असे दुसरे म्हणतात. जसें ईशानाय नमः। तत्पुरुषाय नमः। इत्यादि०। अग्निरिति भस्म। वायुरीति भस्म। जलमिति भस्म। स्थलमिति भस्म। व्योमेति भस्म। ँ हवा इदं भस्म, हे पाच मंत्र ईशानादि मंत्राच्या ठिकाणी घ्यावें असे ‘‘दुसरे’’ म्हणतात. ‘‘विष्णु’’ -ज्ञात्यानें ‘‘अग्रमग्रं’’ हा मंत्र म्हणून अथवा पुन्हां ‘‘मानस्तोकेन’’ हा मंत्र म्हणून पाण्यांत शेण कालवून तें सूर्यास दाखवून त्याच्या योगानें अंगास लेप करावा. ‘‘योगी’’ (याज्ञवल्क्य)-माती व अधिक शेण घेऊन त्यांचे तीन भाग करून त्यांच्या योगानें अधम (बस्तिखालची), उत्तम (खांद्यावरची) आणि मध्यम (या दोहोंमधली) अशा अंगांस क्षालन करावे. (अंगांस चोळावे). ‘‘कूर्मपुराणांत’’ शेणाचें एवढें प्रमाण असावें की त्याच्या योगानें सगळें अंग चोपडलें जाईल.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP