प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘याज्ञवल्क्यः’’ गुरुं त्वंकृत्य हुंकृत्य विप्रं निर्जित्य वादतः। बध्वा च वाससा क्षिप्रं प्रसाद्योपवसेद्दिनं। ‘‘सुमंतुः’’ देवर्षिगोब्राह्मणाचार्यमातापितृनरेंद्राणां प्रतिषेधने आक्रोशने जिव्हां दहेद्धिरण्यं दद्यादिति तदभ्यास विषयं।
‘‘यमः’’ आबध्य ब्राह्मणं कंठे प्रायश्चित्तं विधीयते। त्रिरात्रोपोषितः स्नात्वा प्रणिपत्य प्रसादयेत्
गुरूशी तू मी करणें, देवॠषि वगैरेंचा अपमान करणें त्यांविषयी प्रायश्चित्ते.
‘‘याज्ञवल्क्य’’---गुरूशी ‘‘तूं मी’’ करणें, गुरूस तुच्छ मानणें, वादांत ब्राह्मणास जिंकणें, आणि ब्राह्मणास वस्त्रानें बांधणें ही कर्में केली असतां त्यांस प्रसन्न करून एक दिवसपर्यंत उपास करावा. ‘‘सुमंतु’’---देव, ॠषि, गाय, ब्राह्मण, आचार्य, आई, बाप व राजा यांचा अपमान केला असतां व त्यांस शिव्या दिल्या असतां जीभ पोळावी व सोनें द्यावे. ‘‘हें अभ्यासाविषयीं जाणावें.’’ ‘‘यम’’---ब्राह्मणाच्या गळ्यांत दोरी घालून तिनें गळा बांधला असतां प्रायश्चित्त करावें तें असें---तीन दिवसपर्यंत उपास करून स्नान करून त्या ब्राह्मणाच्या पायां पडून त्याला प्रसन्न करावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP