प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
अत्र संप्रतिपादकाख्यानुग्राहकस्य व्यापारबाहुल्यान्मौलिकमेव पादोनं।
आज्ञाप्रार्थनादिना प्रयोजकस्यार्धं।
प्रवृत्तप्रवर्तकस्यानुमंतुः सार्धपादं।
‘‘प्रयोजायितानुमंता कर्ताचेति स्वर्गनरकफलेषु तु कर्मभागिनो योभूय आरभते तस्मिन्फलविशेष इत्यापस्तंबोक्तेः’’ एतेषां प्रायश्चित्तेयत्तायां तु ग्रंथकारा एव प्रमाणं
अनुग्राहक वगैरेंस प्रायश्चित्त.
येथें संप्रतिपादक अशी ज्याला संज्ञा आहे असा जो अनुग्राहक त्यास अधिक खटपट असल्यामुळें मूळांत सांगितलेलेंच चतुर्थांशानें कमी एवढें प्रायश्चित्त. हुकूम, प्रार्थना इत्यादिकांच्या योगानें प्रयोजकास अर्धे. एखादें कृत्य करण्यास प्रवृत्त झालेल्यास अनुमोदन देणारा जो अनुमंता त्यास सार्धपाद (३/८). कारण प्रयोजयिता, अनुमंता आणि कर्ता हे स्वर्ग व नरक यांची प्राप्ति करणारीं जी कर्में त्या कर्माचा उपभोग घेतात. जो जास्त कर्म करील त्याला विशेष फळ मिळेल असे ‘‘आपस्तंबाचें’’ वचन आहे. यांच्या प्रायश्चित्ताच्या इयते विषयी ग्रंथकार हेच प्रमाण होत.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP