प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘आश्रमिणां विशेषमाहांगिराः’’ गृहस्थोक्तानि पापानि कुर्वंत्याश्रमिणो यदि।
शौचवच्छोधनं प्रोक्तर्वाक् ब्रह्मनिदर्शनादिति शौचं च द्विगुणादि ‘‘तथा च मनुः’’ एतच्छौचं गृहस्थस्य द्विगुणं ब्रह्मचारिणः।
त्रिगुणं तु वनस्थानां यतीनां च चतुर्गुणमिति गृहस्थोक्तिः स्नातकोपलक्षिका अन्यथा विधुरादेः प्रायश्चित्तमेव न स्यात्।
ब्रह्मनिदर्शनं तत्वज्ञानं ज्ञानोत्पत्त्यनंतरं तृप्तन्नं पापं ज्ञानेनैव नाश्यते ‘ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मासात्कुरु तेऽर्जुनेति भगवद्गीतोक्तेः’।
ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यासी यांच्या पातका विषयी निर्णय.
‘‘अंगिरस् आश्रम्यांस विशेष सांगतो’’ -गृहस्थास सांगितलेली पातके जर आश्रमी ब्रह्मानिदर्शन (तत्त्वज्ञान) होण्याच्या पूर्वी करतील तर त्यांची शुद्धि दुप्पट इत्यादि प्रायश्चित्त केल्यानें होतें असे सांगितलें आहे. ‘‘तसेंच मनु’’ -गृहस्थाला हें शौच (शुद्धि) सांगितले, ब्रह्मचार्यास याच्या दुप्पट, वानप्रस्थांस तिप्पट व संन्याशांस चौपट सांगितले. मनूच्या वचनांत गृहस्थ असें जें म्हटलें आहे तें स्नातकाचें उपलक्षण होय, असें जर न मानिले तर विधुरादिकास प्रायश्चित्तच होणार नाही. ब्रह्मनिदर्शन म्हणजे तत्वज्ञान. ज्ञानाची उत्पत्ति झाल्यानंतर उत्पन्न होणारें पाप ज्ञानानेंच नाहींसे होते. कारण, ‘हे अर्जुना ! ज्ञान हाच अग्नि तो सर्व शुभाशुभ कर्मास जाळून टाकतो’ असें भगवद्गीतेंत सांगितलें आहे.
Last Updated : January 17, 2018
TOP