‘‘यत्तु शूलपाणिः’’ आचार्यस्तु पिता ज्येष्ठो भ्राता चैव महीपतिः। मातुलः श्र्वशुरस्राता मातामहपितामहौ।
वर्णश्रेष्ठः पितृव्यश्र्च पुंस्येते गुरवो मता इति ‘‘देवलोक्तेः’’ आचार्यः श्रेष्ठोगुरूणामिति गौतमोक्तेः त्रयः पुरुषस्य गुरवो भवंति माता पिता आचार्यश्र्चेति विष्णूक्तेश्र्चाचार्यादिपत्नीगमनमपि महापातमित्याह। तन्न।
आचारपत्नीं स्वसुतां गच्छंस्तु गुरुतल्पग इत्याचार्यादिपत्नीषु गुरुतल्पातिदेशविरोधात् न चातिशोहीनवर्णपत्नीपरोमानाभावात् देवलादिवचांसि त्वाचार्यादानां पूज्यत्वपराणि कथं च गुरोश्र्चालीकनिर्बंध इत्यत्र गुरुपदं केवल पितृपरमत्र त्वाचार्यादिपरमिति विरूद्धं शूलपाणे र्वचः श्रद्धेयं
आचार्य, बाप, वडील, भाऊ, राजा वगैरेंच्या स्त्रियांशीं गमन करणें हें अतिपातक होय असें जें शूलपाणीचें मत आहे, त्याचें खंडन.
‘‘जें तर शूलपाणि’’ ‘‘आचार्य, बाप, वडील, भाऊ, राजा, मामा, सासरा, रक्षण करणारा, आईचा बाप, बापाचा बाप, वर्णांत श्रेष्ठ, व चुलता हे गुरु मानले आहेत, असे देवलाचें वचन, आणि ‘‘आचार्य हा गुरूं मध्यें श्रेष्ठ (आहे)’’ असें गौतमाचें वचन तसेंच ‘‘माता, बाप, व आचार्य हे पुरुषाचें तीन गुरु होत’’ असें विष्णूचें वचन यांवरून आचार्य वगैरेंच्या स्त्रियांशीं गमन करणें तेंही महापातक होय असें म्हणतो तें बराबर नाहीं. कारण, ‘‘आचार्याची स्त्री व आपली मुलगी यांशीं गमन करणारा गुरुतल्पंग होतो.’’ यावरून आचार्य वगैरेंच्या स्त्रियांविषयीं गुरुतल्पाच्या अतिदेशाशीं विरोध येतो. अतिदेश हीनवर्णाच्या स्त्रीपर नाहीं. कारण तसें प्रमाण आढळत नाहीं. देवलादिकांची वचनें तर आचार्यादिकांच्या पूज्यत्वाविषयीं आहेत आणि ‘‘गुरोश्र्चालीकानिर्बंध’’ या वाक्यांत गुरुपद हें केवळ पितृपर आहे. येथे तर आचार्यादिपर (आहे). याप्रमाणें विरूद्ध अशा शूलपाणीचे वचनावर कशी श्रद्धा ठेवावी?