प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘निमित्तिदोषमपवदति विष्णुः’’ उद्दिश्य कुपितो विप्रस्तोषितः श्रावयेत्पुनः।
तस्मिन्मृते न दोषोऽस्ति द्वयोरुच्छ्रावणे कृते।
तोषितो निमित्तिना द्वयोरुच्छावणे कृते न दोष इति संबंधः द्वयोरित्यनेकोपलक्षणं।
‘‘मदनस्तु’’ यस्य कस्याचिदुच्छ्रावणे कृते द्वयोराक्रोशकात्म घातयो र्दोषो नास्तीत्याह।
‘‘विष्णुः’’ असंबंधेन यः कश्चिद्द्विजः प्राणान्समुत्सृजेत्। तस्यैव तद्भवेत्पापं न तु यं परिकीर्तयेत्
‘‘बृहस्पतिः’’ आक्रुष्टस्तु यदाक्रोशंस्ताडितः प्रतिताडयन्।
हत्वाततायिनं चैव नाततायी भवेन्नरः ‘‘याज्ञावल्क्यः’’ गृच्छ्रत्रयं गुरुः कुर्यान्म्रियते प्रहितो यदीति
गुरु इत्यादिकांस प्रायश्चित्त.
‘‘विष्णु निमित्तीच्या दोषाचा अपवाद सांगतो-’’ एखाद्या मनुष्यास उद्देशून रागावलेल्या ब्राह्मणास ज्याच्या योगानें तो रागावला असेल त्याने खुष करून पुन्हा त्याला त्याचा दोष ऐकवावा. त्यानंतर जर कदाचित् तो मेला तर ज्याच्या योगानें तो मेला असेल त्यानें दोघांस त्याचा (मरणाराचा) घडलेला दोष ऐकवावा म्हणजे त्यास दोष घडत नाही. दोघांस असें जें म्हटलें तें अनेकांचे उपलक्षण आहे. ‘‘मदनतर’’-कोणत्याही एखाद्या मनुष्याचा दोष उघड ऐकविण्यांत आला असतां दोघांचे भांडण होऊन त्यापासून जर अपघात झाला तर दोष नाहीं असे म्हणतो. ‘‘विष्णु’’ -संबंधा वाचून जो कोणी ब्राह्मण आपला जीव देईल त्यालाच ते पाप घडेल त्यानें (मरणारानें) ज्याचें नांव सांगितले असेल त्यास पातक नाहीं. ‘‘बृहस्पति’’---मनुष्यानें शिवीगाळी करणार्याशी शिवीगाळी केली असतां, मारणार्यास उलट मारलें असतां, तसेंच आततायीस मारलें असतां तो आततायी होत नाही. ‘‘याज्ञवल्क्य’’--- जर गुरूनें चोर वाघ इत्यादिकांनी व्यापिलेल्या प्रदेशांत अंधारांत मध्यरात्रीं काही कामाकरितां शिष्यास पाठविलें असतां तो दैवयोगानें मेला तर गुरूनें प्राजापत्यादि तीन कृच्छें करावी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP