प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२७ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘ब्राह्मे’’ मत्तोन्मत्तातुराणां च मुमूर्षोर्वा कदाचन। तथा तद्गृहे नान्नश्र्नीयात्प्रवसत्यग्रिहोत्रिणि।
एतेषां तु गृहे भुक्त्वा द्विजश्र्चांद्रायणं चरेदिति
दांडगा, उन्मत्त वगैरेंच्या घरीं अन्न खाऊं नये. खाल्लें तर प्रायश्चित्त.
‘‘अत्र्यापस्तंबौ’’ म्लेंच्छादीनां पयःपीत्वा पुष्करिण्यां र्हदेऽपि वा। जानुध्नं शुचि ज्ञेयमधस्तादशुचि स्मृतं।
तत्तोयं यः पिबेद्विप्रः कामतोऽकामतोऽपि वा। अकामान्नक्तभोजी स्यादहोरात्रं तु कामत इति तज्जानुदघ्नोनं।
अत एव ‘‘शातातपः’’ अंत्यैरपि कृते कूपे सेतौ वाप्यादिकेपि वा। तत्र स्नात्वा च पीत्वा च प्रायश्चित्तं न विद्यते
म्लेंच्छांनीं केलेल्या हौदांतील पाणी प्यालें असतां प्रायश्चित्त. गुडघ्यापेक्षां अधिक पाण्यास दोष नाही.
‘‘अत्रि व आपस्तंब’’---‘‘म्लेंच्छादिकांच्या पुष्करिणींतील किंवा डोहांतील पाणी प्यालें असतां तें गुडघ्या पावेंतों शुद्ध होय. गुडघ्या खालीं अशुद्ध होय. तें पाणी जो ब्राह्मण ज्ञानानें व अज्ञानानें पिईल, त्यानें अज्ञानानें पाणी प्यालें असलें तर रात्रीं भोजन करावें. ज्ञानानें प्यालें असलें तर एक दिवस उपोषण करावे.’’ असें म्हणतात तें गुडघ्याहून कमी असलेल्या उदकाविषयीं जाणावे. म्हणूनच ‘‘शातातप’’----जर अंत्यजांनीं केलेला कुवा, पूल किंवा विहीर वगैरेंत स्नान व पान कलें तर प्रायश्चित्त नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP