प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘व्याघ्रः’’ गां चेध्दन्यान्नरः कामात्पणसप्तशतं तथा। श्रोत्रियाय दरिद्राय दद्याच्छुध्यर्थमात्मन इति।
यस्तु शंखः’’ पादं तु शूद्रहत्यायामुदक्यागमने तथा। गोवधे च तथा कुर्यादगम्यागमने तथेति तच्छ्रोत्रियकुटुंबिविप्रस्वामिककपिलगर्भांगभूतगोवधपरं। अत एव बृहस्पतिः’’ गर्भिणीं कपिलां दोग्ध्रीं होमधेनुं च सुव्रतां।
खड्गादिना घातयित्वा द्विगुणं व्रतमाचरेदिति। ‘‘विशिष्टायां गवि प्रायश्चित्ताविशेषमाह।
अत एव प्रचेतसा’’ स्त्रीगर्भिणीगोगर्भिणबालवृद्धवधेषु भ्रूणहा भवतीति ब्रह्महत्त्याव्रतमतिदिष्टं।
अस्मिन्नेव विषये यमः’’ गोसहस्त्रं शतं वापि दद्यात्सुचरितव्रतः। अविद्यमाने सर्वस्वं वेदविभ्द्योनिवेदयेदिति
ब्राह्मणाच्या गर्भिणी अशा कपिला गाईच्या वधाचें प्रायश्चित्त.
‘‘व्याघ्र’’--- जर एखादा मनुष्य बुद्धिपूर्वक गाईस मारील, तर त्यानें आपली शुद्धि होण्याकरितां दरिद्री अशा वेद शिकलेल्या ब्राह्मणास सातशे पण (पैसे) द्यावे. जें तर शंख’’ ‘‘शुद्राची हत्त्या, विटाळशीशीं गमन, गाईचा वध व गमन करण्यास अयोग्य अशा स्त्रीशीं गमन करणें यांचे ठायीं चतुर्थांश (ब्रह्महत्त्येच्या पातकाचा) प्रायश्चित्त करावे’’ असें म्हणतो तें वेद शिकलेल्या कुटुंबवत्सल अशा ब्राह्मणाची जिच्यावर सत्ता आहे अशा कर्मास अंगभूत असलेल्या कपिला गाईच्या वधाविषयीं जाणावे. म्हणूनच ‘‘बृहस्पति’’ दुध देणारी, होमास साधनभूत असणारी, व गर्भिणी अशा कपिला गाईचा तरवार इत्यादिकानें वध केला असतां दुप्पट प्रायश्चित्त करावे. याप्रमाणें विशेष गाईच्या ठिकाणीं विशेष प्रायश्चित्त सांगतो. ‘‘प्रचेतसानें’’ गर्भिणी स्त्री, गर्भिणी गाय, बालक व वृद्ध यांचा वध केला असतां वध करणारा भूणहा होतो, म्हणून ब्रह्महत्त्येचे प्रायश्चित्त सांगितले. याचविषयी ‘‘यम’’---चांगल्या रीतीनें ज्यानें प्रायश्चित्त केलें आहे, त्यानें हजार किंवा शंभर गाई द्याव्या व आपल्या हयातीनंतर वेद शिकलेल्या ब्राह्मणांस आपली सर्व मालमत्ता द्यावी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP