प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६८ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘संवर्तः’’ व्यापत्रानां बहूनां तु रोधने बंधनेऽपि वा। भिषङ्मिथ्योपचारे च द्विगुणं गोव्रतं चरेदिति।
‘‘व्यासः’’ औषधं लवणं चैव पुण्यार्थमपि भोजनं। अतिरिक्तं न दातव्यं काले स्वल्पं तु दापयेत्।
अतिरिक्ते विपत्तिश्र्चेत्कृच्छ्रपादोविधियत इति। अपवादमाह ‘‘स एव’’ औषधे तु न दोषोऽस्ति स्वेच्छया तु पिबेद्यदि।
अन्यथा दियमाने तु प्रायश्चित्तं न संशय इति एतत्वनभिज्ञस्य अभिज्ञस्य तु न दोषः।
यथाह ‘‘संवर्तः’’ यंत्रणे गोचिकित्सार्थे गूढगर्भविमोचने।
यत्ने कृते विपत्तिः स्यान्न स पापेन लिप्यते यंत्रणं व्याध्यादिनिर्यातनार्थं संदंशादिवेशनं। ‘‘तथा’’ दाहछेदशिरछेदभेदनैरुंपकुर्वतां।
द्विजानां गोहितार्थं तु प्रायश्चित्तं न विद्यत इति। ‘‘पराशरोऽपि’’ ग्रामघाते शरौघेण वेश्मभंगतिपातने।
अतिवृष्टिहतानां च प्रायश्चित्तं न विद्यत इति। ‘‘तथा’’ कूपखाते च धर्मार्थे गृहदाहे च या मृताः।
ग्रामदाहे तथा घोरे प्रायश्चित्तं न विद्यत इति एतच्च बंधनादिराहितस्यैव कथंचिद्दहनादिविषयम्
गाई प्रतिबंधादिकानें मेल्या असतां, तसेंच औषधादि उपचार वगैरेच्या योगानें मेल्या असतां प्रायश्चित्ताचा विचार.
‘‘संवर्त’’---पुष्कळ गाई प्रतिबंध किंवा बांधणें याच्या योगानें मेल्या असतां तसेंच वैद्याकडून विरूद्ध उपचार झाला असतां (विरूद्ध उपचार होऊन गाई मेल्या असतां) दुप्पट गाईचें व्रत करावे. ‘‘व्यास’’---औषध, मीठ व धर्मार्थ जेऊं घालणें ही जास्त देऊं नयेत, योग्य काळीं थोडी द्यावी. जर जास्त देऊन नुकसान झालें तर कृच्छ्राचा चतुर्थांश प्रायश्चित्त करावें. ‘‘तोच अपवाद सांगतो’’---औषध देण्यास कांही हरकत नाहीं, परंतु ते दिल्यापासून जर नुकसान झाले तर दोष आहे’’ हें (वचन) ज्याला समजत नाहीं त्याच्या संबंधानें आहे. ज्याला ज्ञान आहे त्याला दोष नाही. ‘‘संवर्त असेंच म्हणतो’’---जर गाईची विकित्सा करण्याकरितां रोग वगैरेंस बाहेर काढण्याकरितां शरीरांत शस्त्रादिकांचा प्रवेश केला असतां किंवा अडलेला गर्भ काढण्याकरितां यत्न केला असतां ती (गाय) जर मेली तर त्याला दोष घडत नाहीं. ‘‘तसेंच’’---डाग देणें, कापणें, शीर कापणें व निराळी करणें यांच्या योगानें गाईस बरे करण्याच्या हेतूनें इलाज करण्यास द्विजांस प्रायश्रित्त नाहीं. ‘‘पराशर’’---बाणांच्या समुदायानें गांवाचा नाश झाला असतां, घर मोडलें किंवा पउलें असतां, व फार पाऊस पडला असतां जर गाई मेल्या तर प्रायश्चित्त नाही. ‘‘तसेंच’’ धर्मार्थ खोदलेल्या कुव्यांत, घर जळलें असतां त्यांत व भयंकर अशी गांवास आग लागली असतां तीत ज्या गाई मरतील त्यांचें प्रायश्चित्त नाही. हें (वचन) बंधन इत्यादिकांनीं रहित असलेल्या गाईचें कोणत्याही रीतीनें दहनादि झालें असतां त्याविषयीं जाणावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP