प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४३ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथ वाग्दुष्टभावदुष्टाशने ब्रह्मपुराणे’’ भक्ष्यं त्व भक्ष्यवाक्येन योदद्याद्रोषधर्मतः।
गुरोपरि न भोक्तव्यं वाग्दुष्टं तन्महाघकृदिति। यत्र वर्णाकारादिना भक्ष्यबुद्धिर्विषादिशंका वा जाता तद्भावदुष्टं।
‘‘तत्राकामतः सकृद्भक्षणे भावदुष्टादि प्रक्रम्य गौतमः’’ छर्दनं घृतप्राशनं चेति।
‘‘कामतस्तु शंखः’’ वाग्दुष्टं भावदुष्टं च भाजने भावदूषिते। भुक्त्वान्नं ब्राह्मणः पश्र्चात्त्रिरात्रं तु व्रती भवेदिति।
‘‘हारीतः’’ शंकितं प्रतिशांकितान्नं विद्विष्टान्नमथापि च। यदि भुंजीत विप्रोयः प्रायश्चित्तं कथं भवेत्।
एकरात्रोपवासश्र्च गायत्र्यष्टशतं जपेत्। प्राशयेत्पंचभिर्मत्रैः पंचगव्यं पृथक् पृथगिति
इति सुरापानप्रसक्तानुप्रसक्त प्रायश्चित्तम्.
वाग्दुष्ट व भावदुष्ट यांची व्याख्या. त्यांची प्रायश्चित्ते.
‘‘वाग्दुष्ट व भावदुष्ट अशांच्या भक्षणाविषयीं ब्रह्मपुराणांत’’ जो क्रोधानें खाण्यास योग्य अशा अन्नास खाण्यास अयोग्य अशा पदार्थाच्या नांवानें वाढील, तर तें वाग्दुष्ट होय. तें मोठें पातक करणारें आहे म्हणून वडील माणसानें जरीं वाढलें असलें तरी खाऊं नये. ज्याविषयी रंग आकार इत्यादिकांच्या योगानें खाण्यास अयोग्य अशी बुद्धि झाली किंवा विषादिकाची शंका आली तें भावदुष्ट होय. त्यांत अज्ञानानें एक वेळां भक्षण घडलें असतां भावदुष्टादिकापासून आरंभ करून ‘‘गौतम’’---उलटी करावी व तूप प्यावें (हें प्रायश्चित्त करावें). ‘‘ज्ञानपूर्वकाविषयीं तर शंख’’---जो ब्राह्मण भावानें दूषित झालेल्या पात्रांत वाग्दुष्ट व भावदुष्ट असें अन्न खाईल, त्यानें नंतर तीन दिवसपर्यंत व्रत करावें. ‘‘हारीत’’---जो कोणी ब्राह्मण शंकित, प्रतिशंकित व विद्विष्ट असें अन्न खाईल त्याला प्रायश्चित्त कसें असावें? त्यानें एक दिवस उपास करून गायत्रीमंत्राचा एकशें आठ वेळां जप करावा, आणि पात्र मंत्रांनीं निरनिराळें पंचगव्य प्राशन करावें.
याप्रमाणें सुरापानाशीं संबंध असलेलें व संबंध नसलेलें अशांचें प्रायश्चित्त (सांगितलें).
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP