प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ६ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
वदंति केचिद्विद्वांसः स्त्रीणां शूद्रसमानतामिति सूत संहिताद्युक्तेः।
शूद्राणां तु सधर्माणः सर्वेऽपध्वंसजाः स्मृता इति स्मृतेश्र्च।
स्त्रीणां व्यभिचारजानां चाधिकारः समानः अत एव प्रायश्चित्तमपि शूद्रवदेव
स्त्रिया व व्यभिचारापासून झालेले (गोळक वगैरे) यांच्या प्रायश्चित्ताचा निर्णय.
‘कित्येक विद्वान स्त्रिया या शूद्रा प्रमाणें आहेत असें म्हणतात, असें सूतसंहिता इत्यादिकांत सांगितलें त्यावरून आणि ‘व्यभिचारापासून झालेले (गोळक वगैरे) सर्व हे शूद्रा प्रमाणें ज्यांचा धर्म आहे असे सांगितले आहेत, अशी स्मृति आहे’ त्यावरून स्त्रिया व व्यभिचारापासून झालेले (संकर-गोळक इ.) यांचा अधिकार समान आहे म्हणूनच त्यांस प्रायश्चित्त देखील शूद्रा प्रमाणेंच आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP