प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त २ रे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘एवं प्रायश्चित्तपदस्य रूढत्वे योगमप्याहांगिराः’’ प्रायोनाम
तपः प्रोक्तं चित्तं निश्र्चय उच्यते। तपोनिश्र्चयसंयुक्तं प्रायश्चित्तमिति
स्मृतमिति यत्तु पक्षधरमिश्रभक्तयुपाध्यायतोडरा
नंदकृतः प्रायः पापं विजानीयाच्चित्तं तस्य विशोधनमिति
पेठुस्तत्राकरश्चिंत्यः
प्रायश्चित्त हें पद रूढ असून यौगिक आहे.
अशा रीतीनें हा प्रायश्चित्त शब्द र्रूढ असून यौगिकही आहे जसें ‘‘अंगिरस्’’ म्हणतो-प्रायः म्हणजे तप आणि चित्त म्हणजे निश्र्चय असें म्हटलें आहे. म्हणून तप व निश्र्चय यांनी युक्त जें कर्म ते प्रायश्चित्त असें म्हटले आहे. जें तर ‘‘पक्षधर मिश्र, भक्त्युपाध्याय व तोडरानंदकर्ते हे ‘प्रायः पापं विजानीयाच्चित्तं तस्य विशोधनं’ असा पूर्वीच्या स्मृतीच्या (अंगिरसाच्या) पूवार्धाचा पाठभेद मानतात तें निर्मूल आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP