प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १४० वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अथकालदुष्टाशने ब्रह्मपुराणे’’ सूतके मृतके चापि ग्रास्तयोश्र्चंद्रसूर्ययोः। छायायां कुंजरस्याथ भुक्त्वा तु नरकं व्रजेत्।
भुक्त्वा प्रमादाद्विप्रस्तु सम्यक् चांद्रायणं चरेत्। ‘‘षट्त्रिशन्मते’’ चंद्रसूर्यग्रहे भुक्त्वा प्राजापत्येन शुध्यतीति तदकामतः।
‘‘बृहन्नारदीये’’ अर्कद्विपर्वरात्रौ च चतुर्दश्यष्टमीदिवा। एकादश्यामहोरात्रं भुक्त्वा चांद्रायणं चरेत्।
ग्रहणसन्निहितनिषिद्धकाले अज्ञानतो भोजने तु चंद्रसूर्यग्रहं त्रकृत्य ‘‘षट्त्रिंशन्मते’’ तस्मिन्नेव दिने भुक्त्वा त्रिरात्रेणैव शुध्यतीति
वृद्धि, सुतक, चंद्र व सूर्य यांची ग्रहणें व कुंजरच्छाया यांत जो भोजन करील त्यास प्रायश्चित्त. वेधांत भोजन केलें तर प्रायाश्चित्त.
‘‘कालानें दुष्ट होणार्या भक्षणाविषयीं ब्रह्मपुराणांत’’ सूतक (वृद्धि) मृतक, चंद्र व सूर्य हे ग्रस्त असतां व गजच्छायापर्व यांच्या ठिकाणी जो भोजन करील तो नरकाला जाईल. जो ब्राह्मण अज्ञानानें सदर दिवशीं भोजन करील त्यानें उत्तम रीतीनें चांद्रायण करावें. ‘‘षट्त्रिंशन्मतांत’’ चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणांत भोजन केलें असतां प्राजापत्यानें शुद्धि होईल हें (प्रायश्चित्त) अज्ञानाविषयीं जाणावें. ‘‘बृहन्नारदीयांत’’ रविवार, पौर्णिमा व अमावास्या यांच्या दिवशीं रात्रीं चतुर्दशी व अष्टमी यांच्या दिवशीं दिवसां व एकादशीचे दिवशीं अहोरात्र (सार्या दिवसांत) जो भोजन करील, त्यानें चांद्रायण करावें. ग्रहणा जवळच्या निषिद्ध अशा काळीं वेधांत अज्ञानानें भोजन केलें असतां चंद्र व सूर्य यांच्या ग्रहणांचा प्रक्रम करून ‘‘षट्त्रिंशन्मतांत’’ त्याच दिवशी भोजन केल्यानें तीन दिवसांनीं शुद्धि होईल असें सांगितलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP