प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७१ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘स्वामिनोगोरुपेक्षणे प्रायश्चित्तमाह व्यासः’’ जलौघपल्वले मग्ना मेद्याविद्युद्धतापि वा। श्र्वभ्रे वा पतिताकस्माच्छ्वापदेनापि भक्षिता।
प्राजापत्यं चरेत्कृच्छ्रं गोस्वामी व्रतमुत्तमं। शीतवातहता वा स्यादुद्बंधनमृतापि वा। शून्यागार उपेक्षायां प्राजापत्यं विनिर्दिशेदिति।
स्वामीति पालकस्याप्युपलक्षणं। सत्कार्यांतरवैय्यग्रादुपेक्षायां त्वर्धं। ‘‘अत एव विष्णुः’’ पल्वलौघमृगव्याघ्रश्र्वापदादिनिपातने।
श्र्वभ्रप्रपातसर्पाद्यैर्मृते कृच्छ्रार्धमाचरेदिति। ‘‘अत एव’’ अपालनात्तुकृच्छ्रः स्याच्छून्यागार उपप्लवइत्यनेनैवोपेक्षायां प्राजापत्य उक्तः
गाईची काळजी न घेतल्यामुळें ती तळें इत्यादिकांत पडून मेली असतां मालकांस प्रायश्चित्त.
‘‘व्यास गाईची उपेक्षा केली असतां गाईच्या मालकास प्रायश्चित्त सांगतो’’ तळें व डबकें यांत गाय बुडाली असतां किंवा मेघ व वीज यांच्या योगानें मेली असतां, किंवा अकस्मात् खाड्यांत पडली असतां किंवा श्र्वापदानें खाल्ली असतां गाईच्या मालकानें उत्तम रीतीनें प्राजापत्य प्रायश्चित्त करावें. तसेंच थंडी व वारा यांच्या योगानें मेली किंवा उलटी टांगून मेली किंवा ज्यांत मनुष्यें रहात नाहींत अशा जागेंत उपेक्षा केल्यामुळें मेली तर प्राजापत्य प्रायश्चित्त सांगावें. स्वामीं हें पालकाचेंही उपलक्षण आहे म्हणून त्यानेंही पूर्वी सांगितल्याप्रमाणें प्रायश्चित्त करावें. चांगल्या कृत्त्यांत व्यग्र झाल्यामुळें उपेक्षा केली असतां अर्धें प्रायश्चित्त. ‘‘म्हणूनच विष्णु सांगतो’’ डबकें, पाण्याचा प्रवाह, वाघ, श्र्वापद वगैरेंच्या योगानें गाय मेली असतां किंवा खड्यांत पडणें, सर्प वगैरे यांच्या योगानें मेली तर अर्ध प्रायश्चित्त करावें. म्हणूनच ज्यांत मनुष्यांची वस्ती नाहीं अशा घरांत गाईच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळें किंवा तिला उपद्रव झाला इत्यादि कारणांच्या योगानें तिची उपेक्षा केली असतां प्राजापत्य प्रायश्चित्त सांगितलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP