प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७३ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘स एव’’ प्रेरयेत्कूपवापीषु वृक्षछेदेषु पातयेत्। गवाशनेषु विक्रेता ततः प्राप्नोति किल्बिषमिति कूपवाप्यादिनिम्नेषु पानार्थं वृक्षछेदनादिदुर्गमेषु भक्षणार्थं प्रेरणे गोमांसाशनहस्ते गोविक्रये च गोवधपापमित्यर्थः।
‘‘स एव’’ गोवृषाणां विपत्तौ च यावंतः प्रेक्षका जनाः। अनिवारयतां तेषां सर्वेषां पातकं भवेत्।
संभावितगोपतनदेशे स्वोपभोगार्थं कूपादिखनने दोषमाह ‘‘स एव’’ वेश्मद्वारनिवासेषु योनरः खातु मिच्छति।
स्वकार्यगृहखातेषु प्रायश्चित्तं विनिर्दिशेत्। स्वकार्यपदाध्दर्मार्थें न दोषः। ‘‘तथा स एव’’ कूपखाते तटाखाते दीर्घखाते तथैव च।
अन्येषु धर्मखातेषु प्रायश्चित्तं न विद्यत इति दीर्घखातं वाप्यादि
कुवा विहीर इत्यादि अडचणीच्या ठिकाणींच्या जागेत गाईस नेली असतां प्रायश्चित्त. स्वतां खोदलेल्या व धर्मार्थ खोदलेला कुवा इत्यादिकाविषयीं प्रायश्चित्ताचा विचार.
‘‘तोच’’---कुवा, विहीर, इत्यादि खोल जागेंत पाणी पाजण्याकरितां गाईस घेऊन जाईल, झाडें तुटून पडलेल्या अशा खचरट भागांत चारण्याकरितां गाईस घेऊन जाईल व गाईचें मांस भक्षण करणार्यास गाय विकील तर त्याला गाईच्या वधाचें पाप पडेल. ‘‘तोच’’---गाई व बैल यांजवर कठीण प्रसंग गुदरला असतां पहाणारे (लोक) जर त्याचें निवारण करणार नाहींत तर त्या सर्वांस पातक लागेल ‘‘गाईचा पडण्याचा (स्वाभाविक) संभव असणार्या जागेंत आपल्या स्वतांचे उपयोगाकरितां कुवा वगैरे खणला असतां त्याविषयी तोच दोष सांगतो’’---जो घर, दार व निवास यांच्या ठिकाणीं खाडा (कुवा इत्यादि) करण्याची इच्छा करील, तसेंच आपल्या कामासाठी घरांत खाडे करील तर त्यास प्रायश्चित्त सांगावे. जर धर्मार्थ कुवा करील तर दोष नाही. ‘‘तसें तोच’’---कुव्याचा खाडा, तटाचा खाडा (खंदक), विहीर वगैरे व दुसरे धर्मार्थ खोदलेले खाडे यांच्या ठिकाणीं प्रायश्चित्त नाही.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP