प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ८८ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘आत्मघातिप्रेतक्रियायां तु वसिष्ठः’’ य आत्मघातिनः कुर्यात्स्नेहात्प्रेतक्रियां द्विजः। स तप्तकृच्छ्रसहितं चरेच्चांद्रायणं व्रतं।
‘‘उशनाः’’ प्रायोनाशकशस्त्राग्निविषोद्बंधतृणोदकैः। काष्ठाद्यैश्र्चात्मनोहंतुर्नृपब्रह्मसरीसृपैः। शृंगिदंष्ट्रिश्र्वचांडालविद्युताभिहतस्य च।
तथा संकरजातस्य नाशौचोदकवन्हयः। तत्स्पर्शे यदिवाक्रोशे दिनमेकमभोजनं। अज्ञानाद्दहनादौ तु कृच्छ्रः सांतपनः स्मृतः।
बृद्धिपूर्वे पुनस्तस्य कृच्छ्रो गोमूत्रयावकः। तप्तकृच्छ्रोऽपि वाशक्तौ मासभिक्षाशनोऽपि वा। कृतवा च वहनादीनि प्रायश्चित्तमकुर्वतां।
तप्तकृच्छ्रद्वयाच्छुद्धिरेक एवानुयायिनां। आत्मघातनिमित्तं प्रायश्चित्तमकुर्वतामात्मघातिपुत्रादीनामित्यर्थः ‘‘च्यवनः’’ आत्मघातकस्पर्शनवहनदहने तप्तकृच्छ्रं चरेद्विंशतिगावो दक्षिणा ब्राह्मणेष्विति
आत्मघात करणाराचा उत्तरक्रिया करणारास व प्रेताबरोबर जाणारास प्रायश्चित्त.
‘‘आत्मघात करणाराच्या प्रेताच्या उत्तरक्रिये विषयी वसिष्ठ’’---जो द्विजस्नेहानें आत्मघात करणाराच्या प्रेताची उत्तरक्रिया करील, त्यानें तप्तकृच्छ्रा सहित चांद्रायण प्रायश्चित्त करावे. ‘‘उशनस्’’---महाप्रस्थान, उपास, शस्त्र, अग्नि, विष, टांगून घेणें, घास, पाणी व लाकूड इत्यादिकांच्या योगानें आत्मघात करणारा, तसेंच राजा, ब्राम्हण, सर्प शिंगांचें प्राणी, दाढांचे प्राणी, कुत्रें, चांडाळ व बीज यांच्या योगानें मेलेला, आणि संकरा पासून उत्पन्न झालेला यांस सूतक, उदक व अग्नि हे नाहींत. त्यांचा स्पर्श झाला किंवा त्यांस उद्देशून रडलें असतां एक दिवस उपास करावा. जर न जाणतां त्याचें दहनादि केलें तर सांतपन कृच्छ्र प्रायश्चित्त करावें. जर बुद्धिपूर्वक दहनादि केलें तर गोमूत्र यावककृच्छ्र व तप्तकृच्छ्र करावें. हें (प्रायश्चित्त) करण्यास शक्ति नसेल तर एक महिना पर्यंत भिक्षा मागून तिचेवर उदर निर्वाह करावा. आत्मघाताच्या संबंधाचे प्रायश्चित्त न करणार्या पुत्रादिकांनी श्वास खांद घालणें वगैरे केले तर त्यांची दोन तप्तकृच्छ्रांच्या योगानें शुद्धि होईल. प्रेताबरोबर जाणारांची एका तप्तकृच्छ्रानें शुद्धि होईल. ‘‘च्यवन’’---आत्म घात करणाराचा स्पर्श, वहन व दहन यांविषयी तप्तकृच्छ्र प्रायश्चित्त करावें, आणि ब्राह्मणांस वीस गाई दक्षिणा द्यावी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP