प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ५२ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘आत्रेयीमाह वसिष्ठः’’ रजस्वलाकृतुस्नातामात्रेयीमाहुस्त्रयोदश दिनानि।
अत्र ह्येष्यदपत्यं भवतीति रजस्वला त्रिदिनं तदूर्ध्वं त्रयोदशेति षोडश अत्रहेष्यदितिहेतुना वंध्याव्युदासः ‘‘यमस्तु’’ जन्मप्रभृति संस्कारैः संस्कृतामंत्र वच्च या। गर्भिणी त्वथया या स्यात्तामात्रेयीं विदुर्बुधा इति। ‘‘विष्णुः’’ एतन्महाव्रतं ब्राह्मणं हत्वा द्वादश वत्सरं कुर्यात्। यागस्थं क्षत्रियं वैश्यं गर्भिणी रजस्वलां चात्रिगोत्रां चेति। ‘‘यत्वंगिराः’’ आहिताग्नेर्द्विजातेस्तु हत्वा पत्नीमनिंदितां।
ब्रह्महत्त्याव्रतं कुर्यादात्रेयीघ्नस्तथैव चेति तद्यागस्थपत्नीपरं।
सवनास्थां स्त्रियं हत्वा चरेद्ब्रह्महणि व्रतमिति ‘‘पराशराक्तेः’’ ब्रह्मवधव्रतं प्रक्रम्य ‘‘मनुः’’ उक्त्वा चैवानृतं साक्ष्ये प्रतिरभ्य गुरुं तथा।
अपहृत्य च निक्षेपं कृत्वा च स्त्रीसुहृद्वधमिति विप्रवधफलिकैव साक्ष्यनृतोक्तिः स्त्री सवनस्था
आत्रेयीचे लक्षण. यज्ञांत असलेल्या स्त्रीचें प्रायश्चित्त. खोटी साक्ष देणारा वगैरेस प्रायश्चित्त.
‘‘वसिष्ठ आत्रेयी (चे लक्षण) सांगतो’’---ॠतु प्राप्त झालेली स्त्री तीन दिवस पर्यंत रजस्वला होय. तेरा दिवस पर्यंत आत्रेयी होय. यांत तिला पुढें होणारों अपत्य असतें (या तेरा दिवसांत गर्भ रहाण्याचा संभव असतो), म्हणून जी वंध्या आहे तिला आत्रेयी म्हणूं नये. ‘‘यम’’---जन्मापासून (जातकर्मापासून) वेदोक्त संस्कारांनीं जिसे संस्कार केलेले आहेत ती, किंवा गर्भवती स्त्री यांस पंडित आत्रेयी म्हणतात. ‘‘विष्णु’’---जो ब्राह्मणाचा वध करील, तसेंच सोमांत असलेला क्षत्रिय व वैश्य यांचा वध करील, गर्भिणी, रजस्वला व आत्रेयी यांचा वध करील, त्यानें हे द्वादशाद्ब प्रायश्चित्त करावे. ‘‘जे तर आंगिरस्’’ ‘‘जो अग्निहोत्र्याच्या चांगल्या वर्तणुकीच्या स्त्रीचा वध करील, तसेंच आत्रेयीचा वध करील, त्यानें ब्रह्महत्येंत सांगितलेले प्रायश्चित्त करावे.’’ असें म्हणतो ते सोमांत असलेल्या स्त्री विषयी जाणावे. कारण, ‘‘सोमयज्ञांत असलेल्या स्त्रीचा वध केला असतां ब्रह्महत्येंत सांगितलेलें व्रत करावे.’’ असें ‘‘पराशराचें’’ म्हणणें आहे. ‘‘ब्राह्मणाच्या वधाच्या प्रकरणास आरंभ करून मनु’’---जो खोटी साक्ष देईल, गुरुचा अपमान करील, दुसर्याची ठेवलेली ठेव लांबवील, यज्ञांत असलेली स्त्री व मित्र यांचा वध करील त्यानें ब्रह्महत्त्येचे प्रायश्चित्त करावे.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP