‘‘स एव’’ मूर्छितः पतितोवापि दंडेनाभिहतः स तु। उत्थितस्तु यदा गच्छेत्पंच सप्त दशैव वा।
ग्रासं वा यदि गृण्हीयात्तोयं वापि पिबेद्यदि।
पूर्वं व्याघ्युपसृष्टश्र्चेत्प्रायश्चित्तं न विद्यत इति ‘‘पराशरः’’ रोधबंधनयोत्क्राणि घातश्र्चेति चतुर्विधमिति ‘‘स एव’’ गोवाटे वा गृहेवापि दुर्गेप्यथ समस्थले। नदीष्वथ समुद्रेषु अन्येषु च नदीमुखे। दग्धदेशे मृता गावस्तंभनाद्रोधउच्यते।
योक्त्रदामकदोरैश्र्च कंठाभरणभूषणैः। गृहे वापि वने वापि बद्धः स्याद्गौर्मृतोयदि। तदेव बंधनें विद्यात्कामाकामकृतं च यत्।
हले वा शकटे पंक्तौ पृष्ठे वा पीडितोनरैः। गोपतिर्मृत्युमाप्नोति योत्क्रोभवति तद्वधः। मत्तः प्रमत्त उन्मत्तश्र्चेतनोवाप्यचेतनः।
कामाकामकृतक्रोधोदंडैर्हन्यादथोपलैः। प्राहतो वा मृतो वापि तद्धिहेतुर्निपातनमिति ‘‘आपस्तंबः’’ दमने दामने चैव रोधे संघातयोजने।
बध्वा शृंखलपाशैश्र्च मृते पादोनमाचरेत् दामनं मेढीबंधनं
रोगानें पीडलेल्या बैलास काठीनें मारलें असतां तो जर घास वगैरे खाईल तर प्रायश्चित्त नाही. रोध, बंधन, योक्त्र व घात असे चार प्रकार.
‘‘तोच’’---पूर्वीं रोगानें पीडलेल्या अशा बैलास काठीनें मारलें असतां तो मूर्छित झाला किंवा जमिनीवर पडला नंतर तो उठून जर पांच, सात किंवा दहा पावलें जाईल, किंवा घास खाईल किंवा पाणी पिईल तर प्रायश्चित्त नाही. ‘‘पराशर’’---रोध, बंधन, योक्त्र व घात असे चार प्रकार आहेत. ‘‘तोच’’---गाईंचा जाण्याचा मार्ग, घर, कठीण जागा, सारखी जागा, नद्या, समुद्र, दुसरीं स्थळें, नदी जेथें समुद्रास मिळते तें ठिकाण व आग लागलेली जागा या ठिकाणीं प्रतिबंध केल्यामुळें जर गाई व बैल मेले तर त्याला रोध म्हणतात. जर मेढ, दोर, गळ्यांतील अलंकार व दुसरी भूषणें यांच्या योगानें घरी किंवा रानांत बांधलेला बैल मेला तर तें बंधन जाणावें, मग ते बुद्धिपूर्वक केलेलें असो किंवा अबुद्धिपूर्वक असो. जर मनुष्यांनी नागर किंवा गाडा यास जुंपलेल्या बैलास पंक्ति किंवा पृष्ठ (पाठ) यांचे ठिकाणीं पीडा केली असतां तो मरेल तर त्याचा तो वध योत्क्र होतो. जर मनुष्य मत्त, प्रमत्त, उन्मत्त, चेतन किंवा अचेतन अशा बैलास ज्ञानानें किंवा अज्ञानानें काठ्यांनीं किंवा दगडांनीं मारून तो मरेल तर तो (मृत्यु) निपातन होय. ‘‘आपस्तंब’’---शासन करणें, मेढीशीं बाधणें, रोध व संघातयोजन यांच्या योगानें (बैल) मेला असतां तसेंच साखळीच्या फाशांनीं मेला असतां तीन चतुर्थांश प्रायश्चित्त करावें.