मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १९ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १९ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘श्रीशंकराचार्यास्‍तु’’ कामतोव्यवहार्यस्‍त्‍वित्‍यकारप्रश्र्लेषेणेदं याज्ञवल्‍क्‍योक्तवचो ‘‘बहिस्‍तूभयथापि स्‍मृतेराचाराच्चेति सूत्रे’’ कृतप्रायश्चित्तनैष्‍ठिकब्रह्मचार्यादिपरं।
‘‘आरूढो नैष्‍ठिके धर्मे यस्‍तु प्रच्यवते पुनः।
प्रायश्चितं न पश्यामि येन शुध्येत्‌ स आत्‍महेति’’ ‘‘आरूढपतितं विप्रं मंडलाच्च विनिः सृतं।
उद्बद्धं कृमिदष्‍टं च स्‍पृष्‍ट्‍वा चांद्रायणं चरेदिति च’’ ‘‘स्‍मृते’’ रिति येन शुध्येत्‌ व्यवहारयोग्‍यो भवेत्‌ तत्‍प्रायश्चित्तं न पश्यामीति कृतप्रायश्चितमपि आरूढपतितादिकं स्‍पृष्‍ट्‍वा चांद्रायणं कुर्यादिति वाक्‍यद्वयथार्थ इत्‍याहुः।
तत्‍सूत्रं ‘‘वाचस्‍पतिमिश्रास्‍तु’’ बालघ्‍नादिपरमप्याहुः बालघ्‍नांश्र्च कृतघ्‍नांश्र्च विशुद्धानपि धर्मतः।
शरणागतहंतृंश्र्च स्त्रीहंतृंश्र्च न संपिबेदिति’’ ‘‘स्‍मृतेः’’।
न संपिबेन्न व्यवहरेत्‌ अत एव ‘‘याज्ञवल्‍क्‍यः’’ शरणागत बालस्त्रीहिंसकान्‌ संविशेन्न तु।
चीर्णव्रतानपि सतः कृतघ्‍नासहितानिमान्‌।
तेनाचार्यमतेऽवकीर्णिनैथ्‍ष्‍ठकादिभिर्बालघ्‍नादिभिश्र्च कृते प्रायश्चित्ते नरकानुकूलाशक्ति र्नाश्यते।
व्यवहारनिरोधिका तत्‍स्‍येव। इतरपापेषु कामकृतेष्‍वपि शक्तिद्वयमपि नाश्यते द्विगुणप्रायश्चित्तेन ‘‘तदाहांगिराः’’ विहितं यदकामानां कामात्तद्विगणं भवेत्‌।
महापापे तु कामकृते मरणमेव।
तथा च ‘‘ स एव’’ यः कामतो महापापं नरः कुर्यात्‍कथंचन।
न तस्‍य निष्‍कृतिर्दृष्‍टा भृग्‍वाग्‍निपतनादृते।
‘‘तथा’’ प्राणांतिकं तु यत्‍प्रोक्तं प्रायश्चित्तं मनीषिभिः।
तत्‍कामकारविषयं विज्ञेयं नात्र संशयः। ‘‘व्यासः’’ कामतो ब्राह्मणवधे निष्‍कृतिर्नास्‍ति जीविनः।
यस्‍तु सर्व परित्‍यज्‍य यावज्‍जीवं चरेद्‌व्रतं। स विशुद्धः शुभांल्‍लोकान्विप्रो गच्छेन्न संशयः

अवकीर्णि, बाळहत्त्या करणारा इत्‍यादिकांनी प्रायश्चित्त केले तर नरकानुकूला शक्ति नाहीशी होते.
‘‘श्री शंकराचार्य’’ तर-‘‘कामतोऽव्यवहार्यः’’ यांत अकार मिळून जातो त्‍यावरून हे ‘‘याज्ञवल्‍क्‍याचें’’ वचन ‘‘बहिस्‍त्‌भयथा स्‍मृतेराचाराच्च’’ या सूत्रावरील भाष्‍यांत ज्‍यांचेकडून प्रायश्चित्त करण्यांत आलें आहे अशा नैष्‍ठिक ब्रह्मचार्यादिकाविषयी आहे. कारण, ‘‘जो नैष्‍ठिक धर्म करावयास लागला असून पुढें त्‍यापासून भ्रष्‍ट होईल तर तो आत्‍महा (आपल्‍या देहाचें नुकसान करणारा) ज्‍याच्या योगानें शुद्ध होईल असें मला प्रायश्चित्त दिसत नाही’’ ही आणि ‘‘नैष्‍ठिक धर्मापासून भ्रष्‍ट झालेला व जातींतून निघून गेलेला ब्राह्मण, उलटा टांगलेला व ज्‍याच्या शरीरांत किडे पडले आहेत यांस स्‍पर्श केला असतां चांद्रायण करावें’’ ही अशा या दोन स्‍मृतींवरून आरूढपतितादिकांनी जरी प्रायश्चित्त केलें तरी त्‍यांस स्‍पर्श करणारानें चांद्रायण प्रायश्चित्त करावे. असा दोन्ही वचनांचा अर्थ असें म्‍हणतात. ‘‘वाचस्‍पतिमिश्र’’ तर---‘‘बाळकांची हत्‍या करणारे, कृतघ्‍न (केलेल्‍या उपकारास विसरणारे), शरण आलेल्‍यांस मारणारे व स्त्रीहत्‍या करणारे हे प्रायश्चित्त घेऊन शुद्ध जरी झाले तरी त्‍यांच्याशी व्यवहार करूं नये’’ अशी स्‍मृति आहे, त्‍यावरून त्‍यांचे (शंकराचार्यांचे) सूत्र बाळहत्‍या करणारे वगैरे त्‍याविषयीहीं आहे असे म्‍हणतात. म्‍हणूनच ‘‘याज्ञवल्‍क्‍य’’---‘‘शरण आलेला, बाळक व स्त्री यांस ठार मारणारे व कृतघ्‍न यांनी प्रायश्चित्त जरी केले तरी त्‍यांच्याशी व्यवहार करूं नये’८ असें म्‍हणतो. त्‍यावरून आचार्यांच्या मतानें अवकीर्णि नैष्‍ठिक वगैरे व बाळहत्‍या करणारे वगैरे यांनी प्रायश्चित्त केलें असतां नरकानुकूला शक्ति नाहींशी होते; पण व्यवहारनिरोधिका शक्ति तर असतेच. इतर पापें बुद्धिपूर्वक जरी केली असली तरी दुप्पट प्रायश्चित्ताने दोन्हीही शक्ति नाहींशा होतात. ‘‘आंगिरस्‌’’ तें सांगतो---बुद्धिपूर्वक न केलेल्‍या पापांस जें प्रायश्चित्त सांगितलें आहे, तेंच बुद्धिपूर्वक केलेल्‍यांस दुप्पट होते. बुद्धिपूर्वक मोठें पातक केलें असतां मरण हेंच प्रायश्चित्त होय. आणखि ‘‘तोच’’ -जो मनुष्‍य कोणत्‍याही प्रकारानें बुद्धिपूर्वक मोठें पाप करील, तर त्‍या पापाची निष्‍कृति (प्रायश्चित्त) कड्यावरून पडणें किंवा अग्‍नींत पडणें या शिवाय दुसरी पहाण्यांत येत नाही. ‘‘तसेच’’ ज्ञात्‍यांनी मरणांत जें प्रायश्चित्त सांगितलें तें बुद्धिपूर्वक पातकाविषयी जाणावें यांत संशय नाही. ‘‘व्यास’’- प्राण्यानें बुद्धिपूर्वक ब्राह्मणाचा वध केला असतां त्‍याची निष्‍कृति (प्रायश्चित्त) नाही. तो (मारणारा) जर ब्राह्मण असेल तर त्‍यानें सर्वांचा परित्‍याग करून प्राण असतील तोपर्यंत व्रताचें आचरण करावें, म्‍हणजे तो शुद्ध होत्‍साता चांगल्‍या लोकांस जाईल यांत संशय नाही.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP