मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ७९ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७९ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘सुमंतुः’’ वानरसिंहमार्जारमंडूकाश्र्ववधे प्राजापत्‍यमिति। ‘‘पराशरः’’ हत्‍वा मूषकमार्जारसर्पाजगरडुंडुभान्‌।
कृसरं भोजयोद्विप्रान्‌ लोहदंडं च दक्षिणेति। ‘‘विष्‍णुः’’ हत्‍वामूषकमार्जारनकुलमंडूकडुंडुभाजगराणामन्यतमं कृसरान्नं भोजयित्‍वा लोहदंडदक्षिणां दद्यात्‌। ‘‘यत्तु शंखः’’ हत्‍वा द्विजस्‍तथा सार्पौ बिलेशयजलाशयौ।
सप्तरात्रं तथा कुर्याद्व्रतं ब्रह्मवधे तु यत्‌ इति तत्‍कामकृते।
‘‘यत्‍वोशनाः’’ खरमार्जारमंडूकसर्पाजगरमूषकान्‌। हत्‍वा कृच्छ्रं द्वादशरात्रं चरेत्‌ किंचिद्दद्यादिति तदकामाभ्‍यासे।
‘‘विष्‍णुः’’ श्र्वानं हत्‍वा त्रिरात्रमुपवसेदिति। ‘‘यत्तु माधवीये पैठीनसिः’’ काकोलूककृकलासकर्कखरवृकशृगालभासबर्हिणमूषकचक्रवाकहंसप्लवननकुलमंडूकबिडालश्र्ववध एतेषामेकैकस्‍मिन्‌ शूद्रवद्विहितमिति तत्‍कामतोऽत्‍यंताभ्‍यासविषयं

वानर, सिंह, मांजर, बेडूक, घोडा, सर्प, अजगर वगैरेस मारलें तर प्रायश्चित्त.

‘‘सुमंतु’’---वानर, सिंह, मांजर, बेडूक व घोडा यांचा वध केला तर प्राजापत्‍य प्रायश्चित्त. ‘‘पराशर’’ ---उंदीर, मांजर, सर्प, अजगर व दुतोंडें (अधेलें) यांस मारलें तर ब्राम्‍हणांस कृसरा (खिचडी) चे भोजन घालावे व लोखंडाचा दांडा दक्षिणा द्यावी. ‘‘विष्‍णु’’---उंदीर, मांजर, मुंगुस, बेडूक, दुतोंडे व अजगर यांतून एखाद्याचा वध केला तर कृसरान्न जेऊं घालावें व लोखंडाचा दांडा दक्षिणा द्यावी. ‘‘जे तर शंख’’ द्विजानें बिळांत रहाणारा साप व पाण्यांत राहणारा साप हे मारले तर ब्राह्मणाच्या वधांत सांगितलेलें व्रत सात दिवस पर्यंत करावे.’’ असें म्‍हणतो तें बुद्धिपूर्वक केलेल्‍या वधा विषयीं जाणावें. ‘‘जें तर उशनस्‌’’ गाढव, मांजर, बेडूक, साप, अजगर व उंदीर यांस मारलें तर बारा दिवसांचें कृच्छ्र (प्राजापत्‍य) करावें व किंचित्‌ दक्षिणा द्यावी.’’ असें म्‍हणतों तें अज्ञानपूर्वक अभ्‍यासा विषयीं जाणावे. ‘‘विष्‍णु’’---कुत्र्यास मारलें तर तीन दिवस उपास करावा. ‘‘जें तर माधवीयांत पैठीनसि’’ कावळा, घुबड, सरडा, खेकडा, गाढव, लांडगा, कोल्‍हा, भास, मोर, उंदीर, चक्रवाक, हंस, पाणकोंबडा, मुंगुस, बेडूक, मांजर व कुत्रें यांच्या पैकी एखाद्यास मारलें तर शूद्राच्या वधा प्रमाणें प्रायश्चित्त सांगितलें’’ असें म्‍हणतो तें बुद्धिपूर्वक अति अभ्‍यासा विषयीं जाणावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP