‘‘याज्ञवल्क्यः’’ गजे नीलवृषाः पंच शुके वत्सोद्विहायनः। खराजमेषेषु वृषोदेयः क्रौंचें त्रिहायनः।
‘‘मनुः’’ वासोदद्याध्दयं हत्वा पंच नीलान्वृषान्गजं। अजमेषावनड्वाहं खरं हत्वैकहायनमिति एतानि प्रायश्चित्तानि धनिकविषयाणि।
‘‘निर्धनस्य तु जाबालिः’’ हस्तिनं तुरगं हत्वा महिषं गां तथैव च। कृच्छ्रंसांतपनं कुर्याद्गोभूकन्यानृतेषु च।
‘‘विष्णुः’’ हस्तिनं तुरगं हत्वा महिषोष्ट्रौ कपिं तथा। एषु सर्वेषु कुर्वीत सत्रिरात्रभोजनं इदमभ्यासविषयं।
‘‘अस्मिन्नेव विषये’’ सिंहव्याघ्रतुरंगांश्र्च गृगखङ्गरुरुद्विपान्। हत्वा सांतपन कुर्याद्गोभूकन्यानृतेषु च।
हत्ती, पोपट, गाढव, बकरें, मेढरूं वगैरेंस मारलें असतां धनवानास व निर्धनास प्रायश्चित्त.
‘‘याज्ञवल्क्य’’ -हत्तीस मारलें असतां पाच काळे बैल, पोपटा विषयीं दोन वर्षांचा वाछडा, गधडें, बकरें व मेंढरूं यांच्या ठिकाणीं एक बैल व क्रौंच पक्षाविषयीं तीन वर्षाचा वाछडा द्यावा. ‘‘मनु’’---घोडा मारला असतां वस्त्र द्यावें. हत्ती मारला असतां तीन काळे बैल, बकरें व मेंढरूं मारलें अर एक आंडील (सांड), गधडें मारलें असतां एक वर्षाचा वाछडा द्यावा. ही प्रायश्चित्तें द्रव्यवानाविषयीं जाणावी. ‘‘निर्धनास (गरीबास) तर जाबालि’’---हत्ती, घोडा, रेडा व गाय यांस मारले असतां सांतपन कृच्छ्र करावे. तसेंच गाय, भूमि व कन्या यांच्या विषयी लबाड्या करणें त्यांतही सांतपन कृच्छ्र करावें. ‘‘विष्णु’’---हत्ती, घोडा, रेडा, उंट व वानर यांस मारलें असतां या सर्वांत तीन दिवस पर्यंत उपास करावा. हें अभ्यासा विषयीं जाणावें ‘‘याचविषयी’’ सिंह, वाघ, घोडा, हरिण, गवा, रुरु व हत्ती यांस मारलें, तसेंच गाय, भूमि व कन्या यांच्या संबंधानें लबाड्या करणें त्याविषयी सांतपन करावे.