प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७६ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अन्यगोवधेविशेषमाहमनुः’’ यो यस्य हिंस्याद्रव्याणि ज्ञानतोऽज्ञानतोऽपिवा। स तस्योत्पादयेत्तुष्टिं राज्ञे दद्याच्च तत्समं।
‘‘पराशरः’’ प्रमापणे प्राणभृतां दद्यात्तत्प्रतिरूपकम्। तस्यानुरूपं मूल्यं वा दद्यादित्यब्रवीद्यमः। ‘‘ब्राम्हे’’ आदौ गोपतये दत्वा गोमूल्यं साधुकल्पितम्
जर दुसर्याची गाय इत्यादिकांचा वध केला तर त्याबद्दल त्याला तो पश्रुद्यावा किंवा त्याची किंमत द्यावी.
‘‘दुसर्याच्या गाईचा वध केला तर त्या विषयी मनु विशेष सांगतो’’ जो कोणीही (मनुष्य) ज्ञानानें किंवा अज्ञानानें एखाद्याचा वस्तूंचा (गाय इत्यादिकांचा) नाश करील तर, त्यानें त्याला संतुष्ट करावें व राजास त्या वस्तूच्या किंमती एवढी रक्कम (दंड) द्यावी. ‘‘पराशर’’---प्राण्यांचा वध केला तर त्याच्या प्रमाणें दुसरे प्राणी (गाय इत्यादि) द्यावे, किंवा त्यांची योग्य किंमत मालकास द्यावी असें यमानें सांगितलें. ‘‘ब्रह्मपुराणांत’’ अगोदर गाईच्या मालकास चांगले लोक ठरवितील तेवढी गाईची किंमत द्यावी.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP