प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ७४ वे
विधिविहित नित्यकर्म (संध्यादि) न केल्यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्यानें त्याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.
‘‘अत्र स्वयमेव जलार्थं गते मृते च न दोष इत्याह ‘‘स एव’’ कूपखाते तटाबंधे नदीबंधे नदीबंधे प्रपासु च।
पीनीयेषु विपन्नानां प्रायश्चित्तं न विद्यते। ‘‘स एव’’ निशिबंधनिरूद्धेषु सर्पव्याघ्रहतेषु च।
अग्निविद्युद्विपन्ननां प्रायश्चित्तं न विद्यते एतच्च हितार्थे विहितरज्जु बंधने ज्ञेयम्
कुवा इत्यादिकांत गाई पडून मेल्या किंवा अग्नि इत्यादिकांच्या योगानें मेल्या तर प्रायश्चित्त नाही.
‘‘पूर्वीं सांगितलेला कुवा इत्यादिकांत पाण्याकरितां गाय स्वतां गेली आणि ती जर मेली तर दोष नाहीं असें तोच सांगतो’’---कुवा, कोटाचा खाडा (खंदक), नदीचा बांध व पाणपोयी यांच्या ठिकाणी गाई स्वतां जाऊन जर मेल्या तर प्रायश्चित्त नाही. ‘‘तोच’’---गाई रात्रीं दोरांनीं बांधल्यामुळें साप व वाघ यांनी जर मारल्या किंवा अग्नि व वीज यांच्या योगानें मेल्या तर प्रायश्चित्त नाही. हें (प्रायश्चित्त) हिताकरितां केलेल्या दोराच्या बंधनाविषयी जाणावें.
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2018
TOP